Honey Trap Shivsena MLA : हनी ट्रॅपच्या माध्यमातून प्रतिष्ठित आणि प्रसिद्ध असणाऱ्या लोकांना आपल्या जाळ्यात अडकवून त्यांच्याकडून पैसे उकळण्याच्या घटनांमध्ये गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. सायबर क्राईम विभागाकडून याचा तपासही सुरु आहे. मात्र, हे प्रकार थांबायचं नाव घेत नाही. आता शिवसेना आमदाराला हनी ट्रॅपच्या (Honey Trap Case) माध्यमातून गंडा घालणाचा प्रकार समोर आला आहे.  शिवसेना आमदार मंगेश कुडाळकर (Shiv Sena MLA Mangesh Kudalkar) यांना फोन वरुन पैशाची मागणी करण्यात आली. कुडाळकर यांनी त्वरित सायबर सेलकडे (Mumbai Cyber ​​Police)  याची तक्रार केली. त्यानंतर पोलिसांनी ऑनलाईन पैसे टाकायला सांगितले त्यावरुन आरोपीला ट्रॅक करणं सोपं झालं आणि मुंबई पोलिसांच्या सायबर सेलच्या टीमने सिकरी, राजस्थान येथून मोसमुद्दीन नावाच्या आरोपीला अटक केली आहे, या प्रकरणात पोलीस तपास करून  आणखी काही आरोपींना  अटक करू शकतात.


शिवसेना नेते मंगेश कुडाळकर हे दोन वेळा मुंबईतून आमदार म्हणून निवडून आले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, 20 ऑक्टोबर रोजी कुडाळकर यांना अज्ञात नंबरवरुन एक मेसेज आला होता. हा संदेश मौसमदीन नावाच्या व्यक्तीने एक महिला बनून पाठवला होता. कुडाळकर यांच्याकडून प्रतिसाद मिळाल्यानंतर दोघांमध्ये संभाषण सुरु झालं. समोरील व्यक्तीने मदत मागितल्यानंतर कुडाळकर यांनी मदत करण्याचं आश्वासन दिलं. यांच्यामध्ये संभाषण सुरुच होतं. काही वेळानंतर एका महिलेचा कुडाळकर यांना व्हिडीओ कॉल आला होता. अवघ्या 15 सेंकदाचं त्यांच्यामध्ये बोलणं झाल्याचं समजतेय. पण हा, फोन कट होताच कुडाळकर यांच्या मोबाईलवर एक अश्लील व्हिडीओ क्लिप आली. या क्लिपच्या माध्यमातून कुडाळकर यांच्याकडे पैशांची मागणी कऱण्यात आली. आपल्याला फसवलं जात असल्याचं समजताच कुडाळकर यांनी तात्काळ सायबर सेलकडे तक्रार दाखल केली. त्यानंतर मुंबई सायबर सेलनं कारवाई करत आरोपीला बेड्या ठोकल्या. या प्रकरणाचा तपास सुरु आहे.



संबधित बातम्या :
Honey Trap : कोल्हापूरचा उद्योजक 'हनी ट्रॅप'चा बळी; मैत्रिण खोटी, गमावले तब्बल सव्वातीन कोटी रुपये
Sextortion in Mumbai : हनी ट्रॅपचा विळखा, वेळीच ओळखा! सेवानिवृत्त प्राचार्याला फसवण्याचा प्रकार