एक्स्प्लोर

अविनाश चव्हाण हत्या : संशयितांच्या अटकेनंतरच मृतदेह ताब्यात घेऊ, नातेवाईकांची भूमिका

12 जून 2018 रोजी 'स्टेप बाय स्टेप' क्लासचे संचालक अविनाश चव्हाण यांनी गुणवान विद्यार्थ्यांचा सत्कार करताना तब्बल एक कोटी रुपयांची बक्षीसं वाटली होती. त्यानंतर बरोबर 13 दिवसानंतर अविनाशची रात्री दीड वाजता दोन गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.

लातूर : 'स्टेप बाय स्टेप' क्लासचे संचालक अविनाश चव्हाण यांच्या हत्याने लातूरसह राज्यभरात खळबळ उडाली. चव्हाण यांच्या हत्येला 24 तास उलटल्यानंतरही गुन्हेगारांना अद्याप अटक करण्यात आली नाही. त्यातच, संशयितांना अटक करत नाहीत, तोपर्यंत अविनाश चव्हाण यांचा मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका चव्हाणांच्या नातेवाईकांनी घेतली आहे. लातूर पोलिस अधीक्षकांसहो अविनाश चव्हाण यांचे नातेवाईक चर्चा करणार आहेत. त्यानंतरच मृतदेह ताब्यात घ्यायचा की नाही, यावर अंतिम निर्णय घेण्याची नातेवाईकांनी भूमिका घेतली आहे. काय झालं त्या दिवशी? लातुरातील प्रसिद्ध अशा ‘स्टेप बाय स्टेप’ क्लासचे संचालक अविनाश चव्हाण यांची 24 जूनच्या रात्री हत्या झाली. आपल्या घराकडे जात असताना शिवाजी शाळेजवळ त्यांच्या गाडीवर तीन गोळ्या झाडण्यात आल्या. यात एक गोळी त्याच्या उजव्या छातीत लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. अविनाश चव्हाण स्वत:च गाडी चालवत होते. यावेळी गाडीत ते एकटेच होते. त्यांच्यावर तीन गोळ्या झाडण्यात आल्या. चव्हाण यांच्यावर हल्ल्यासाठी हल्लेखोर दबा धरुन बसला होता की त्यांचा पाठलाग करत होता, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. या घटनेची माहिती मिळताच लातूरचे पोलीस अधीक्षक शिवाजी राठोड, डीवायएसपी हिंमत जाधव, डीवायएसपी गणेश किंद्रे, स्थानिक गुन्हे शाखेचे एपीआय सुधाकर बावकर, पीआय केशव लटपटे यांच्यासह मोठा पोलीस बंदोबस्त घटनास्थळी हजर होते. अतिशय उच्च्भ्रू लोकवस्ती असलेल्या भागात अविनाश चव्हाण यांची हत्या झाली आहे. पोलीस आता पुढील तपास करत आहेत. हत्येचे नेमके कारण काय, याचा शोध पोलीस घेत आहेत. अविनाश चव्हाण यांची हत्या आणि क्लासेसची स्पर्धा शिक्षणामुळे प्रगती होते हे खरं असलं, तरी त्याच शिक्षणाला पैशांचा दर्प आला की, काही तरी अघटित घडणार हे निश्चित असतं. लातूरमध्ये असंच काहीसं झालं. ज्याने विद्यार्थ्यांच्या बक्षिसांवर एक कोटी रुपये खर्च केले. ज्याने जिमच्या उद्घाटनासाठी सनी लिओनीला लातूरमध्ये आणलं होतं, त्या अविनाश चव्हाण यांची हत्या झाली आहे. 12 जून 2018 रोजी 'स्टेप बाय स्टेप' क्लासचे संचालक अविनाश चव्हाण यांनी गुणवान विद्यार्थ्यांचा सत्कार करताना तब्बल एक कोटी रुपयांची बक्षीसं वाटली होती. त्यानंतर बरोबर 13 दिवसानंतर अविनाशची रात्री दीड वाजता दोन गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. गेल्या वर्षी 31 मे रोजी अविनाशनं आपल्या जिमच्या उद्गाटनासाठी सनी लिओनिला खास विमानानं लातूरला आणलं होतं. तेव्हापासून अविनाश चव्हाण चर्चेत होते. निवृत्त पोलिसाचा मुलगा असलेल्या अविनाश यांनी दोन वर्षांपूर्वी खाजगी शिकवणी सुरु केली. त्यातून आलेल्या पैश्यातून लातूर शहरात मुख्य रस्त्यावर जिम सुरु केलं. नांदेडच्या शाखेचं कामही जोरात सुरु होतं. लातूर पॅटर्नचा गवगवा झाल्यापासून लातूर शहरात सुमारे 100 शिकवण्या सुरु झाल्या आहेत. नियमित आणि पुन्हा परीक्षा देणारे असे 25 हजार विद्यार्थी या शहरात शिकतात. तीन विषयांसाठी मिळून प्रत्येक विद्यार्थ्याला 50 हजार फिस द्यावी लागते. त्यातून सुमारे 1200 कोटींचा बेबंद व्यवहार होतो. कोणताही शिकवणीवाला कसलाच कर भरत नाही. या साम्राज्यात कोणीची भर होऊ नये यासाठी प्रसंगी क्लास चालकांमध्ये हाणामारीचे आणि तणावाचे नित्य नेमाने प्रकार घडतात. क्लास चालकांकडून खंडणी उकळणारी समांतर टोळ्या इथे काम करतात. त्यातूनच ही हत्या झाली असावी, असं पोलिसांना वाटत आहे. संबंधित बातम्या : लातुरातील ‘स्टेप बाय स्टेप’ क्लासच्या संचालकाची हत्या

महत्त्वाच्या बातम्या

Girish Vyas: आधी पक्षाच्या कार्यप्रणालीवर आगपाखड, आता मुख्यमंत्र्यांच्या शिष्टाईनंतर गिरीश व्यासांची सावरासावर; म्हणाले, पक्ष नेतृत्त्वाला अनेकदा कटू निर्णय घ्यावेच लागतात
आधी पक्षाच्या कार्यप्रणालीवर आगपाखड, आता मुख्यमंत्र्यांच्या शिष्टाईनंतर गिरीश व्यासांची सावरासावर; म्हणाले, पक्ष नेतृत्त्वाला अनेकदा कटू निर्णय घ्यावेच लागतात
Raju Shetti: ऊसदर जाहीर न करता ऊस तोडायला ती तुमच्या बापाची पेंड आहे का? राजू शेट्टींचा दिलीप वळसे पाटलांवर हल्लाबोल; म्हणाले, तेव्हा तुम्ही गोट्या खेळत होता का?
ऊसदर जाहीर न करता ऊस तोडायला ती तुमच्या बापाची पेंड आहे का? राजू शेट्टींचा दिलीप वळसे पाटलांवर हल्लाबोल; म्हणाले, तेव्हा तुम्ही गोट्या खेळत होता का?
Shardiya Navratri 2026: तुळजाभवानी देवीच्या खजिन्यात 253 किलो सोने, 4,523 किलो चांदी! माहिती अधिकारातून ऐतिहासिक ठेव्याची माहिती समोर
तुळजाभवानी देवीच्या खजिन्यात 253 किलो सोने, 4,523 किलो चांदी! माहिती अधिकारातून ऐतिहासिक ठेव्याची माहिती समोर
Soybean Rates Today: दुष्काळाने सोयाबीन हिरावलं; एकेका दाण्यासाठी शेतकरी धडपडतोय; तुमच्या बाजारसमितीत सोयाबीनला काय भाव मिळतोय?
दुष्काळाने सोयाबीन हिरावलं; एकेका दाण्यासाठी शेतकरी धडपडतोय; तुमच्या बाजारसमितीत सोयाबीनला काय भाव मिळतोय?

व्हिडीओ

Shetitil Navdurga | Bharti Nirgude | घरात संकट होतं, पण शेतात तिची हिंमत पिकत होती!
India Alliance Supreme Court Morcha : विरोधकांची 'सुप्रीम' धाव; कुणाकुणावर घाव? | Special Report ABP Majha
Abhijeet Dipke vs Delhi Police : दिपके, पोलीस भिडले; कोण कुणाला नडले? | Special Report ABP Majha
Sunetra Pawar Speech : अजित पवारांचे नाव घेताना सुनेत्रा पवार भावुक, भावनिक भाषण
MPSC Protest Pune: पुण्यातील तिन्ही आंदोलनं कशी गुंडाळली?; Inside Story

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raju Shetti: ऊसदर जाहीर न करता ऊस तोडायला ती तुमच्या बापाची पेंड आहे का? राजू शेट्टींचा दिलीप वळसे पाटलांवर हल्लाबोल; म्हणाले, तेव्हा तुम्ही गोट्या खेळत होता का?
ऊसदर जाहीर न करता ऊस तोडायला ती तुमच्या बापाची पेंड आहे का? राजू शेट्टींचा दिलीप वळसे पाटलांवर हल्लाबोल; म्हणाले, तेव्हा तुम्ही गोट्या खेळत होता का?
Soybean Rates Today: दुष्काळाने सोयाबीन हिरावलं; एकेका दाण्यासाठी शेतकरी धडपडतोय; तुमच्या बाजारसमितीत सोयाबीनला काय भाव मिळतोय?
दुष्काळाने सोयाबीन हिरावलं; एकेका दाण्यासाठी शेतकरी धडपडतोय; तुमच्या बाजारसमितीत सोयाबीनला काय भाव मिळतोय?
Gokul Election: जागावाटपात एकमेकांचा घामटा काढल्यानंतर आता महायुतीला क्रॉस व्होटिंगचा धसका; इतिहासात पहिल्यांदाच ठरावधारकांना सहलीवर पाठवणार, शपथा सुद्धा घेतल्या जाणार!
जागावाटपात एकमेकांचा घामटा काढल्यानंतर आता महायुतीला क्रॉस व्होटिंगचा धसका; इतिहासात पहिल्यांदाच ठरावधारकांना सहलीवर पाठवणार, शपथा सुद्धा घेतल्या जाणार!
Abhijeet Dipke Post Sonakshi Sinha Comment: अभिजीत दिपकेंची आजीसाठी खास पोस्ट, डोळे पाणावणारं एका शब्दाचं कॅप्शन, सोनाक्षी सिन्हा कमेंट करुन म्हणाली...
अभिजीत दिपकेंची आजीसाठी खास पोस्ट, डोळे पाणावणारं एका शब्दाचं कॅप्शन, सोनाक्षी सिन्हा कमेंट करुन म्हणाली...
Thane Crime Pradeep Purnekar: प्रदीप पूर्णेकर प्रकरणातला पाचवा हेल्मेटधारी मारेकरी पोलिसांनी पकडला, पण मुलाला ती गोष्ट खटकली, म्हणाला....
प्रदीप पूर्णेकर प्रकरणातला पाचवा हेल्मेटधारी मारेकरी पोलिसांनी पकडला, पण मुलाला ती गोष्ट खटकली, म्हणाला....
Delhi CJP protest Jean Dreze: दिल्लीतील सरकारविरोधी आंदोलनातील 'तो' परदेशी व्यक्ती कोणी सोम्यागोम्या नव्हे तर आहे विख्यात अर्थतज्ज्ञ, कोण आहेत ज्यां द्रेज?
दिल्लीतील सरकारविरोधी आंदोलनातील 'तो' परदेशी व्यक्ती कोणी सोम्यागोम्या नव्हे तर आहे विख्यात अर्थतज्ज्ञ, कोण आहेत ज्यां द्रेज?
Sara Tendulkar birthday: सचिन तेंडुलकरांच्या लाडक्या लेकीचा वाढदिवस; वहिनी सानिया चंडोकसोबतचा VIDEO व्हायरल
सचिन तेंडुलकरांच्या लाडक्या लेकीचा वाढदिवस; वहिनी सानिया चंडोकसोबतचा VIDEO व्हायरल
Nagpur Crime : आधी स्वतः तलाक दिला, मग पूर्वाश्रमीच्या बायकोनं दुसरं लग्न केल्याचा राग अनावर, नमाज पठणासाठी गेलेल्या वसीमला रस्त्यात गाठलं अन्..., नागपूर हादरलं!
आधी स्वतः तलाक दिला, मग पूर्वाश्रमीच्या बायकोनं दुसरं लग्न केल्याचा राग अनावर, नमाज पठणासाठी गेलेल्या वसीमला रस्त्यात गाठलं अन्..., नागपूर हादरलं!
Embed widget