Saroj Patil on Ajit and Rohit Pawar: अजितदादा वरून आक्रमक दिसत असला तरी आतून गोड आहे. वरून कठीण दिसत असला तरी आतून नारळासारखा आहे. ज्या ज्या वेळी आमच्या घरावर संकट आलं त्यावेळी अजित धावून आला, अशा शब्दात कौतुकाची अजित पवार यांच्या आत्या सरोज पाटील माई यांनी दिली. आज (16 ऑगस्ट) इस्लामपूरमध्ये महात्मा फुले शिक्षण संस्थेच्या प्रा. डॉ. एन.डी. पाटील विधी महाविद्यालय, श्रीमती सरोज नारायण पाटील (माई) मानसशास्त्र संशोधन केंद्र आणि प्रा. डॉ. एन. डी. पाटील बहुउद्देशीय सभागृहाचा उद्घाटन सोहळा व प्रारंभोत्सव कार्यक्रम दिग्गजांच्या उपस्थितीत झाला. यावेळी बोलताना सरोज पाटील माई यांनी अजित पवार आणि रोहित पवार यांना कौतुकाची थाप दिली. या कार्यक्रमासाठी कट्टर राजकीय विरोधक एकाच व्यासपीठावर आल्यानंतर आल्याने सरोज माई काय बोलणार? याकडे लक्ष होते. यावेळी माई यांनी अजित पवार यांच्यासह रोहित पवार यांचे सुद्धा कौतुक केलं आणि दोघांच्याही कार्याची दखल घेतली. 

रोहित आता चांगलाच धीट झाला आहे

सरोज माई म्हणाल्या की, या मंचावर आणखी एक हिरा उपस्थित आहे तो म्हणजे आमचा लाडका रोहित पवार. रोहित आता चांगलाच धीट झाला आहे. चांगल्या पद्धतीने भाषण देऊ लागला आहे. तो आत प्रा. एन. डी. पाटील यांची जागा घेतो की काय असं वाटतं. अजितदादांविषयी बोलताना माई म्हणाल्या की, अजितदादांची तारीख कोणती घ्यायची असा प्रश्न सगळ्यांनाच पडला होता. या कार्यक्रमासाठी अजितदादा पवार, चंद्रकांत पाटील, लाडके जयंत पाटील कार्यक्रमाला यावेत अशी सगळ्यांची इच्छा होती, पण अजितदादांची तारीख कोण घ्यायची असा प्रश्न सगळ्यांना पडला. त्यानंतर आमचा प्रशांत अजितदादा कडे गेला आणि लगेच दादाने तारीख दिली. अजितदादा वरून आक्रमक दिसत असला तरी आतून गोड आहे. वरून कठीण दिसत असला तरी आतून नारळासारखा आहे, ज्या ज्या वेळी आमच्या घरावर संकट आलं त्यावेळी अजित धावून आला. एन. डी साहेब यांचे निधन झाल्यानंतर त्यांना खांदा देण्यापासून मुखाग्नी देईपर्यंत सर्व जबाबदारी अजितने पार पाडली. 

चंद्रकांत दादा पाटील यांची सुद्धा नेहमीच मदत लाभली

यावेळी बोलताना माईंनी महाविद्यालयाच्या स्थापनेमध्ये ज्यांच्या ज्यांचा खरीचा वाट आहे त्यांचाही उल्लेख केला. त्यांनी सांगितले की संस्थेसाठी पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांची सुद्धा नेहमीच मदत लाभली आहे. क्षणाचाही विलंब न लावता चंद्रकांत दादा मदत करतात, अशा शब्दांमध्ये त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. त्या म्हणाल्या की, जयंत पाटील सुद्धा यांनी आम्हाला साथ दिली आहे. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये लक्ष घालून त्यांनी मदत केली असल्याचे त्यांनी सांगितलं. 

इतर महत्वाच्या बातम्या