एक्स्प्लोर

कोपर्डी बलात्कार: निर्भयाच्या स्मारकाला संभाजी ब्रिगेडचा विरोध

पुणे: कोपर्डीतील बलात्कार आणि हत्येच्या घटनेला आज एक वर्ष पूर्ण होत आहे. त्यानिमित्तानं भय्यूजी महाराज यांच्या सूर्योदय परिवाराकडून कोपर्डीच्या निर्भयाचं स्मारक उभारण्यात आलं आहे. मात्र पाशवी अत्याचाराला बळी पडलेल्या मुलीचं स्मारक कसं काय उभं राहू शकतं असा सवाल संभाजी ब्रिगेडनं उपस्थित केला आहे. निर्भयाचं स्मारक तयार करणं म्हणजे तिची अवहेलना करण्यासारखं आहे, असा दावा करत संभाजी ब्रिगेडने पुण्यात भय्यूजी महाराजांचा पुतळा जाळला. त्याचबरोबर आज कोपर्डीत होणारा स्मारक अनावरणाचा कार्यक्रम उधळून लावण्याचा इशारा देण्यात आला आहे. अहमदनगरमधील कोपर्डीतल्या बलात्कार पीडितेचं स्मारक पीडितेवर अंत्यसंस्कार केलेल्या ठिकाणी स्मारक उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अध्यात्मिक गुरु भय्यू महाराज यांच्या सर्वोदय परिवाराच्या वतीनं स्मारक बांधण्यात येणार आहे. या स्मारकाचं भूमिपूजन झालं आहे. साधारणपणे 50 बाय 50 फूटाचं स्मारक बांधण्याचा प्रस्ताव आहे. स्मारकाच्या मध्यभागी पितळी धातूचा पुतळा बसवण्यात येणार आहे. स्मारकाशेजारीच लिंबाचं झाडही असेल. अन्याय आणि अत्याचाराच्या विरोधात क्रांतिकारी संघर्षाचं प्रतीक म्हणून हे स्मारक ओळखलं जाणार आहे. पीडित कुटुंबीयांच्या शेतात हे स्मारक बांधण्यात येत आहे. राज्यभरात कँडल मार्च राज्यासह देशाला हादरवून सोडणाऱ्या कोपर्डी बलात्कार आणि हत्या प्रकरणाला आज एक वर्ष पूर्ण होत आहे. पीडितेला श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी राज्यात ठिकठिकाणी कँडल मार्च काढण्यात येणार आहेत. तसंच आरोपींच्या शिक्षेसाठी मोर्चेही काढले जाणार आहेत. कोपर्डीत चिमुकलीवर पाशवी बलात्कार अहमदनगरमधील कर्जत तालुक्यातील कोपर्डी गावात 13 जुलै 2016 रोजी नराधमांनी अल्पवयीन मुलीवर बलात्कार करुन तिची निर्घृण हत्या करण्यात आली. याप्रकरणी जितेंद्र शिंदे, संतोष भवाळ आणि नितीन भैलुमे या तिघांना संशयित आरोपी म्हणून अटक करण्यात आली होती. नराधमांना फासापर्यंत पोहोचवल्याशिवाय शांत बसणार नाही : मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांनी कोपर्डी बलात्काराबाबत विधानसभेत माहिती देताना म्हणाले, “आरोपींना फासापर्यंत पोहोचवल्याशिवाय सरकार शांत बसणार नाही. तसेच, या कारवाईसाठी विरोधकांनी सरकारला पाठिंबा देऊन, आपण एक आहोत, हा संदेश द्यावा.” संबंधित बातम्या कोपर्डी बलात्कार आणि हत्येला एक वर्ष पूर्ण कोपर्डी बलात्कार : तपासात जात आडवी येणार नाही : मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांचा हल्लाबोल, राणे आणि धनंजय मुंडे चेकमेट ! कोपर्डी बलात्कार: तुमची -आमची मुलगी समजून कारवाई करा : अजित पवार  नगरमध्ये बलात्कार आणि हत्या, हजारो ग्रामस्थ रस्त्यावर मुख्यमंत्र्यांना आर्चीला भेटायला वेळ, मात्र पीडित कुटुंबीयांसाठी नाही : तृप्ती देसाई

महत्त्वाच्या बातम्या

Orchestra Bar Bill : ऑर्केस्ट्राच्या नावाखाली चालणाऱ्या अश्लील डान्सबारवर पडणार मोठा हातोडा! कायद्यात सुधारणा करणारे विधेयक विधानसभेत सादर
ऑर्केस्ट्राच्या नावाखाली चालणाऱ्या अश्लील डान्सबारवर पडणार मोठा हातोडा! कायद्यात सुधारणा करणारे विधेयक विधानसभेत सादर
ह्रदयद्रावक... सेल्फी घेताना मित्र खदानीत पडला, मित्राला वाचवताना दोघेही बुडाले; तिघांचा मृत्यू, गावावर शोककळा
ह्रदयद्रावक... सेल्फी घेताना मित्र खदानीत पडला, मित्राला वाचवताना दोघेही बुडाले; तिघांचा मृत्यू, गावावर शोककळा
आळंदीत इंद्रायणी नदीला पूर, एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय, 10 कोटी रुपयांचा विशेष निधी मंजूर 
आळंदीत इंद्रायणी नदीला पूर, एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय, 10 कोटी रुपयांचा विशेष निधी मंजूर 
राष्ट्रवादीला दे धक्का, महापालिकेतील नगरसेविका अश्विनी कोळींचे पद धोक्यात; जात प्रमाणपत्र जप्त करण्याचे आदेश
राष्ट्रवादीला दे धक्का, महापालिकेतील नगरसेविका अश्विनी कोळींचे पद धोक्यात; जात प्रमाणपत्र जप्त करण्याचे आदेश

व्हिडीओ

Sharad Pawar NCP Special Report : भेटीगाठी कशासाठी? शरद पवारांच्या निर्णयाकडे लक्ष
Missing Link : संवादाची लिंक मिसिंग? ठाकरेंच्या शिवसेनेचे वेगवेगळे सूर | Special Report
Zero Hour Full : 7 July | भारतीय रेल्वेचा प्रवास महिलांसाठी सुरक्षित आहे असं वाटतं का? | ABP Majha
Taloja Accident News : नवी मुंबई तळोजात भीषण अपघात, बेदरकारपणे कार चालवली, 10 जणांना उडवले
Zero Hour : 6 July | पावसात अनेक ठिकाणी नव्या विकासकामांची दुर्दशा झालीय, याला कारणीभूत कोण?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
रेल्वे पीएसयू कंपनीला 35.82 दशलक्ष अमेरिकन डॉलर्सची आंतरराष्ट्रीय लोकोमोटिव्ह ऑर्डर; शेअरमध्ये मोठी तेजी
रेल्वे पीएसयू कंपनीला 35.82 दशलक्ष अमेरिकन डॉलर्सची आंतरराष्ट्रीय लोकोमोटिव्ह ऑर्डर; शेअरमध्ये मोठी तेजी
Dipali Sayyed : तुम्हाला का झोंबतंय? 'महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स'वर रुपाली चाकणकरांचा 25 कोटीचा दावा, दिपाली सय्यद यांचा रोख सवाल
तुम्हाला का झोंबतंय? 'महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स'वर रुपाली चाकणकरांचा 25 कोटीचा दावा, दिपाली सय्यद यांचा रोख सवाल
ह्रदयद्रावक... सेल्फी घेताना मित्र खदानीत पडला, मित्राला वाचवताना दोघेही बुडाले; तिघांचा मृत्यू, गावावर शोककळा
ह्रदयद्रावक... सेल्फी घेताना मित्र खदानीत पडला, मित्राला वाचवताना दोघेही बुडाले; तिघांचा मृत्यू, गावावर शोककळा
तावडे-जयंत पाटलांची भेट, शरद पवारांची राष्ट्रवादी महायुतीत येणार का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिल्लीतून दिली माहिती
तावडे-जयंत पाटलांची भेट, शरद पवारांची राष्ट्रवादी महायुतीत येणार का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिल्लीतून दिली माहिती
SIP Calculator: दरमहा 3000 रुपयांच्या गुंतवणुकीवर 15 लाख रुपयांचा फंड बनवणं शक्य? जाणून घ्या संपूर्ण समीकरण
दरमहा 3000 रुपयांच्या गुंतवणुकीवर 15 लाख रुपयांचा फंड बनवणं शक्य? जाणून घ्या संपूर्ण समीकरण
धक्कादायक! नांदेड जिल्ह्यात कौटुंबिक वादातून पत्नीवरच तीन गोळ्या झाडल्या; आरोपी पती फरार, शहरात खळबळ
धक्कादायक! नांदेड जिल्ह्यात कौटुंबिक वादातून पत्नीवरच तीन गोळ्या झाडल्या; आरोपी पती फरार, शहरात खळबळ
राष्ट्रवादीला दे धक्का, महापालिकेतील नगरसेविका अश्विनी कोळींचे पद धोक्यात; जात प्रमाणपत्र जप्त करण्याचे आदेश
राष्ट्रवादीला दे धक्का, महापालिकेतील नगरसेविका अश्विनी कोळींचे पद धोक्यात; जात प्रमाणपत्र जप्त करण्याचे आदेश
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 जुलै 2026 | मंगळवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 जुलै 2026 | मंगळवार 
Embed widget