Kolkata Doctor Case : कोलकाता (Kolkata Case) येथील सरकारी रुग्णालयात निवासी महिला डॉक्टरचा बलात्कार करून तिची हत्या केल्याची घटना घडलीय. या घटनेमुळे संपूर्ण देश हादरला आहे. दरम्यान, या घटनेच्या निषेधार्थ देशासह राज्यातील बहुतांश वैद्यकीय महाविद्यालयांतील निवासी डॉक्टर (Resident Doctors) बेमुदत संपावर गेले आहेत.


या कृत्याच्या निषेधार्थ राज्यातील मुंबई (Mumbai), नागपूर (Nagpur), छत्रपती संभाजीनगरसह (Chhatrapati Sambhajinagar) इतरत्र त्याचे पडसाद आता उमटू लागले आहे. अशातच, आज नागपुरातील (Nagpur) महाराष्ट्र असोसिएशन ऑफ रेसिडंट डॉक्टर्स अर्थात मार्डचे (MARD) संपकरी डॉक्टरांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेट घेतलीय. या भेटी दरम्यान त्यांनी आपल्या मागण्या उपमुख्यमंत्र्यांकडे केल्या आहे.   


सेंट्रल प्रोटेक्शन ऍक्ट लागू करा, डॉक्टरांच्या शिष्टमंडळाची मागणी  


कोलकाता येथील पीडित डॉक्टरला न्याय मिळवून द्यावा, तसेस राज्यासह देशात सेंट्रल प्रोटेक्शन ऍक्ट लागू करण्यात यावा, अशा प्रमुख मागण्या या डॉक्टरांनी देवेंद्र फडणवीसांकडे केल्या आहेत. सोबतच राज्यातील मार्डच्या निवासी डॉक्टरांच्या सुरक्षेच्या प्रश्नांची आणि इतर समस्यांची देखील माहिती यावेळी देण्यात आली आहे. तर उपमुख्यमंत्री फडवणीसांनी राज्यातील महिला निवासी डॉक्टरांच्या सुरक्षेसंदर्भात विशेष खबरदारी घेणार असल्याचे आश्वासन या डॉक्टरांच्या शिष्टमंडळाला यावेळी दिल्याची माहिती पुढे आली आहे.


सोबतच नागपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मेयो आणि मेडिकल या दोन रुग्णालयासह राज्यभरातील निवासी डॉक्टर संपावर असल्याने रुग्णांचे मोठ्या प्रमाणात हाल होत असल्याचे चित्र आहे. परिणामी, आपण आपला संप मागे घ्यावा, असे आवाहन देखील  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या डॉक्टरांच्या शिष्टमंडळाला केले आहे.


महिला डॉक्टरच्या अंगावर अनेक ठिकाणी जखमा


बलात्कारानंतर हत्या करण्यात आलेल्या महिला डॉक्टरचे शवविच्छेदन करण्यात आले आहे. यातून अनेक धक्कादायक बाबी समोर आल्याचा दावा केला जातोय. मृत डॉक्टरशी अनेकवेळा बळजबरीने शरीससंबंध टेवण्यात आल्याचा दावा केला जातोय. सकाळी 3 ते 5 वाजेदरम्यान महिलेसोबत हा प्रकार घडला आहे. बलात्कार पीडित महिला डॉक्टरच्या अंगावर अनेक ठिकाणी जखमा आहेत. या महिलेच्या ओठांवर, नाकावर, गाल, जबडा तसेच शरीरावर अनेक ठिकाणी जखमा आहेत. या डॉक्टरच्या डोक्यालाही मार आहे. इंडिया टुडेच्या रिपोर्टनुसार पीडित डॉक्टरचे तोंड बंद करण्यात आले होते.


हेही वाचा :


Ayushmann Khurrana : 'काश! मैं भी लड़का होती', कोलकाता बलात्कार-हत्या प्रकरणावर आयुष्मान खुरानाची कविता, एक-एक शब्द ऐकून अंगावर येईल काटा