औरंगाबाद : लिंगायत धर्माला घटनात्मक मान्यता मिळावी आणि राष्ट्रीय स्तरावर अल्पसंख्याक दर्जा देण्यात यावा, या मागणीसाठी लिंगायत समजाने औरंगाबादमध्ये महामोर्चा काढला. शहरातील क्रांती चौकातून निघालेल्या मोर्चाचा समारोप विभागीय कार्यालयासमोर झाला.
मराठवाड्याच्या विविध भागांमधून मोठ्या प्रमाणात समाज बांधवांनी मोर्चात हजेरी लावली होती. ‘मी लिंगायत, माझा धर्म लिंगायत’च्या घोषणेच्या भगव्या टोप्या परिधान केल्या होत्या. या मोर्चात महिलांचा सहभाग ही लक्षणीय होता.
दिल्लीत लवकरच रामलीला मैदानावर मोर्चा काढण्यात येणार असल्याचे माता महादेवजी यांनी सांगितले. तसेच, येत्या 18 एप्रिलला बसवेश्वर जयंती आहे. या दिवशी घरावर हा लिंगायत धर्माचा ध्वज फडकवण्याचे आवाहनही त्यांनी केले. लिंगायत धर्माची मान्यता मिळत नाही तोपर्यंत आंदोलन करत राहणार असल्याचेही त्या म्हणाल्या.
स्वतंत्र धर्मासाठी औरंगाबादमध्ये लिंगायतांचा महामोर्चा
कृष्णा केंडे, एबीपी माझा, औरंगाबाद
Updated at:
08 Apr 2018 06:18 PM (IST)
दिल्लीत लवकरच रामलीला मैदानावर मोर्चा काढण्यात येणार असल्याचे माता महादेवजी यांनी सांगितले. तसेच, येत्या 18 एप्रिलला बसवेश्वर जयंती आहे. या दिवशी घरावर हा लिंगायत धर्माचा ध्वज फडकवण्याचे आवाहनही त्यांनी केले.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -