एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
स्वतंत्र धर्माच्या मागणीसाठी सोलापुरात लिंगायत समाजाचा महामोर्चा
स्वतंत्र धर्माच्या मागणीसाठी आज सोलापुरात लिंगायत समन्वय समितीने मोर्चा काढला. वेगवेगळ्या मठाचे धर्मगुरु या मोर्चात सहभागी झाले होते.
सोलापूर : स्वतंत्र धर्माच्या मागणीसाठी आज सोलापुरात लिंगायत समन्वय समितीने मोर्चा काढला. वेगवेगळ्या मठाचे धर्मगुरु या मोर्चात सहभागी झाले होते.
लिंगायत धर्माला संवैधानिक मान्यता मिळावी आणि राष्ट्रीय स्तरावर अल्पसंख्यांक दर्जा मिळावा या प्रमुख मागणीसाठी आज 3 जून रोजी अखिल भारतीय लिंगायत समन्वय समितीच्यावतीने महामोर्चा काढण्यात आला. सकाळी सोलापुरातील महात्मा बसवेश्वर सर्कलपासून मोर्चाला सुरुवात झाली.
शेकडो लिंगायत समाज बांधवांचा हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचला. यामध्ये महाराष्ट्र कर्नाटकातील लिंगायत समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
कर्नाटक राज्य सरकारच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारने त्वरित लिंगायत धर्मासंबंधी केंद्र सरकारला शिफारस पाठवावी, लिंगायतांना अल्पसंख्याक दर्जा जाहीर करावा, संवैधानिक मान्यता द्यावी, अशी समन्वय समितीची मागणी आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement