कोल्हापूर : बच्चनसाहेब विचारतायत... जगातलं सर्वात मोठं कोव्हिड टेस्टिंग सेंटर कोणतं? सोशल मीडियावर त्याचं उत्तर आहे कोगनोळी नाका. देशात कोरोनाची संख्या वाढली किंवा एखादा नवीन व्हायरस आढळला की चर्चेत येतो कोगनोळीचा चेक पोस्ट. महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमेवर असलेल्या या चेक पोस्टची धास्ती उत्तर भारतातील नागरिकांनी देखील घेतली आहे. हा चेक पोस्ट इतका चर्चेचा विषय का बनलाय असा तुम्हाला प्रश्न पडला असेल. तर या टोलनाक्यावर एकाहून एक भन्नाट मीम्स बनतायंत. 




देशात कोणताही नवा व्हेरियंट येणार म्हटलं की सगळ्यात आधी महाराष्ट्रातून कर्नाटकात जाणारा हा रस्ता बंद होतो, मग ते केंद्राचे निर्देश असो किंवा नसो. कोल्हापूर आणि बेळगाव जिल्ह्याच्या सीमेवर हा नाका आहे. कोगनोळी गावाजवळ असलेल्या नाक्यामुळे याचं नाव कोगनोळी नाका. पुणे-बंगळुरु हायवेवरचा टोलही याच नाक्यावर वसूल केला जातो. हा नाका चिक्कोडी गावच्या हद्दीत येतो. दोन्ही राज्यांनी प्रवाशांची तपासणी कडक केल्याने इथे सध्या कायमच वाहनांच्या रांगा लागतात. कधीकधी भांडणं होतात, पोलिसांशी हुज्जत घालतात आणि मग फ्रस्ट्रेशन काढण्यासाठी असे मीम्स तयार होतात. मग त्यात कोल्हापूर म्हंटल्यावर विचारायलाच नको. 




या ठिकाणी आरटीपीसीआरचीही सक्तीची केली जाते. तसेच नागरिकांवर देखील अरेरावीची भाषा वापरली जाते. दररोज ये-जा करत असणाऱ्या विद्यार्थी, शेतकरी, मालवाहतूकदार आणि प्रवाशांना कर्नाटक प्रशासनाची नाकाबंदी डोकेदुखीचे ठरत आहेत. इतका सगळा गोंधळ घातल्यानंतर या चेक पोस्टवर मिस्म तर येणारच. यामुळे सीमाभागातील नेटकऱ्यांकडून कर्नाटक प्रशासनाच्या विरोधात मिम्सचा जोरदार पाऊस पडत आहे.




सध्या आफ्रिकेत आढळून आलेल्या कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरियंटमुळे सीमाभागात कर्नाटक प्रशासनाकडून नाकाबंदी करण्यात आल्याचे समोर आले आहे. तसेच आरटीपीसीआर चाचणीही सक्तीची करण्यात आली आहे. दरम्यान, कर्नाटकातील अनेक नाक्यांवर तेथील प्रशासनाकडून अरेरावी होत असल्याचे सीमाभागातील अनेकांचे म्हणणे आहे. यामुळे सीमावासीयांना नाहक त्रास होत असल्याचेही त्यांचे म्हणणे आहे. जगात कोणत्याही ठिकाणची कोरोनाबाबत बातमी माध्यमांमध्ये आली की, लगेच गरज नसताना महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर कर्नाटक प्रशासनाकडून सीमाभाग लगत असणारे मार्ग नाकाबंदी करून तपासणी चालू केली जाते. 




संबंधित बातम्या :