Latur Rain: मागील तीन ते चार दिवसापासून लातूर जिल्ह्यात सातत्याने पावसाची हजेरी लावली आहे. संततधार पावसाने नदी नाल्यांमधून ओसंडून पाणी वाहत आहे.  मागील चार ते पाच दिवसापासून सततच्या पावसामुळे तिरू नदीला खूप पाणी आलं आणि येथील रस्ता आणि पर्यायी पूर वाहून गेला आहे. याचा थेट परिणाम 28 गावांना वर झाला असून जनजीवन विस्कळीत झाले आहे.


मागील तीन दिवसाच्या सततच्या पावसाने पर्यायी पूल वाहून गेलाय. महाराष्ट्र आंध्र प्रदेश कर्नाटक या राज्यासह 28 गावांचा संपर्क असणारा पूल वाहून गेल्याने मोठी अडचण निर्माण झाली आहे.


पर्यायी पूल होता, तो ही गेला वाहून


सततच्या पावसामुळे नदी नाल्यांना ओसंडून पाणी वाहत आहे.. उदगीर तालुक्यातील अतनुर येथील पर्यायी पूल वाहून गेल्यामुळे मुळे वाहतूक ठप्प झाली आहे. अतनूर हे गाव महाराष्ट्र कर्नाटक आणि आंध्र प्रदेश या सीमारेषेंना लागून आहे.. या रस्त्यावरील पुलाचे काम सुरू असल्याने पर्यायी पूल आणि रस्ता निर्माण करण्यात आला होता... मात्र. अतनूर ,गव्हाण, मेवापूर ,चिंचोली, गुत्ती , जळकोट, घोणसी-अतनूर, बाराहाळी, देगलूर, मुखेड, नळगीर अश्या 28 गावांना याचा फटका बसला आहे.


विदर्भातही गावांना पुराने घातला वेढा


राज्यात सध्या जोरदार पावसाची हजेरी लागत असून विदर्भातील गावांना पुराने वेढा घातला आहे. भामरागड तालुक्यातील 100हुन अधिक गावांचा कालपासून थेट संपर्क तुटला आहे. तर भामरागड अक्षरक्ष: जलमय झालं आहे. सद्याची स्थिती बघितलं तर भामरागड शहरातील मुख्य बाजारपेठापर्यत पुराचं पाणी शिरलं आहे. त्यामुळे 50हुन अधिक दुकाने, घरे पाण्याखाली आले आहेत. जिल्ह्यातील पाऊसाची एकंदरीत स्थिती बघितलं तर काही भागात पावसाने काहीशी विश्रांती घेतल्याचे चित्र आहे. तर काही भागात रिमझिम पाऊस पडतो आहे.


वर्धा नदीला पूर, अनेक मार्ग बंद


यवतमाळ जिह्यात गेल्या चार दिवसापासून सुरू असलेल्या पावसामुळे नदी नाले दुथडी भरून वाहत आहे. तर मारेगाव तालुक्याच्या कोसारा गावाजवळ वाहनाऱ्या वर्धा नदीला पूर आला असून पुलावरून दोन ते तीन फूट पाणी वाहत आहे. त्यामुळे  कोसरा ते सोईट वाहतूक बंद करण्यात आली. तर वणी तालुक्यात आलेल्या पुरामुळे शेलू खुर्द मार्ग आणि शिवणी ते चिंचोली मार्ग बंद झाला आहे. आज सकाळी 10 वाजेपर्यंत जिल्ह्यात सरासरी 42. 90 मिलिमीटर पाऊस पडला. त्यामुळे 24 महसूल मंडळात अतिवृष्टी झालीय. त्यात 16 घरांची ही पडझड झाली.