अहमदनगर : जिल्ह्यातील श्रीरामपूर (shrirampur) येथील मोरगे वस्तीमध्ये बिबट्याने (Leopard) सकाळपासून धुमाकूळ घातला होता. अखेर या बिबट्याला पकडण्यात वनरक्षकांना यश आलं आहे. भर लोकवस्तीत घुसलेला हा बिबट्या तब्बल तीन तासानंतर (Leopard in Cage) जेरबंद झाला आहे. संगमनेर (Sangamner) येथील वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी (Forest Officers) शर्थीच्या प्रयत्नांनी बिबट्याला जेरबंद केलं आहे. भरवस्तीत घडलेल्या या घटनेमुळे संबधित वस्तीततील नागरिकांची झोप उडाली होती. वनविभागही सकाळपासून चिंतेत होता. पण वनरक्षकांनी जीवाची बाजी लावून अखेर बिबट्याला जेरबंद केलं आहे. बिबट्याच्या हल्ल्यात एका वनरक्षकासह 7 जण जखमी झाले आहेत. हल्ल्यात जखमी झालेल्यांना तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल केले गेले आहे.


अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर शहराच्या मोरगे वस्तीत रविवारी (5 डिसेंबर) सकाळच्या सुमारास बिबट्या शिरल्याची माहिती वनविभागाला मिळाली. भरवस्तीत नागरिक असताना अचानक बिबट्या शिरल्याने सर्वांचीच झोप उडाली. त्वरीत वनविभागाला याबद्दलची माहिती देण्यात आली पण तोवर बिबट्याच्या हल्ल्यात चारजण जखमी देखील झाले.  पोलीस आणि वनविभागाचे कर्मचारी बिबट्याला पकडण्यासाठी घटनास्थळी दाखल झाले.


3 तासानंतर बिबट्या जेरबंद


बिबट्याच्या हल्ल्यानंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. पण वनविभागाचे कर्मचारी आणि पोलिस यांनी शर्थीचे प्रयत्न सुरु केले. अखेर 3 तासानंतर बिबट्याला जेरबंद करण्यात आला. एका घरातील बाथरूममध्ये बिबट्या लपून बसला होता. ज्याठिकाणी शिरुन वनकर्मचाऱ्यांनी बिबट्याला जेरबंद केलं 



इतर महत्वाच्या बातम्या 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha