Rohit Pawar on Ajit Pawar: अजितदादा आता गावकीचा विचार करतात, मात्र भावकी विसरले आहेत, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी अजित पवार यांना सणसणीत टोला लगावला. आज इस्लामपूरमध्ये सरोज पाटील माई यांच्यासमोर बोलताना रोहित पवार यांनी चांगलीच फटकेबाजी केली. निमित्त होते, इस्लामपूरमधील महात्मा फुले शिक्षण संस्थेच्या प्रा. डॉ. एन.डी. पाटील विधी महाविद्यालय, श्रीमती सरोज नारायण पाटील (माई) मानसशास्त्र संशोधन केंद्र आणि प्रा. डॉ. एन. डी. पाटील बहुउद्देशीय सभागृहाचा उद्घाटन सोहळा. यावेळी व्यासपीठावर राजकीय दिग्गज उपस्थित होते. उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह दिग्गज मंडळी एकत्र आल्याने रोहित पवार काय बोलणार याकडे लक्ष होते.
अजित दादा गावकीचा विचार करतात, मात्र, भावकीला विसरला आहात
तत्पूर्वी, सरोज पाटील माई यांनी बोलताना रोहित पवार यांच्या कार्याचा आढावा घेत कौतुकाची थाप दिली होती. आमचा लाडका रोहित चांगला धीट झाल्याचं त्यांनी म्हटलं होतं. त्यानंतर रोहित पवार बोलण्यासाठी उभा राहिल्यानंतर काय बोलणार याकडे लक्ष होते. अजित पवार व्यासपीठावर असल्याने रोहित पवार यांनी चांगलीच फटकेबाजी केली. त्यांनी सांगितले की अजित दादा आता गावकीचा विचार करतात. मात्र, भावकीला विसरला आहात. एकत्र असताना भाषणाचा कौतुक करायचे, मला मार्गदर्शन करत होते असे रोहित पवार यांनी सांगितलं.
दरम्यान, रोहित पवार यांनी बोलताना बंगल सोडत नसलेल्या धनंजय मुंडे यांच्यावरही तोफ डागली. ते म्हणाले की मंत्रीपद गेले तरी काहीजण बंगला सोडत नाहीत. मात्र त्यांनी एनडी पाटलांकडून आदर्श घ्यावा असे ते म्हणाले. त्यांनी पुढे सांगितले की जयंत पाटील, स्वर्गीय आर आर पाटील, स्वर्गीय पतंगराव कदम यांनी सांगली जिल्ह्याच्या विकासाचा विचार केला होता. यावेळी बोलताना सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांचंही रोहित पवार यांनी कौतुक केलं. ते म्हणाले की दादा तुम्ही भाजपचं खरंच सोनं आहात. मात्र आताच्या काळातील काही बेन्टेक्स खालच्या थराला जाऊन बोलत आहेत. त्यामुळे या बेन्टेक्सचं काय करायचं हे भाजपच्या खऱ्या सोन्यानं याची दखल घेण्याची गरज असल्याचं रोहित पवार म्हणाले. असे बोलत त्यांनी एक प्रकारे गोपीचंद पडळकर यांच्याकडून जी बेताल पवार कुटुंबीयांविरोधात विशेष करून होत आहेत त्याचा समाचार घेतला.
इतर महत्वाच्या बातम्या