Vaibhav Naik : आर्थिक व्यवहाराप्रकरणी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील आणखी एक नेता अडचणीत सापडला आहे. सिंधुदुर्गमधील उद्धव ठाकरेंच्या गोटातील आमदार वैभव नाईक यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अर्थात एसीबीनं चौकशी केली. तब्बल अर्धा तास एसीबीनं चौकशी केली. त्यानंतर 20 वर्षांतील उत्पन्नाचा हिशोब देण्यासाठी वैभव नाईक यांना आठ दिवसांचा वेळ दिला आहे.
कुडाळ मालवण मतदारसंघाचे आमदार वैभव नाईक यांची शुक्रवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग रत्नागिरी यांच्या कडून चौकशी झाली. साधरणपणे अर्धा तास वैभव नाईक यांची चौकशी करण्यात आली. एसीबीने वैभव नाईक यांना 2002 ते 2022 या कालावधीतील उत्पनाची चौकशी केली. त्याशिया याचा तपशील देण्यासाठी वैभव नाईक यांना आठ दिवसांची मुदत देण्यात आली आहे. आठ दिवसांत सर्व माहिती देण्याचे आदेश एसीबीनं वैभव नाईक यांना दिले आहेत.
लाचलूचपत प्रतिबंधक रत्नागिरी विभागाच्या अधिकाऱ्यांकडून आमदार वैभव नाईक यांच्या मालमत्तेची चौकशी करण्यात आली. कणकवलीत शासकीय विश्रामगृहावर वैभव नाईक यांची चौकशी झाली. लाचलूचपत प्रतिबंधक रत्नागिरी विभागाचे पोलीस उपअधीक्षक सुशांत चव्हाण हे पथकाकडून आमदार नाईक यांची चौकशी केली. दरम्यान 12 ऑक्टोबरला सकाळी 11 वाजता पोलीस उपअधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग रत्नागिरी येथे उपस्थित राहण्यासंदर्भातही वैभव नाईक यांना पत्र देण्यात आले आहे. त्यामुळे अनिल परब यांच्यानंतर कोकणातील शिवसेनेचा आणखी एक नेता अडचणीत सापडला आहे.
दरम्यान सत्ता बदल होताच शिवसेनेच्या अनेक नेत्यांची इडी, सीबीआय मार्फत चौकशी करून कारवाई केली जात असतानाच आता आमदार वैभव नाईक यांची लाचलूचपत प्रतिबंधक विभागा मार्फत चौकशी सुरू करण्यात आली आहे. या अनुषंगाने वैभव नाईक यांचा जबाब नोंदविण्यासाठी 12 ऑक्टोबर ला सकाळी 11 वाजता पोलीस उपअधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग रत्नागिरी येथे उपस्थित राहण्यासंदर्भातही पत्र देण्यात आले आहे.
वैभव नाईक यांची भाजपवर टीका -
गृहखात भाजपकडे असल्याने भाजप दबाव तंत्राचा वापर करत असल्याचा आरोप वैभव नाईक यांनी भाजपवर केला. एसीबीच्या कारवाईनंतर ते बोलत होते. ते म्हणाले की, गेली अनेक वर्षे राजकारण, समाजकारण आणि व्यावसायात आहे. आतापर्यंत अश्या प्रकारे केव्हाही चौकशी झाली नाही. मात्र आता गृहखाते भाजपकडे असल्याने चौकशी केली जात आहे. अश्या प्रकारे कितीही चौकशी करा, मात्र अश्या पद्धतीच्या दबाव तंत्राला भीक घालणार नाही.
इतर महत्वाच्या बातम्या :
Ajit Pawar In Kolhapur : कोल्हापूरमध्येही गद्दार निघालेत, त्यांना जागा दाखवायची आहे! अजित पवारांचा थेट इशारा
'आईवडिलांना शिव्या द्या चालेल, पण मोदी-शाहांना शिव्या देणं सहन करणार नाही'; चंद्रकांत दादांचं वक्तव्य, रोहित पवार म्हणाले....