एक्स्प्लोर

राजापुरातील गंगा तीर्थ क्षेत्राची दुरावस्था; वाद, समन्वयाचा अभाव की लोकप्रतिनिधींचं दुर्लक्ष?

राजापूरमधील गंगा तीर्थक्षेत्राची ख्याती संपूर्ण जगभरात पाहायला मिळते. पण, अशा या गंगा तीर्थ क्षेत्राची सध्या दुरावस्था झालेली दिसून येते.

रत्नागिरी : राजापुरातील गंगा तीर्थ क्षेत्राची ख्याती जगभरात पाहायाला आणि ऐकायला मिळते. शिलहार राजाच्या काळापासून ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासात देखील याच्या नोंदी आढळतात. पण, अशा या गंगा तीर्थ क्षेत्राची सध्या दुरावस्था झालेली दिसून येते. पडलेल्या भिंती, निखळलेल्या लाद्या, तुटलेले - उडालेले पत्रे, कोसळलेल्या संरक्षक भिंती हे सारं चित्र तुम्हाला गंगा तीर्थ क्षेत्राला भेट दिल्यानंतर पाहायाला मिळतं. गंगा आली की लाखो भाविक जगाच्या कोनाकोपऱ्यातून येथे येतात. शिवाय, इतर दिवशी देखील भाविक या तीर्थ क्षेत्राला भेट देतात. मुंबई - गोवा हायवेपासून साधारण अंतरावर उन्हाळे या गावी गंगा तीर्थ क्षेत्र आहे. याच ठिकाणी बारमाही वाहणारे गरम पाण्याचे झरे देखील आहेत. त्यामुळे या ठिकाणाला लोक मोठ्या प्रमाणावर भेट देतात. अशा या प्रसिद्ध ठिकाणाची सध्या दुरावस्था झालेली पाहायाला मिळते. जवळपास 10 वर्षापूर्वी भक्तनिवास बांधण्यात आला. पण, त्यांची देखील दुरावस्था झाली असून त्या ठिकाणी आता भाताच्या पेंड्या ठेवल्याचं चित्र पाहायाला मिळते. भाविकांसह पर्यटक देखील इथे मोठ्या प्रमाणावर भेटी देत असल्यानं रत्नागिरी जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री रविंद्र वायकर यांनी 2017मध्ये 98 लाखांचा विकास निधी देखील दिला. पण, तो देखील परत गेला.

निधी परत जाण्यास कारण काय? उन्हाळे ग्रामपंचायत आणि गंगापुत्र यांच्यात सध्या वाद दिसून येतो. त्याला समन्वयाचा अभाव देखील म्हणता येईल. गंगा तीर्थ क्षेत्राचा विकास करताना आम्हाला विश्वासात घ्यावं किंवा विकास कामं करताना आमचं म्हणणं देखील ऐकलं जावं, अशी गंगापुत्रांचे प्रतिनिधी डॉ. अविनाश सप्रे यांनी दिली. तर, आम्ही विकास कामं करायला तयार असून गंगापुत्र त्याला सहकार्य करायला तयार नाहीत, अशी प्रतिक्रिया उन्हाळे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आणि विद्यमान सदस्य बिर्जे यांनी दिली. दरम्यान, अशा या वादात विकासकामं रखडली असून 2017मध्ये मिळालेला 98 लाखांचा निधी देखील परत गेला. शिवाय, तालुका किंवा जिल्हा पातळीवर देखील गंगेची कागदोपत्री कुठेच नोंद नाही, अशी प्रतिक्रिया देखील यावेळी गंगापुत्रांनी एबीपी माझाशी बोलताना दिली.

लोकप्रतिनिधी काय करणार? या साऱ्या वादात सध्या गंगा तीर्थ क्षेत्राचा विकास रखडला आहे. त्यामुळे पर्यटकांसह भाविकांची देखील या ठिकाणाला भेट दिल्यानंतर गैरसोय होते. या वादात आता लोकप्रतिनिधींची भूमिका देखील महत्त्वाची असणार असून किमान समन्वय साधण्याचा प्रयत्न तरी त्यांच्याकडून आता तरी होणार का? या साऱ्या वादात गंगा तीर्थ क्षेत्राची दुरावस्था कायम राहणार की ती आणखी बिघडणार? असा सवाल पंचक्रोशीतील नागरिक करत आहेत.

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Pune Moshi Building Collapse: 'यंदा वारीला गेले असते तर...'; मोशी दुर्घटनेत काळजाला घर पाडणारी कहाणी, अवघ्या 25 दिवसांच्या चिमुकल्याचं पितृछत्र हरपलं
'यंदा वारीला गेले असते तर...'; मोशी दुर्घटनेत काळजाला घर पाडणारी कहाणी, अवघ्या 25 दिवसांच्या चिमुकल्याचं पितृछत्र हरपलं
Vinayak Raut Daughter-in-law Girija Raut Marathi News: नवरात्रीच्या पहिल्या दिवशी आणि शेवटच्या दिवशी विनायक राऊत आमच्या घरी यायचे...; सून गिरीजा राऊत खडाखडा बोलली
नवरात्रीच्या पहिल्या दिवशी आणि शेवटच्या दिवशी विनायक राऊत आमच्या घरी यायचे...; सून गिरीजा राऊत खडाखडा बोलली
Girija Raut : विनायक राऊतांनी दुसरं लग्न अन् दुसरं घर माझ्यापासून लपवलं; आम्हाला झोपडपट्टीत ठेवलं; कौटुंबिक वादापासून ते अघोरी कृत्यांपर्यंत गिरीजा राऊतांनी सगळंच सांगितलं
विनायक राऊतांनी दुसरं लग्न अन् दुसरं घर माझ्यापासून लपवलं; आम्हाला झोपडपट्टीत ठेवलं; कौटुंबिक वादापासून ते अघोरी कृत्यांपर्यंत, गिरीजा राऊतांनी सगळंच सांगितलं
Vinayak Raut Daughter-in-law Girija Raut: गितेश शारीरिक संबंध ठेवण्यास असमर्थ होता, प्रत्येक बाबतीत खोटं बोलून विश्वासघात केला; गिरीजा राऊतांनी सगळंच सांगितलं, विनायक राऊतांबाबत म्हणाल्या...
गितेश शारीरिक संबंध ठेवण्यास असमर्थ होता, प्रत्येक बाबतीत खोटं बोलून विश्वासघात केला; गिरीजा राऊतांनी सगळंच सांगितलं, विनायक राऊतांबाबत म्हणाल्या...

व्हिडीओ

Vinayak raut PC : मुलावर सुनेचे गंभीर आरोप, विनायक राऊत काय म्हणाले?
Eknath Khadse on BJP : एकनाथ खडसेंच्या भाजप प्रवेशावरून गुलाबराव पाटलांचा खोचक टोला
Supriya Sule Nashik Speech : पांडुरंग म्हणतो माझे दर्शन घ्यायला येऊ नका, सेवा केली तर मी दर्शन द्यायला येईल
Sanjay Raut Vs Devendra Fadnavis Special Report : राऊतांनी डिवचलं, बावनकुळे, फडणवीसांना शुभेच्छा
Sanjay Raut PC : फडणवीस केंद्रात, मुख्यमंत्री बावनकुळे होतील, राऊत हसले अन् थेट बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ओमानच्या किनाऱ्याजवळ 'जीएफएस गॅलेक्सी' व्यापारी जहाजावर हल्ला; 11 पैकी 10 भारतीयांना वाचवण्यात यश, एक जण अद्याप बेपत्ता
ओमानच्या किनाऱ्याजवळ 'जीएफएस गॅलेक्सी' व्यापारी जहाजावर हल्ला; 11 पैकी 10 भारतीयांना वाचवण्यात यश, एक जण अद्याप बेपत्ता
Moshi Building Collapse: लग्नाला महिना पूर्ण होण्यापूर्वीच काळाचा घाला; पत्नीला पुण्यात घेऊन यायची तयारी, मोशीत घरही फायनल झालं, पण सारंच होत्याचं नव्हतं झालं! कचरा डेपो दुर्घटनेत अंत
लग्नाला महिना पूर्ण होण्यापूर्वीच काळाचा घाला; पत्नीला पुण्यात घेऊन यायची तयारी, मोशीत घरही फायनल झालं, पण सारंच होत्याचं नव्हतं झालं! कचरा डेपो दुर्घटनेत अंत
Girija Raut : विनायक राऊतांनी दुसरं लग्न अन् दुसरं घर माझ्यापासून लपवलं; आम्हाला झोपडपट्टीत ठेवलं; कौटुंबिक वादापासून ते अघोरी कृत्यांपर्यंत गिरीजा राऊतांनी सगळंच सांगितलं
विनायक राऊतांनी दुसरं लग्न अन् दुसरं घर माझ्यापासून लपवलं; आम्हाला झोपडपट्टीत ठेवलं; कौटुंबिक वादापासून ते अघोरी कृत्यांपर्यंत, गिरीजा राऊतांनी सगळंच सांगितलं
Video: डिलिव्हरी बॉयचे लज्जास्पद कृत्य! ऑर्डर देताच थेट बाथरूममध्ये घुसला अन् महिलेला दाखवलं गुप्तांग, अखेर संतापललेल्या महिलेनं..
Video: डिलिव्हरी बॉयचे लज्जास्पद कृत्य! ऑर्डर देताच थेट बाथरूममध्ये घुसला अन् महिलेला दाखवलं गुप्तांग, अखेर संतापललेल्या महिलेनं..
Girija Raut : सात वर्षे छळलं; नवऱ्यासोबत शारिरीक संबंध नाही, मानसिक त्रास दिला, अघोरी कृत्य केली, जिवंत कोंबडा, मांस, कणकेचे उतारे, गिरीजा राऊतांनी मांडली आपबिती
सात वर्षे छळलं; नवऱ्यासोबत शारिरीक संबंध नाही, मानसिक त्रास दिला, अघोरी कृत्य केली, जिवंत कोंबडा, मांस, कणकेचे उतारे, गिरीजा राऊतांनी मांडली आपबिती
Video: पुण्यातील वयाच्या साठीतील आईच्या जिद्दीला सलाम; अवघ्या वर्षभरात जीममध्ये घाम गाळून तब्बल 18 किलो वजन कमी केलं! आजारावर सुद्धा केली मात
Video: पुण्यातील वयाच्या साठीतील आईच्या जिद्दीला सलाम; अवघ्या वर्षभरात जीममध्ये घाम गाळून तब्बल 18 किलो वजन कमी केलं! आजारावर सुद्धा केली मात
Vietnam Boat Capsized: समुद्रकिनारी मृतदेहांची रांग, नातेवाईकांचा आक्रोश; व्हिएतनाम बोट दुर्घटनेचे हृदय पिळवटून टाकणारे PHOTO
समुद्रकिनारी मृतदेहांची रांग, नातेवाईकांचा आक्रोश; व्हिएतनाम बोट दुर्घटनेचे हृदय पिळवटून टाकणारे PHOTO
Iran War Live Update: 'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'वरून अमेरिका आणि इराणचा संघर्ष थांबता थांबेना; अमेरिकेनं 140 ठिकाणी केलेल्या हल्ल्यानंतर इराणकडून पाच देशांवर ड्रोन मिसाईलींचा मारा
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'वरून अमेरिका आणि इराणचा संघर्ष थांबता थांबेना; अमेरिकेनं 140 ठिकाणी केलेल्या हल्ल्यानंतर इराणकडून पाच देशांवर ड्रोन मिसाईलींचा मारा
Embed widget