एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
सावकाराच्या छळामुळे लातूरच्या तरुणाची पिंपरीत आत्महत्या
पिंपरी/लातूर : महाराष्ट्रात सावकाराच्या जाचामुळे गोरगरीबांचं जगणं मुश्कील झाल्याचं चित्र आहे. दोन पैसे अधिक मिळतील म्हणून लातूरच्या महेश क्षीरसागर यांनी पिंपरी-चिंचवड गाठलं. वडापावच्या व्यवसायातून कुटुंबाला हातभार लावणं सुरु होतं, पण त्याचवेळी सावकारानं मात्र क्षीरसागर यांना जगू दिलं नाही.
आत्महत्येपूर्वी संजय यांनी लिहिलेली चिठ्ठी :
माझ्या कुटुंबाला एवढंच सांगू इच्छितो की मी आत्महत्या करत आहे. त्यामुळे मला माफ करता आलं तर माफ करा. मी संजय पिसाळ, शास्त्रीचौक आनंद नगर या व्यक्तीमुळे आत्महत्या करत आहे. त्या माणसाला मी 70 हजारांचे 7 लाख 50 हजार दिले. तरी सुद्धा हा माणूस दमदाटी आणि शिवीगाळ करतो आहे. कुटुंबाला मारुन टाकीन असा दम देऊन 3 लाखाचा तगादा लावत आहे. माझ्याकडून त्यानं दमदाटी करुन त्याच्या डायरीत लिहून घेऊन माझी सही घेतली आहे. त्यामुळे मी हे कृत्य करत आहे.
सावकाराच्या जाचानं आणखी एकाचा जीव गेला. मुळचे लातूरचे असलेल्या महेश क्षीरसागर यांनी पिंपरीत गळफास घेऊन आत्महत्या केली. पिंपरीत वडापावचा व्यवसाय करणाऱ्या महेश यांनी संजय पिसाळकडून 70 हजार व्याजावर घेतले. 70 हजारांचे साडे सात लाख संजयच्या घशात घातले तरी त्या सावकाराचं समाधान झालं नाही. घरची परिस्थिती फारशी बरी नाही. त्यातच मुलगा केल्यानं कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. भोसरी पोलीस स्टेशनमध्ये सावकार संजय पिसाळवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सावकाराच्या मारहाणीने अपमानाची भावना, उस्मानाबादेत तरुणाची आत्महत्या
उस्मानाबादमध्ये काही दिवसांआधीच सावकाराच्या जाचाला कंटाळून तरुणानं आत्महत्या केली आणि आता महेश क्षीरसागर यांनीही मृत्युला कवटाळलं आहे. त्यामुळे सावकाराविरोधात कायदे झाले, पण सावकाराचा जाच पोलीस कधी घालवतील हा प्रश्न आहे.अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
क्रिकेट
निवडणूक
Advertisement