Sindhudurg : सिंधुदुर्ग : देशातील पहिल्या पर्यटन जिल्ह्यात पर्यटन वाढीस स्थानिकांकडून जोरदार विरोध होताना दिसत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला शिरोडा-वेळागर समुद्र किनाऱ्यावर पर्यटन व्यवसाय सुरू केल्यानंतर पर्यटन व्यावसायिक आणि स्थानिक मच्छिमार यांच्यात पर्यटन व्यवसाय सुरू झाल्यापासून वाद आहे. जलक्रीडा अंतर्गत पॅरॉसिलिग व्यवसाय (Parasailing traders )सुरू केल्याने पर्यटन व्यावसायिक आणि या भागात मासेमारी करणारे मस्य व्यावसायिक (fishermen ) यांच्यात वाद होऊन तुंबळ हाणामारी (Fighting)झाली. या प्रकरणी परस्परविरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. या वादातून तब्बल 29 जणांवर वेंगुर्ला पोलीस ठाण्यात गुन्हे (crime) दाखल करण्यात आले आहेत.
सिंधुदुर्गातील शिरोडा वेळागर येथे पर्यटन व्यवसायाच्या दृष्टीने विविध जलक्रीडा व्यवसाय अंतर्गत पॅरॉसिलिगचा व्यवसाय शिरोडा बागायतवाडी येथील भालचंद्र नाईक हे करत आहेत. सध्या जिल्ह्यात मोठ्या संख्येने पर्यटक येत असल्याने पर्यटन हंगाम सुरू झाल्याने पॅरॉसिलिग व्यवसाय नाईक यांनी सुरू केला. मात्र तो बंद करण्यासाठी स्थानिकांनी जमाव करून कार्यालयाकडे येत आपल्यासह आपल्या कर्मचाऱ्यांना मारहाण केली. यासंबंधीची तक्रार वेंगुर्ले पोलिसांत नाईक यांनी दाखल केली आहे.
काय आहे पर्यटन व्यावसायीक आणि मच्छिमार यांच्यातील वाद?
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील समुद्र किनाऱ्यावर पारंपारिक पद्धतीने गेली अनेक वर्षे मच्छिमार मासेमारी करतात. शिरोडा-वेळागर समुद्र किनाऱ्यावर पारंपरिक पद्धतीने मासेमारी करताना पॅरासिलिग या क्रीडा प्रकारामुळे मासे त्या भागातून दूर जातात. असा मच्छिमारांचा समज आहे. त्यामुळे मासेमारीला मासे मिळत नसल्याने मच्छिमारांचे आर्थिक नुकसान होते. त्यामुळे मासेमारी केल्या जाणाऱ्या या भागात पॅरॉसिलिग हा क्रीडा प्रकार त्यांनी करू नये. यासाठी शासन स्तरावर व लोकप्रतिनीधींकडे मच्छिमारांकडून आपल्या समस्या मांडण्यात आल्या आहेत. स्थानिक मच्छिमारांना मासे मिळत नसल्याने मच्छिमार आणि पर्यटन व्यावसायीक यांच्यात हा वाद सुरू आहे.
पर्यटन व्यावसायिक राजेश नाईक यांनी वेंगुर्ले पोलिसांत तक्रार दिल्यानंतर स्थानिक मच्छिमारांनी पॅरासिलिग बंद ठेवण्याच्या सूचनाही दिल्या होत्या. परंतु, पॅरासिलिग सुरूच ठेवल्याने काही मच्छिमारांनी नाईक यांची भेट घेतली. यावेळी नाईक आणि त्यांच्यासोबत असलेल्या चौदा जणांनी मारहाण केली अशी तक्रार प्रेम नार्वेकर यांनी पोलिसांत केली. त्यामुळे परस्परविरोधी तक्रारी वरून एकूण 29 जणांवर वेंगुर्ला पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक विनायक केसरकर करीत आहेत.
सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक सिंधुदुर्ग जिल्ह्यात येणार आहेत. कोरोनामुळे गेली दोन वर्षे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन व्यावसाय ठप्प आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पर्यटन व्यावसायाचे आर्थिक नुकसान झाले. त्यामुळे पर्यटन व्यावसायिक आणि स्थानिक मच्छिमार यांच्यातील वाद लवकरात लवकर मिटवून प्रशासनाने दोघांनाही योग्य प्रकारे आपला व्यावसाय करण्यास भाग पाडले तर पर्यटनाला चालना मिळेल सोबतच स्थानिक मच्छिमारांनाही रोजगार मिळेल.
इतर महत्वाच्या बातम्या
Farmers Protest : ... तर तीन तासांत मागे घेणार आंदोलन, शेतकऱ्यांनी सांगितल्या अटी
मुंबईकरांसाठी गूड न्यूज, आता दीड तासांचा प्रवास होणार फक्त 36 मिनीटांत