एक्स्प्लोर

पाचगणीत परदेशी पॅराग्लायडरचा मृत्यू, जमिनीवर उतरताना झाडावर आदळून प्राण गमावले

प्रमाणापेक्षा जास्त हवा असतानाही काल सायंकाळी काही जणांना पॅराग्लायडिंगला सुरुवात केली. मात्र या टीममधील फांग फेक ओ वगळता उर्वरित सर्व जण पुन्हा खाली उतरले. पाचगणीच्या दरीजवळ असलेल्या अभेपुरी गावातील एका झाडावर फांग फेक ओ मृतावस्थेत लटकताना आढळला.

सातारा : साताऱ्यातील पाचगणीत टेबललँडवरुन पॅराग्लायडिंग करणाऱ्या परदेशी पर्यटकाचा मृत्यू झाला. पॅराग्लायडिंग करुन उतरताना झाडावर आदळल्यामुळे त्याचा मृत्यू झाला. फांगा फेक ओ या पर्यटकाला अपघातात प्राण गमवावे लागले. कोरियाहून आलेला पॅराग्लायडर्सचा ग्रुप गेल्या काही दिवसापासून वाई-महाबळेश्वर भागात मुक्कामी आहे. वाईतील स्थानिक मंडळी त्यांना मदत करत आहेत. टेबललँडवरुन उड्डाण केल्यानंतर ते हळूहळू हवेच्या दिशेने आकाशात तरंगतात. प्रमाणापेक्षा जास्त हवा असतानाही काल सायंकाळी काही जणांना पॅराग्लायडिंगला सुरुवात केली. मात्र या टीममधील फांग फेक ओ वगळता उर्वरित सर्व जण पुन्हा खाली उतरले. अंधार पडत चालल्यामुळे सर्व टीम आणि स्थानिकांनी फांग फेक ओचा शोध घेण्यास सुरुवात केली. पाचगणीच्या दरीजवळ असलेल्या अभेपुरी गावातील एका झाडावर फांग फेक ओ मृतावस्थेत लटकताना आढळला. ट्रेकर्स आणि स्थानिकांच्या मदतीने त्याचा मृतदेह खाली उतरवून वाईच्या मिशन रुग्णालयात नेण्यात आला. अंदाज चुकल्यामुळे तो झाडावर आपटला असावा आणि जास्त मार लागल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला असावा, असा अंदाज पोलिसांनी वर्तवला. पॅराग्लायडिंगसारख्या साहसी खेळांवर काही वर्षापूर्वी साताऱ्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी बंदी आणली होती. यातून वादही झाले होते, मात्र तरीही परवानगी नाकारण्यात आली होती. आता कोरियाच्या ग्रुपला कशी आणि कोणी परवानगी दिली, याबाबत वाई पोलिस तपास करत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

'ते मारतात, मला वाचवा..' नगरसेवक रमेश म्हात्रेंच्या अमानुष मारहाणीच्या धक्क्यातून पीडित महिला डॉक्टर अजूनही सावरलेल्या नाहीत, झोपेतही भयकंप
'ते मारतात, मला वाचवा..' नगरसेवक रमेश म्हात्रेंच्या अमानुष मारहाणीच्या धक्क्यातून पीडित महिला डॉक्टर अजूनही सावरलेल्या नाहीत, झोपेतही भयकंप
पाण्यात बुडालेली जनता दिसली नाही, आता हेल्मेट पाहताय; ट्रॅफिक पोलिसाच्या दंडात्मक कारवाईवर वसई-विरारकर संतापले
पाण्यात बुडालेली जनता दिसली नाही, आता हेल्मेट पाहताय; ट्रॅफिक पोलिसाच्या दंडात्मक कारवाईवर वसई-विरारकर संतापले
Video: मिसिंग लिंकवरुन राज ठाकरे म्हणाले, मुख्यमंत्री हिंदीत का बोलले? मिमिक्री आर्टिस्ट म्हणत फडणवीसांचा पलटवार
Video: मिसिंग लिंकवरुन राज ठाकरे म्हणाले, मुख्यमंत्री हिंदीत का बोलले? मिमिक्री आर्टिस्ट म्हणत फडणवीसांचा पलटवार
Eknath Shinde on Missing Link : एक पैशाचा धोका झाला नाही, मिसिंग लिंकवरून टीका करणारे महाराष्ट्र द्रोहीच आहेत, हे राज्याचे दुश्मन; एकनाथ शिंदेंची टिप्पणी
एक पैशाचा धोका झाला नाही, मिसिंग लिंकवरून टीका करणारे महाराष्ट्र द्रोहीच आहेत, हे राज्याचे दुश्मन : एकनाथ शिंदे

व्हिडीओ

SIR Form Maharashtra : SIR चा फॉर्म कसा भरायचा? संपूर्ण माहिती
ABP Majha Headlines Today 7 AM : 10 July 2026: एबीपी माझा हेडलाईन्स : Marathi News Maharashtra
Raj Thackeray Vs Fadnavis Special Report : ठाकरेंची टीका, फडणवीस ते गडकरी, रायकीय फैरीRaj
Bajrang Sonawane Vs Prithviraj Chavan : राष्ट्रवादीत अस्वस्थता? पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
Raj Thackeray On CM : बघून घेऊ म्हणतात, अरे मुख्यमंत्री आहे ना तू... आणि हिंदीमधून का बोलता?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'ते मारतात, मला वाचवा..' नगरसेवक रमेश म्हात्रेंच्या अमानुष मारहाणीच्या धक्क्यातून पीडित महिला डॉक्टर अजूनही सावरलेल्या नाहीत, झोपेतही भयकंप
'ते मारतात, मला वाचवा..' नगरसेवक रमेश म्हात्रेंच्या अमानुष मारहाणीच्या धक्क्यातून पीडित महिला डॉक्टर अजूनही सावरलेल्या नाहीत, झोपेतही भयकंप
पाण्यात बुडालेली जनता दिसली नाही, आता हेल्मेट पाहताय; ट्रॅफिक पोलिसाच्या दंडात्मक कारवाईवर वसई-विरारकर संतापले
पाण्यात बुडालेली जनता दिसली नाही, आता हेल्मेट पाहताय; ट्रॅफिक पोलिसाच्या दंडात्मक कारवाईवर वसई-विरारकर संतापले
Video : सुप्रीम कोर्टात वकिलाचा अभूतपूर्व राडा; सरन्यायाधीशांना उद्देशून अपशब्द, फाईली सुद्धा भिरकावल्या
Video : सुप्रीम कोर्टात वकिलाचा अभूतपूर्व राडा; सरन्यायाधीशांना उद्देशून अपशब्द, फाईली सुद्धा भिरकावल्या
Devendra Fadnavis : राज्यातील 'त्या' शेतकऱ्यांचं 50 हजारांऐवजी 2 लाखांपर्यंतचं कर्ज माफ होणार, प्रोत्साहनपर अनुदानाची 2026-27चं कर्ज भरण्याची अट काढली, देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा
राज्यातील 'त्या' शेतकऱ्यांचं 50 हजारांऐवजी 2 लाखांपर्यंतचं कर्ज माफ होणार, देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
Eknath Shinde on Missing Link : एक पैशाचा धोका झाला नाही, मिसिंग लिंकवरून टीका करणारे महाराष्ट्र द्रोहीच आहेत, हे राज्याचे दुश्मन; एकनाथ शिंदेंची टिप्पणी
एक पैशाचा धोका झाला नाही, मिसिंग लिंकवरून टीका करणारे महाराष्ट्र द्रोहीच आहेत, हे राज्याचे दुश्मन : एकनाथ शिंदे
Video: मिसिंग लिंकवरुन राज ठाकरे म्हणाले, मुख्यमंत्री हिंदीत का बोलले? मिमिक्री आर्टिस्ट म्हणत फडणवीसांचा पलटवार
Video: मिसिंग लिंकवरुन राज ठाकरे म्हणाले, मुख्यमंत्री हिंदीत का बोलले? मिमिक्री आर्टिस्ट म्हणत फडणवीसांचा पलटवार
Tiger Dart: वाघिणीला जेरबंद करणारी 'शेरनी'; प्रियल चोरगडेंनी वाघाच्या पिंजऱ्यात बसून मारला डार्ट
वाघिणीला जेरबंद करणारी 'शेरनी'; प्रियल चोरगडेंनी वाघाच्या पिंजऱ्यात बसून मारला डार्ट
Eknath Shinde : पाणी की तरह ये दोस्ती हमारी कोई भी कोई कितना भी चाहे जुदा नही होंगे, एकनाथ शिंदेंचं देवेंद्र फडणवीसांसोबतच्या मैत्रीवर शायरीतून भाष्य
हम वो नही जो दिल तोड देंगे, थाम कर हात फिर साथ छोड देंगे, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
Embed widget