एक्स्प्लोर

विद्यापीठ नामांतराविरोधात आज सोलापूर बंदची हाक

विद्यीपाठ नामांतराविरोधात सोलापूरमध्ये आज लिंगायत समाजानं सोलापूर बंदची हाक दिली आहे. शिवा संघटना, सिद्धेश्वर भक्त आणि वीरशैव महिला संघटना यांच्यावतीनं बंदची हाक देण्यात आली आहे.

  सोलापूर : विद्यीपाठ नामांतराविरोधात सोलापूरमध्ये आज लिंगायत समाजानं सोलापूर बंदची हाक दिली आहे.  शिवा संघटना, सिद्धेश्वर भक्त आणि वीरशैव महिला संघटना यांच्यावतीनं बंदची हाक देण्यात आली आहे. अनेक वर्षांपासून सोलापुरात नामांतराविरोधात दोन मतं होती. मात्र, काही दिवसांपूर्वी नागपुरात सोलापूर विद्यापीठाला अहिल्यादेवी होळकर यांचं नाव देण्यात आल्याचं मुख्यमंत्र्यांनी घोषित केलं. त्यानंतर या नामांतरावर लिंगायत समाजानं तीव्र नाराजी व्यक्त केली. लिंगायत समाजाकडून सोलापूर विद्यापीठाला शिवयोगी सिद्धरामेश्वर यांचं नाव देण्याची मागणी होती. तर धनगर समाजाकडून विद्यापीठाला अहिल्यादेवी होळकरांचं नाव द्यावं अशी मागणी होती. विद्यापीठाच्या नामांतरासाठी सुरुवातीला धनगर समाजाने सुरुवातीला मोर्चा काढला. त्यानंतर लिंगायत समाजाने 18 सप्टेंबर रोजी विराट मोर्चा काढून सोलापूर विद्यापीठाचे नामकरण शिवयोगी सिद्धेश्वर नाव देण्याची मागणी केली होती. काय आहे प्रकरण? शिवयोगी सिद्धरामेश्वर हे सोलापूरचं ग्रामदैवत. 12 व्या शतकातील या महापुरुषाने लोकोद्धारासाठी आपलं संपूर्ण आयुष्य वेचलं. सिद्धरामेश्वरांच्या कार्याचा दाखला देऊन, त्यांचं नाव सोलापूर विद्यापीठाला द्यावं, अशी मागणी जिल्ह्यातील सर्व मठांनी आणि देवस्थानांनी केली होती. दुसरीकडे धनगर समाजाने विद्यापीठाला अहिल्यादेवी होळकरांचं नाव देण्यासाठी लढा उभा केला होता. ऑगस्टमध्ये धनगर समाजाने विराट मोर्चा काढून सोलापूर विद्यापीठाला अहिल्यादेवी होळकरांचं नाव देण्याची मागणी केली होती. अहिल्यादेवी होळकरांच्या नावाला शिवसेनेसह इतर समाजिक संघटना आणि संस्थांनी पाठिंबा दिला होता. पण नागपुरातील एका कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विद्यापीठाचं नामांतर अहिल्यादेवी होळकर करण्याची घोषणा केली. त्यामुळे लिंगायत समाज नाराज झाला. आपली नाराजी व्यक्त करण्यासाठी शिवा संघटना, सिद्धेश्वर भक्त आणि वीरशैव महिला संघटना आदी संघटनांनी आज सोलापूर बंदची हाक दिली आहे. संबंधित बातम्या VIDEO : स्पेशल रिपोर्ट : सोलापूर विद्यापीठ, नामांतर आणि वाद सोलापूर विद्यापीठाला अखेर अहिल्याबाई होळकरांचं नाव! क्या हुआ तेरा वादा...? मुख्यमंत्री भाषणाला उभे राहताच गाणं वाजलं

महत्त्वाच्या बातम्या

मुलीला का मारलं विचारणाऱ्या आईला वीट अन् काठीने मारहाण; उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू, मुलीचा आक्रोश
मुलीला का मारलं विचारणाऱ्या आईला वीट अन् काठीने मारहाण; उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू, मुलीचा आक्रोश
NCP Sharad Pawar : शरद पवारांचा खासदार फुटणार नाहीत, ऑपरेशन तुतारीला तुर्तास ब्रेक; विश्वसनीय सूत्रांची माहिती
शरद पवारांचा खासदार फुटणार नाहीत, ऑपरेशन तुतारीला तुर्तास ब्रेक; विश्वसनीय सूत्रांची माहिती
देवाभाऊंनी देशाचं नेतृत्व करावं, आषाढीला आपण पांडुरंगाला साकडं घालू; दत्तात्रय भरणेंचं मोठं वक्तव्य
देवाभाऊंनी देशाचं नेतृत्व करावं, आषाढीला आपण पांडुरंगाला साकडं घालू; दत्तात्रय भरणेंचं मोठं वक्तव्य
Devendra Fadnavis on Farmers: देवाभाऊंची मोठी घोषणा, शेतकऱ्यांची वीजबिलाची पाटी कोरी केली, थकित वीजबिल माफ
देवाभाऊंची मोठी घोषणा, शेतकऱ्यांची वीजबिलाची पाटी कोरी केली, थकित वीजबिल माफ

व्हिडीओ

Sanjay Raut On Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे संवाद साधण्यासाठी चांगला माणूस; ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना संजय राऊत काय म्हणाले?
Sachin Ahir UNCUT Speech : वरळीकरांकडून जंगी सत्कार, ठाकरे पिता-पुत्रांवर टीका, सचिन अहिरांचं भाषण!
Uddhav Thackeray Nagpur Ramraksha Andolan : नागपुरात रामरक्षा आंदोलनाची नवी कक्षा Special Report
Zero Hour Full : राष्ट्रवादीतील अंतर्गत कलह ते नागपुरात रामरक्षा आंदोलन, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
Eknath Shinde Delhi Visit to Meet Amit Shah : दिल्लीवारीचं कारण विस्तार की राजकारण? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raju Shetti : कर्जमाफीआधीच मुख्यमंत्र्यांचा सत्कार; राजू शेट्टी म्हणाले, स्वतःची पाठ स्वतः थोपटून घेण्याचा प्रकार, कर्जमाफीच्या अंमलबजावणीवरून सरकारला दिला अल्टिमेटम
कर्जमाफीआधीच मुख्यमंत्र्यांचा सत्कार; राजू शेट्टी म्हणाले, स्वतःची पाठ स्वतः थोपटून घेण्याचा प्रकार, कर्जमाफीच्या अंमलबजावणीवरून सरकारला दिला अल्टिमेटम
मुलीला का मारलं विचारणाऱ्या आईला वीट अन् काठीने मारहाण; उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू, मुलीचा आक्रोश
मुलीला का मारलं विचारणाऱ्या आईला वीट अन् काठीने मारहाण; उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू, मुलीचा आक्रोश
देवाभाऊंनी देशाचं नेतृत्व करावं, आषाढीला आपण पांडुरंगाला साकडं घालू; दत्तात्रय भरणेंचं मोठं वक्तव्य
देवाभाऊंनी देशाचं नेतृत्व करावं, आषाढीला आपण पांडुरंगाला साकडं घालू; दत्तात्रय भरणेंचं मोठं वक्तव्य
विलासरावांचा पुढाकार, मनमोहनसिंगाची धडपड; सोनम वांगचूकांची तब्येत खालवताच राजू शेट्टींना अण्णा आंदोलनाची आठवण
विलासरावांचा पुढाकार, मनमोहनसिंगाची धडपड; सोनम वांगचूकांची तब्येत खालवताच राजू शेट्टींना अण्णा आंदोलनाची आठवण
Supriya Sule on NCP: राष्ट्रवादी काँग्रेस मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला पाठिंबा देणार असल्याच्या बातम्या निराधार, आमच्याकडे कोणताही प्रस्ताव आलेला नाही: सुप्रिया सुळे
राष्ट्रवादी काँग्रेसकडून मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला पाठिंबा देण्याच्या बातम्या निराधार, आमच्याकडे कोणताही प्रस्ताव आलेला नाही: सुप्रिया सुळे
Dhule News: रक्ताच्या पिशव्या येण्यापूर्वीच प्रुसतीसाठी ऑपरेशन टेबलवर घेतलं, धुळ्यातील रुग्णालयात डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे महिलेचा मृत्यू
रक्ताच्या पिशव्या येण्यापूर्वीच प्रुसतीसाठी ऑपरेशन टेबलवर घेतलं, धुळ्यातील रुग्णालयात डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे महिलेचा मृत्यू
Shiv Puran: मृत्यूपूर्वी मनुष्याला मिळतात 'हे' 10 संकेत, शिवपुराणातील असे वर्णन, जे कलियुगातही लोकांना आश्चर्यचकित करते, जाणून घ्या...
मृत्यूपूर्वी मनुष्याला मिळतात 'हे' 10 संकेत, शिवपुराणातील असे वर्णन, जे कलियुगातही लोकांना आश्चर्यचकित करते, जाणून घ्या...
Railway Ticket Booking IRCTC : रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा! तिकीट बुकिंगमधील कॅप्चा कोडची कटकट संपणार; IRCTC संकेतस्थळात महत्त्वाचे बदल
रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा! तिकीट बुकिंगमधील कॅप्चा कोडची कटकट संपणार; IRCTC संकेतस्थळात महत्त्वाचे बदल
Embed widget