जळगाव : राज्याच्या राजकारणात जिल्हा बँकेच्या निवडणूकांचेही (Jalgaon District Bank Election) बरेच महत्त्व असते. त्यामुळे जळगाव जिल्ह्याचा विचार करता तेथील जिल्हा बँकेच्या निवडणूकीकडे अनेकांचे लक्ष लागून होते. यामध्ये महाविकास आघाडीने  भाजपचा पराभव करत सत्ता खेचून आणली. ज्यानंतर जिल्हा बँकेचं अध्यक्षपद आणि उपाध्यक्षपद कसं वाटप करायचा याबाबत अनेक चर्चा सुरु होत्या. ज्याचा रिजल्ट आता समोर आला असून राष्ट्रवादीकडून अध्यक्षपदासाठी गुलाबराव देवकर (Gulabrao Devkar) तर शिवसेनेकडून उपाध्यक्षपदावर श्याम सोनवणेंच्या (Shyam Sonawane) नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.


जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीत 21 जागांपैकी 20 जागांवर महाविकास आघाडीने बाजी मारली होती. यानंतर गुरुवारी अध्यक्ष निवडीसंदर्भात सहकार पॅनलची बैठक अजिंठा विश्राम गृहात पार पडली. राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे या बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह महाविकास आघाडीचे नेते उपस्थित होते. त्यानंतर आता सकाळी (शुक्रवारी) अजिंठा विश्रामगृहात महाविकास आघाडीच्या कोअर कमिटीची बैठक झाली.


ज्यामध्ये अध्यक्ष उपाध्यक्षपदासाठी फॉर्म्युला ठरविण्यात आला आहे. यात राष्ट्रवादीकडून अध्यक्षपदासाठी उमेदवार ठरविण्याचा अधिकार वरिष्ठ पातळीवरून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांना देण्यात आला होते. तब्बल तासभर खडसे यांच्यासह संचालकांच्या झालेल्या बंदद्वार बैठकीत पहिल्या तीन वर्षांसाठी अध्यक्षपदाची माळ गुलाबराव देवकर यांच्या गळ्यात पडली आहे. तर सेनेकडून पुढील दोन वर्षांसाठी उपाध्यक्षपदी श्याम सोनवणे राहणार आहेत.


संबंधित बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha