दरोड्यासाठी निवृत्त सैनिकासह अख्खं कुटुंब संपवलं, दोघांना अटक
एबीपी माझा वेब टीम | 26 Jun 2017 07:53 AM (IST)
अहमदनगर : अहमदनगरच्या शेवगावमध्ये निवृत्त सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे. दरोड्याच्या उद्देशाने हरवणे कुटुंबातील चौघांची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक कबुली आरोपींनी दिली आहे. कोम्बिंग ऑपरेशन दरम्यान दोन्ही आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्या. आरोपींची नावं अद्याप स्पष्ट झालेली नाहीत. 17 जूनला शेवगावात राहणारे 57 वर्षीय आप्पासाहेब हरवणे, त्यांची पत्नी सुनंदा हरवणे (45), मुलगी स्नेहल (18) आणि मुलगा मकरंद (15) या चौघांची राहत्या घरी हत्या झाली होती. या घटनेनं संपूर्ण नगर जिल्हा हादरला होता.