कोल्हापूर: कोल्हापुरात पावसाचा जोर चांगलाच वाढला आहे. धरण क्षेत्रात जोरदार पाऊस झाल्यामुळे पाण्याची पातळी वाढली आहे. त्यामुळे राजाराम बंधाऱ्यावर पाणी आलं आहे.
धक्कादायक बाब म्हणजे पुलावरुन पाणी वाहत असूनही, काही जण अतिउत्साह दाखवत आहेत. वाढलेल्या पाणी पातळीतूनच वाहतूक सुरु आहे.
एवढ्या पाण्यातून वाहनं चालवणं जीवावर बेतू शकते. मात्र तरीही लोक या पुलावरुन प्रवास करताना दिसत आहेत.
दरम्यान गेल्या काही दिवसांपासून पावसाने ओढ दिली होती. मात्र गेल्या दोन दिवसांपासून पावसाने जोर घेतला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील धरक्षेत्रात जोरदार पाऊस होत आहे.,
राधानगर, दूधगंगा, कासारी, पाटगाव, कुंभी, कडवी, जांबरे कोदे अशा धरणक्षेत्रात अतिवृष्टी झाली. त्याचाच परिणाम म्हणून शहरातून जाणाऱ्या पंचगंगा नदीच्या पाणीपात्रात वाढ झाली आहे.