एक्स्प्लोर

कुणाल कामरा आणि संजय राऊत यांची 'उखाड दिया' मुलाखत

या मुलाखतीत कंगना ते अर्णब आणि सुशांत ते कन्हैय्या या सर्व विषयांवर दिलखुलास गप्पा झाल्या आहेत.

मुंबई : शिवसेना नेते संजय राऊत आणि स्टँड अप कॉमेडियन कुणाल कामरा यांची लवकरच 'शट अप यार कुणाल' या पॉडकास्ट मध्ये मुलाखत होणार असल्याचं दोघांनीही ट्विटरवरून जाहीर केलं होतं. या पोस्टचं अनेकांनी स्वागत केलं तर काहींनी ट्रोलही केलं.

आज मुंबईत खारमधल्या एका खासगी स्टुडियोत या मुलाखतीचं चित्रीकरण करण्यात आलं. थोड्याच दिवसात याचं समाज माध्यमांवर प्रक्षेपण होणार आहे. संजय राऊत हे त्यांच्या आक्रमक शैलीतून तर कुणाल कामरा हा त्याच्या उपरोधक कॉमेडीच्या माध्यमातून कायमच मोदी आणि भाजपवर निशाणा साधत असल्यामुळे कायम चर्चेत असतात.

आजच्या या मुलाखतीत कंगना ते अर्णब आणि सुशांत ते कन्हैय्या या सर्व विषयांवर दिलखुलास गप्पा झाल्या आहेत. इतकंच नाही तर मुलाखतीच्या केंद्रस्थानी बुलडोझर हे प्रॉप होते आणि या बुलडोझरला पद्मश्री का दिला पाहिजे यावरही या मुलाखतीतून खुलासा होणार आहे. त्यामुळे दोघांच्या या मुलाखतीबद्दल नेटकऱ्यांमध्ये चांगलीच उत्सुकता आहे.

दरम्यान शिवसेना खासदार संजय राऊत आपल्या सडेतोड वक्तव्यांमुळे कायमच चर्चेत असतात. सध्या अभिनेत्री कंगना रनौत मुंबईबद्दल केलेल्या वक्तव्यावरुन संजय राऊतांनी तिच्यावर निशाणा साधला होता. संजय राऊतांनी सामनासाठी घेतलेली राजकीय नेत्यांची मुलाखतीची देशभर चर्चा असते, मग ती मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची असो किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची. मात्र यावेळी राऊत मुलाखत घेताना नाही तर मुलाखत देताना दिसतील. संजय राऊत यांची मुलाखत कुणाल कामरा घेतली आहे.

स्टँड अप कॉमेडियन कुणाल कामराने रमित वर्मासह 2017 मध्ये 'शट अप या कुणाल'ची सुरुवात केली होती. या शोमध्ये एक किंवा त्यापेक्षा जास्त पाहुण्यांना निमंत्रण देऊन त्यांच्याशी संवाद साधला जातो. शिवाय काही बातम्यांचे किंवा डिबेट शोमधील व्हिडीओ क्लिप्स, मजेदार व्हिडीओ दाखवून त्याबाबत काही प्रश्न विचारले जातात. त्यामुळे या मुलाखतीत संजय राऊत काय बोलणार याची उत्सुकता आहे.कुणाल कामराच्या या शोमध्ये याआधी एनडीटीव्हीचे रवीश कुमार, गीतकार जावेद अख्तर यांसारखे नामवंत व्यक्ती सहभागी झाले होते.

महत्त्वाच्या बातम्या

Gokul : अमूल नंतर आता गोकुळच्या दूध दरातही वाढ होणार; नूतन अध्यक्षांचे संकेत, पहिल्याच बैठकीत प्रस्ताव येणार
अमूल नंतर आता गोकुळच्या दूध दरातही वाढ होणार; नूतन अध्यक्षांचे संकेत, पहिल्याच बैठकीत प्रस्ताव येणार
Nana Patole: राहुल गांधींनी केलेले फोन टॅप करण्याचे आरोप खोटे नसून ती वस्तुस्थिती, कारण 'वरचा नरेंद्र आणि खालचा देवेंद्र...; नाना पटोलेंचा घणाघात
राहुल गांधींनी केलेले फोन टॅप करण्याचे आरोप खोटे नसून ती वस्तुस्थिती, कारण 'वरचा नरेंद्र आणि खालचा देवेंद्र...; नाना पटोलेंचा घणाघात
Satej Patil and Rajesh kshirsagar: सयाजी हॉटेलचं बांधकाम चुकीचं, शिक्षणसंस्थांमध्ये लाखोचं डोनेशन, चंद्रकांतदादा काय चुकीचं बोलले, आता एकनाथ शिंदेंचा आमदार सतेज पाटलांवर तुटून पडला
सयाजी हॉटेलचं बांधकाम चुकीचं, शिक्षणसंस्थांमध्ये लाखोचं डोनेशन, एकनाथ शिंदेंचा आमदार सतेज पाटलांवर तुटून पडला
नाशिकमध्ये अमृत भारत एक्स्प्रेसच्या डब्ब्यात कारवाई, 1 कोटी 48 लाखांच्या रोकडसह संशयित व्यक्ती ताब्यात
नाशिकमध्ये अमृत भारत एक्स्प्रेसच्या डब्ब्यात कारवाई, 1 कोटी 48 लाखांच्या रोकडसह संशयित व्यक्ती ताब्यात

व्हिडीओ

Satej Patil Coffee With Kaushik: शांत झालेल्या गोकुळमध्ये पवारांची एन्ट्री, सतेज पाटलांचे गौप्यस्फोट
Sanjay Raut PC : शरद पवार गट चर्चेलाच तयार नाही, मग सुनेत्रा पवार विलीनीकरण कोणासोबत करणार?
Hasan Mushrif PC Kolhapur : संजय राऊतांनी आमच्यापक्षात नाक खुपसू नये, हसन मुश्रीफांचा इशारा
NCP Crisis : शरद पवारांच्या राष्ट्रवादीत विलीनीकरणावरून चार वेगवेगळे मतप्रवाह
Omraje Nimbalkar call : आमच्या गावचा रस्ता कधी करता ? खासदार ओमराजेंना चिमुकल्याचा थेट सवाल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Crime News: आळंदीत दिवसाढवळ्या थरार; भरवस्तीत तरुणावर धारदार कोयत्याने जीवघेणा हल्ला, घटनेचा व्हिडिओ समोर, नेमकं काय घडलं?
आळंदीत दिवसाढवळ्या थरार; भरवस्तीत तरुणावर धारदार कोयत्याने जीवघेणा हल्ला, घटनेचा व्हिडिओ समोर, नेमकं काय घडलं?
Home Loan : डिसेंबरमध्ये गृहकर्ज आणखी महागणार? आरबीआयनं रेपो रेट वाढवल्यास नवं घर घेण्याचं स्वप्न पाहणाऱ्यांना धक्का बसण्याची शक्यता, तज्ज्ञांचा अंदाज काय?
डिसेंबरमध्ये गृहकर्ज आणखी महागणार? आरबीआयनं रेपो रेट वाढवल्यास नवं घर घेण्याचं स्वप्न पाहणाऱ्यांना धक्का बसण्याची शक्यता
दुष्काळात मराठवाड्याला काहीसा दिलासा; जायकवाडीतून डावा-उजव्या कालव्यात सोडले पाणी, बळीराजा सुखावला
दुष्काळात मराठवाड्याला काहीसा दिलासा; जायकवाडीतून डावा-उजव्या कालव्यात सोडले पाणी, बळीराजा सुखावला
Gold Silver Rate: सोन्यात साडेचार हजारांची तर चांदीत तब्बल 7 हजारांची घसरण; जागतिक घडामोडींचा सराफा बाजारावर मोठा परिणाम
सोन्यात साडेचार हजारांची तर चांदीत तब्बल 7 हजारांची घसरण; जागतिक घडामोडींचा सराफा बाजारावर मोठा परिणाम
नाशिकमध्ये अमृत भारत एक्स्प्रेसच्या डब्ब्यात कारवाई, 1 कोटी 48 लाखांच्या रोकडसह संशयित व्यक्ती ताब्यात
नाशिकमध्ये अमृत भारत एक्स्प्रेसच्या डब्ब्यात कारवाई, 1 कोटी 48 लाखांच्या रोकडसह संशयित व्यक्ती ताब्यात
Chhagan Bhujbal on NCP Merger Video: विलिनीकरणाबाबत अजित पवार अन् जयंत पाटलांची माझ्यासमोरच चर्चा झाली होती; छगन भुजबळांचा गौप्यस्फोट
Video: विलिनीकरणाबाबत अजित पवार अन् जयंत पाटलांची माझ्यासमोरच चर्चा झाली होती; छगन भुजबळांचा गौप्यस्फोट
Indapur Protest :  नीरा नदीत पाणी सोडण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचा एल्गार; इंदापूरातील संत तुकाराम महाराज पालखी मार्गावर तीन तासांपासून रस्त्यारोको आंदोलन
नीरा नदीत पाणी सोडण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचा एल्गार; इंदापूरातील संत तुकाराम महाराज पालखी मार्गावर तीन तासांपासून रस्त्यारोको आंदोलन
CNG and PNG Prices Hike : खिशाला लागणार कात्री! मध्यरात्री CNG आणि PNG महागले; पुणे, नाशिकसह या जिल्ह्यात दरवाढ, जाणून घ्या नवीन दर
खिशाला लागणार कात्री! मध्यरात्री CNG आणि PNG महागले; पुणे, नाशिकसह या जिल्ह्यात दरवाढ, जाणून घ्या नवीन दर
Embed widget