एक्स्प्लोर
राज्यातील ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये दारुची दुकाने सुरू होण्याची शक्यता
केंद्र सरकारने ग्रीन झोनमध्ये दारुची दुकानं आणि पानाची दुकानं सुरु करण्याची सशर्त संमती दिली आहे. मात्र, राज्यात हा निर्णय संबंधित जिल्ह्याधिकाऱ्याकडे जाण्याची शक्यता आहे.

मुंबई : देशात आज तिसऱ्या लॉकडाऊनची घोषणा करताना केंद्र सरकारने दारुची दुकानं आणि पानाची दुकानं सुरु करण्याची सशर्त संमती दिली आहे. मात्र, ग्रीन झोन आणि ऑरेंज झोन असणाऱ्या ठिकाणीच ही परवानगी देण्यात आली आहे. मात्र, याबाबत अद्याप राज्याकडून निर्यण घेण्यात आलेला नाही. त्यामुळे तळीरामांना आणखी काही काळ वाट पहावी लागणार आहे. लॉकडाऊनमध्ये दारूची दुकाने सुद्धा बंद करण्यात आली होती. यामुळे मोठ्या प्रमाणात महसूल येणे बंद झाले. परिणामी दारुच्या दुकाने सुरू करण्याची मागणी अनेकांनी केली होती. त्यानुसार केंद्राने परवानगी दिली आहे.
या लॉकडाऊन काळात राज्य सरकारने काही गोष्टींमध्ये सुट दिली आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने याबाबत पत्रक काढून यासंदर्भात माहिती दिली आहे. त्यानुसार, राज्यात रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोन संदर्भात वेगवेगळे नियम करण्यात आले आहेत. यात रेड झोनसाठी अतिशय कमी तर ग्रीन झोनसाठी सर्वाधिक सुट देण्यात आली आहे.
Lockdown3 | महाराष्ट्रात अंतर्गत प्रवास करण्यासाठी राज्य सरकारकडून नवीन नियमावली
ग्रीन झोनमध्ये 'या' गोष्टी सुरु राहणार?
- ग्रीन झोन जिल्ह्यामध्ये 50 टक्के क्षमतेने प्रवासी वाहतूक सुरू राहणार आहे.
- ग्रीन झोनमधील दारूची दुकानं आणि पान शॉप्स सुरू ठेवण्याचा विचारही सरकार करत आहे. परंतु, दुकानदाराने सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे गरजेचे आहे.
- 17 मे पर्यंतच्या लॉकडाऊन काळात बस डेपोमध्ये 50 टक्केच कर्मचारी काम करणार आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
भारत
पुणे
बातम्या
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
