एक्स्प्लोर

Solapur Lockdown | सोलापुरात होणाऱ्या लॉकडाऊनला कामगार नेते नरसय्या आडम यांचा विरोध, रस्त्यावर उतरण्याचा इशारा

वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे सोलापूर शहरात 10 दिवसांचा कडक लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. या लॉकडाऊनला कामगार नेते नरसय्या आडम यांनी विरोध करत रस्त्यावर उतरण्याचा दिला इशारा दिला आहे.

सोलापूर : सोलापुरात कोरोना बाधितांची वाढणाऱ्या संख्येसाठी प्रशासन जबाबदर असून, त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचे नियोजन नाही. लॉकडाऊन करुन श्रमिकांना बेरोजगार करणाचे हे षडयंत्र असल्याचा आरोप ज्येष्ठ कामगार नेते नरसय्या आडम यांनी केला. सोलापुरात कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी 16 जुलैच्या मध्यरात्री पासून 26 जुलैपर्यंत लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. यालाच माजी आमदार नरसय्या आडम यांनी विरोध केला आहे. 24 मार्चपासून सलग 72 दिवस लॉकडाऊन होता. या काळात पंतप्रधान नरेंद मोदी यांनी सांगितलं होतं की 18 दिवसात महाभारताचे युद्ध जिंकलं, 21 दिवसात कोरोनाचे युद्ध आपण जिंकल्याशिवाय राहणार नाही. अशा प्रकारचे वक्तव्य केले होते. केंद्र सरकारच्या समितीने देखील 16 मे पर्यंत कोरोना हद्दपार होईल, असा दावा केला होता. मात्र, वास्तविकता कोरोनाच्या चाचण्या नीट होत नाहीयेत. रुग्णांना व्यवस्थित उपचार मिळत नाहीयेत. सामान्य जनतेला सोबत घेऊन करण्याचे कोणतेही नियोजन नाहीये. असे असताना लॉकडाऊन शिवाय कोणताच पर्याय नाही, अशा प्रकारच्या वल्गना प्रशासकीय अधिकारी करत असल्याची टीका कॉम्रेड नरसय्या आडम यांनी केली. तर सोलापुरातील श्रमिक कामगार रस्त्यावर उतरतील सोलापूर शहरात विडी कामगार, यंत्रमाग कामगार, सफाई कर्मचारी, रिक्षा चालक यांच्यासारखे जवळपास 3 लाख श्रमिक आहेत. पूर्णपणे लॉकडाऊन करुन या सर्व श्रमिकांना पुन्हा एकदा बेरोजगार करण्याचा डाव प्रशासनाने आखला आहे. म्हणून राज्य सरकारने सोलापुरातील लॉकडाऊनचा निर्णय तात्काळ मागे घेण्याच्या सुचना द्याव्यात. तसेच प्रत्येक श्रमिकाला 10 हजार रुपये उदरनिर्वाह अनुदान द्यावे, अशी मागणी देखील माजी आमदार नरसय्या आडम यांनी यावेळी केली. जर लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय तात्काळ मागे घेतला नाही तर सोलापुरातील श्रमिक कामगार रस्त्यावर उतरतील, असा इशारा देखील नरसय्या आडम यांनी दिला. सोलापुरात आज पहिल्यांदा शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात जास्त रुग्ण शहरात 10 दिवसांचा कडक लॉकडाऊन सोलापुरात दिवसेंदिवस कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. जिल्ह्यातील सर्वाधिक रुग्ण हे सोलापूर शहरात आहेत. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता ही साखळी तोडण्यासाठी शहरात 10 दिवसांचा कडक लॉकडाऊन शुक्रवारी रात्री जाहीर करण्यात आला आहे. 16 जुलैच्या मध्यरात्रीपासून 26 जूलैपर्यंत लॉकडाऊन लागू असणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली. सोलापूर शहर आणि शहरालगतच्या ज्या गावात कोरोनाचा प्रादुर्भाव आहे, अशा गावातही लॉकडाऊन लागू करणार असल्याचे जिल्हाधिकारी शंभरकर यांनी सांगितले. नागरिकांनी खरेदीसाठी बाजारात गर्दी करु नये या लॉकडाऊनच्या काळात फक्त रुग्णालय, मेडिकल, दूध सुरु राहणार आहेत. या शिवाय पोलीस प्रशासनाचे दोन पेट्रोल पंप अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी सुरु राहणार असल्याची माहिती मनपा आयुक्त पी. शिवशंकर यांनी दिली. या शिवाय सर्व आस्थापना बंद राहणार असल्याची माहिती दिली आयुक्तांनी दिली. भाजीपाला, किराणा, इत्यादी अत्यावश्यक साहित्यांच्या खरेदीसाठी 5 दिवसांचा वेळ आहे. त्यामुळे नागरिकांनी खरेदीसाठी बाजारात गर्दी करु नये असे आवाहन पोलिस आयुक्त अंकूश शिंदे यांनी यावेळी केले. Solapur Lockdown Extended | सोलापूरमधील लॉकडाऊनमध्ये वाढ, 26 जुलैपर्यंत सोलापुरात कडक लॉकडाऊन!

मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे शिक्षण घेतलेलं असून एबीपी माझामध्ये मागील 9 वर्षांपासून कार्यरत आहे. मुंबईत assistant प्रोड्यूसर म्हणून काम केल्यानंतर मागील 7 वर्षांपासून सोलापूर जिल्हा प्रतिनिधी पदावर कार्यरत.

Read More

महत्त्वाच्या बातम्या

कपिल सिब्बल यांचे दावे बिनबुडाचे, माझाच निर्णय खरा ठरणार, राहुल नार्वेकर यांचं प्रत्युत्तर!
कपिल सिब्बल यांचे दावे बिनबुडाचे, माझाच निर्णय खरा ठरणार, राहुल नार्वेकर यांचं प्रत्युत्तर!
Snakebite : सर्पदंश आता ‘अधिसूचित आजार’ घोषित; साप चावल्यास लस, उपचार अन् मृत्यूची होणार नोंद
सर्पदंश आता ‘अधिसूचित आजार’ घोषित; साप चावल्यास लस, उपचार अन् मृत्यूची होणार नोंद
BHMS Doctor Registration : मोठी बातमी! BHMS डॉक्टरांची नोंदणी बंद; न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत वैद्यकीय शिक्षण विभागाचा मोठा निर्णय
मोठी बातमी! BHMS डॉक्टरांची नोंदणी बंद; न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत वैद्यकीय शिक्षण विभागाचा मोठा निर्णय
Maharashtra Government Cabinet Decision: पंढरपुरातील विशेष पुनर्वसन धोरणास मंजुरी ते जायकवाडीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी 6,477 कोटींची तरतूद; मंत्रिमंडळ बैठकीत 10 मोठे निर्णय
पंढरपुरातील विशेष पुनर्वसन धोरणास मंजुरी ते जायकवाडीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी 6,477 कोटींची तरतूद; मंत्रिमंडळ बैठकीत 10 मोठे निर्णय

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार, उद्योजकांच्या अडचणी दूर करण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार
Twisha Sharma Death Case: ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
Embed widget