एक्स्प्लोर

'माझा' इम्पॅक्ट : समृद्धी महामार्गासाठी जमीन देणाऱ्या आजीबाईंना अखेर न्याय

अवघ्या काही तासातच आजीबाईंच्या खात्यात जमिनाच्या मोबदल्याची सर्व रक्कम जमा करण्यात आली.

ठाणे : अधिकाऱ्यांच्या मनमानीसमोर हतबल झालेल्या 90 वर्षीय आजीबाईंना एबीपी माझाच्या बातमीमुळे न्याय मिळाला आहे. जमिनीचा मोबदला मिळत नसल्याने हतबल झालेल्या आजीबाईंनी आत्महत्येचा इशारा देत थेट मुख्यमंत्र्याकडे धाव घेतली होती. हेच वास्तव ‘एबीपी माझा’ने समोर आणलं होतं. त्यानंतर समृद्धी महामार्गाचे भूसंपादन अधिकारी खडबडून जागे झाले. अवघ्या काही तासातच आजीबाईंच्या खात्यात जमिनाच्या मोबदल्याची सर्व रक्कम जमा करण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या समृद्धी महामार्गाला अजूनही शेतकऱ्यांचा विरोध आहे. शहापूर तालुक्यातील दळखण गावात राहणाऱ्या सावित्रीबाई कदम यांनी समृद्धी महामार्गात बाधित होणाऱ्या जमिनीला भूसंपादनासाठी संमती देऊन जमिनीचे खरेदीखत शासनाच्या नावे करून दिले. मात्र, त्यांना मोबदल्यासाठी सरकारी कार्यालयात वारंवार हेलपाटे मारावे लागत होते. त्यातच समृद्धी महामार्गाचे भूसंपादन अधिकारी बाधित शेतकऱ्यांविरोधी जाणीवपूर्वक लालफितीची भूमिका घेत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला. सरकारी अधिकारीच समृद्धीच्या मार्गात खोडा घालत असल्याचा आरोपही शेतकऱ्यांना केला. तर आमच्याकडे जेवढी जमीन होती, ती समृद्धी मार्गात गेल्याने आमचा उदरनिर्वाहाचा प्रश्न उभा ठाकला आहे. आता सरकार आमच्या मरणानंतर जमिनीचा मोबदला देणार का? असा सवालही आजीबाईंनी ‘ एबीपी माझा’शी बोलताना उपस्थित केला होता. एबीपी माझाची बातमी प्रसिद्ध होताच ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी गंभीर दखल घेत या प्रकरणात जातीने लक्ष दिलं. आजीबाईंच्या नातेवाईकांशी दिवसभरातून चार वेळा संपर्क साधला. भूसंपादन अधिकाऱ्यांकडून हे प्रकरण जाणून घेत, तातडीने जमिनीचा मोबदला देण्याचे निर्देश दिल्याची माहिती आजीबाईंच्या नातेवाईकाने दिली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा, तुमच्यासह त्यांच्या घरी येतो, मग चेअरमन असो की कोणी असो, शरद पवारांचा थेट इशारा
मला या रस्त्यानं जायचं नाही, माणसं आपली आहेत, त्यांना कुणीतरी दम दिला असेल, त्यांना एक सांगणं.. : शरद पवार
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vidhan Sabha Election : राज्यात 157 बंडखोर रिंगणात, पक्षांकडून बंडखोरांवर धडक कारवाईKolhapur Vidhan Sabha Election : कोल्हापुरातली नामुष्की काँग्रेस कशी पुसून टाकणार? Special ReportSharad Pawar Retirement : पवारांचे पुन्हा निवृत्तीचे संकेत, बारामतीकरांसमोर सहानुभूती कार्डचा वापर?Vidhan sabha Superfast :  महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज : 5 नोव्हेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा, तुमच्यासह त्यांच्या घरी येतो, मग चेअरमन असो की कोणी असो, शरद पवारांचा थेट इशारा
मला या रस्त्यानं जायचं नाही, माणसं आपली आहेत, त्यांना कुणीतरी दम दिला असेल, त्यांना एक सांगणं.. : शरद पवार
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
Embed widget