Gulabrao Patil vs Gulabrao Deokar जळगाव : विधानसभा निवडणुकीसाठी (Vidhan Sabha Election) अद्याप कुठल्याचं पक्षाने उमेदवार जाहीर केले नसले तरी जळगाव ग्रामीण मतदारसंघात मात्र मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) आणि माजी मंत्री गुलाबराव देवकर (Gulabrao Deokar) यांच्यात लढत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या दोघा नेत्यांनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्यासही सुरुवात केली आहे. या दोन गुलाबरावांमधील टक्कर राज्यात चर्चेचा विषय राहणार असल्याची चिन्हे आतापासूनच दिसू लागली आहेत. 


जळगाव (Jalgaon News) जिल्ह्यातील जळगाव ग्रामीण मतदारसंघात (Jalgaon Rural Assembly Constituency) मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह महाविकास आघाडीचे नेते माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी आपला मतदारसंघ गेल्या काही दिवसांपासून पिंजून काढण्यास सुरू केली आहे. दोन्ही नेते आपण केलेल्या कामांचा आणि करणार असलेल्या कामांबाबत जनतेत प्रचार आणि प्रसार करण्यासाठी धडपड करत असल्याचं पाहायला मिळत आहे. 


देवकरांचा पाटलांवर आरोप


एकीकडे दोन्ही नेते प्रचार करताना पाहायला मिळत असून दुसरीकडे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्याची एकही संधी सोडत नसल्याचे चित्र आहे. मंत्री गुलाबराव पाटील हे त्यांनी केलेल्या कामाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करत आहेत. तर अवैध धंद्यांसह रस्त्यांच्या नित्कृष्ट दर्जाच्या कामासाठी ठेकेदाराकडून कमिशन घेत असल्याचा आरोप माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी गुलाबराव पाटलांवर केला आहे. 


पाटलांचे देवकरांना प्रत्युत्तर


गुलाबराव देवकर यांच्या आरोपाला मंत्री गुलाबराव पाटील यांनी ही उत्तर दिले आहे. आपला विरोधी उमेदवार म्हणून ते अनेक वेळा राहिले आहेत. त्यामुळे ते आताही उमेदवार राहिले तर नवल नाही. या मतदार संघात त्यांच्या व्यतिरिक्त कोणीही इच्छुक उमेदवार नाही. त्यांना निवडणूक जिंकण्यासाठी कोणतेही मुद्दे नसल्याने ते माझ्यावर वेगवेगळे आरोप करत आहेत. माझ्या विरोधात अवैध धंद्यांचा ते आरोप करतात. हा आरोप त्यांनी सिद्ध करून दाखवावा. आपले गेल्या वीस वर्षापासून परवाना असलेले एकच बियर बारचे दुकान आहे. तेही आपण भाड्याने दिले असल्याचं मंत्री गुलाबराव पाटील यांनी म्हटले आहे. या दोन्ही नेत्यांमधील आरोप-प्रत्यारोप पाहिले तर आगामी काळात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीत या दोन्ही नेत्यात काट्याची टक्कर होणार असल्याची चिन्हे आतापासून दिसू लागली आहेत. 


आणखी वाचा 


'हैदराबादच्या नोंदी आणायच्या असतील तर...'; जरांगेंच्या इशाऱ्यावर नेमकं काय म्हणाले गुलाबराव पाटील?