कोल्हापूर : गरम खिशाच्या कोल्हापूरकरांनो सावधान...! कारण एक चूक तुमचे संपूर्ण आयुष्य उध्वस्त करू शकते. कारण कोल्हापूर जिल्ह्यात हनी ट्रॅपच्या जाळ्यात अडकवणारी टोळी सक्रिय झाली आहे. एक-दोन नाही तर जिल्ह्यातील तब्बल पाच पोलीस ठाण्यांमध्ये हनी ट्रॅपच्या तक्रारी दाखल झाल्या आहेत. पोलिसांनी एका टोळीला अटक केली असून जिल्ह्यातील असे आणखी अनेक प्रकार उघडकीस येण्याची शक्यता आहे.


कोल्हापूर पोलिसांनी एका टोळीला अटक असून एक टोळी फरार झाली आहे. ही टोळी थोडे-थोडके नव्हे तर 50 ते 60 लाख रुपयांची लुबाडणूक करते. सुरुवातीला फेसबुकवरून ओळख करायची, मग चॅटिंग आणि नंतर बिझनेसच्या निमित्ताने मीटिंगची तयारी करायची. एकदा का तुम्ही मिटिंगला गेला की ही टोळी तुम्हाला हनी ट्रॅपमध्ये अडकवण्यास तयार असते. 


कसे अडकतात हनी ट्रॅपच्या जाळ्यात?
सुरुवातीला सोशल मीडियावरून संबधित व्यक्तीला मित्र बनवले जाते. मोबाईल नंबर घेऊन चॅटिंग सुरू केले जाते. सबंधित व्यक्ती पैसेवाली असेल तर संवाद अधिक ठेवला जातो. बिझनेसच्या बहाण्याने मिटिंगसाठी बोलवले जाते. या मिटींगला महिला एकटी जाते आणि तिचे पुरुष साथीदार तिच्यावर पाळत ठेऊन असतात. 


स्वच्छतागृहात जाण्याच्या बहाण्याने महिला एखादी रूम घ्यायला भाग पडते. संबधित व्यक्ती आणि ती महिला रुममध्ये जातात. लगेच महिलेचे पुरुष साथीदार दार ठोठावत येतात आणि ती बहीण असल्याचं सांगून पैशाची मागणी करतात. 


जोपर्यंत ही टोळी पैशाची मागणी करत नाही तोपर्यंत संबंधित व्यक्तीला कुठलाही संशय येत नसतो. मात्र ज्यावेळी संशय येतो तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते. समाजात अब्रू जाईल या भीतीने अनेकांनी लाखो रुपये या टोळीला दिले आहेत. त्यामुळे पोलिसांनी नागरिकांना धाडस करून तक्रारी देण्याचे आवाहन केले आहे.


या हनी ट्रॅपच्या जाळ्यात अनेक मोठे व्यापारी, अनेक मोठे व्यवसायिक अडकले आहेत. फरार झालेल्या टोळीतील एकाने तर आपल्या पत्नीचा हनी ट्रॅपसाठी वापर केल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे सोशल मीडिया वरून मैत्री करून तुम्हाला कोण जाळ्यात ओढत असेल तर वेळीच सावध व्हा. अन्यथा तुमचा गरम खिसा कधी नरम होईल हे सांगता येणार नाही.


संबंधित बातम्या :