एक्स्प्लोर
कोल्हापूर - मुंबई विमानसेवा येत्या 10 दिवसात!
कोल्हापूर: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वकांक्षी उडान योजनेचे मार्ग जाहीर झाल्यानंतर, आता त्याच्या अंमलबजावणीच्या हालचाली सुरु झाल्या आहेत.
त्याचाच एक भाग म्हणून कोल्हापूर-मुंबई ही विमानसेवा येत्या 10 दिवसात सुरु होणार आहे. महसूल आणि कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.
कोल्हापूर-मुंबई या मार्गावरील विमानसेवा सप्टेंबरमध्ये सुरु होणं प्रस्तावित आहे. मात्र आता ती दहा दिवसातच सुरु होईल, असा विश्वास चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला.
कोल्हापूर-मुंबई मार्गावर पहिल्या टप्प्यात 9 सीटर विमान सेवा सुरु होईल. तसंच या मार्गावर दिवसातून दोन फेऱ्या होतील.
उडान योजनेनुसार अवघ्या अडीच हजारात विमानप्रवास करता येईल. मात्र विमानातील एकूण सीट्सच्या 50 टक्के सीटसाठीच ही योजना लागू असेल.
कोल्हापुरात विमानससेवा सुरु करण्यासाठी एका विमान कंपनीचा सरकारकडे प्रस्ताव आल्याची माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली.
स्वस्त 'उडाण', हवाई प्रवास अडीच हजारात
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महत्त्वकांक्षी उडान योजना लाँच झाली असून, 30 मार्चला या योजनेतील 45 मार्ग जाहीर झाले. महत्त्वाचं म्हणजे या योजनेत महाराष्ट्रातील 5 शहरांचा समावेश असून, या मार्गावर अवघ्या अडीच हजार रुपयात प्रवास करता येणार आहे. नागरी हवाई वाहतूकमंत्री अशोक गजपती राजू यांनी देशभरातील मार्गांची आज घोषणा केली. ‘उडान’ या योजनेनुसार एक तासाचा हवाईप्रवास अवघ्या अडीच हजार रुपयात करता येईल. ‘उडाण’च्या नियम व अटी या योजनेनुसार या मार्गावरील विमानातील एकूण सीट्सच्या 50 टक्के सीट या अडीच हजार रुपयांच्या असतील. त्याव्यतिरिक्त सीट्ससाठी नियमित मूल्य मोजावे लागेल. म्हणजे जो आधी तिकीट घेईल, त्याला या संधीचा फायदा मिळेल. महाराष्ट्रातील हवाई मार्ग- नांदेड- मुंबई – (जून- 2017)
- नांदेड – हैदराबाद- (जून- 2017)
- नाशिक (ओझर) – मुंबई (सप्टेंबर- 2017)
- नाशिक (ओझर) – पुणे (सप्टेंबर- 2017)
- कोल्हापूर – मुंबई (सप्टेंबर- 2017)
- जळगाव -मुंबई (सप्टेंबर- 2017)
- सोलापूर – मुंबई (सप्टेंबर- 2017)
स्वस्त 'उडाण', हवाई प्रवास अडीच हजारात
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement