एक्स्प्लोर

Kolhapur District Gram Panchayat Election : कोल्हापूर जिल्ह्यात उद्यापासून ग्रामपंचायतींसाठी रणधुमाळी; 475 गावांना थेट जनतेतून 'कारभारी' मिळणार

कोल्हापूर जिल्ह्यातील 475 ग्रामपंचायत निवडणुकीसाठी प्रत्यक्ष रणधुमाळी उद्या सोमवारपासून सुरु होणार आहे. राज्यातील सत्तांतरानंतर प्रथमच राज्यभरातील 7 हजारांवर थेट जनतेतून सरपंच निवडला जाणार आहे.

Kolhapur District Gram Panchayat Election : कोल्हापूर जिल्ह्यातील 475 ग्रामपंचायत निवडणुकीसाठी प्रत्यक्ष रणधुमाळी उद्या सोमवारपासून सुरु होणार आहे. राज्यातील सत्तांतरानंतर प्रथमच राज्यभरातील 7 हजारांवर थेट जनतेतून सरपंच निवडला जाणार आहे. याच निवडणूकीतून येणाऱ्या विधानसभेसाठी गटतट निश्चित होणार असल्याने राजकीय नेत्यांची प्रतिष्ठा सुद्धा पणाला लागली आहे. ग्रामपंचायती स्थनिक पातळीवर लढवल्या जात असल्या, तरी होणाऱ्या आघाड्या नेत्यांच्या मार्गदर्शनात होत असल्याने त्याला अधिक महत्व आहे. सरपंच निवडणूक थेट जनतेतून होणार असल्याने उमेदवारी देताना नेत्यांची परीक्षा असणार आहे. 

उद्यापासून प्रत्यक्ष रणधुमाळीला सुरुवात 

दरम्यान, कोल्हापूर जिल्ह्यातील 475 ग्रामपंचायत निवडणुकांसाठी तालुकानिहाय तहसिलदारांकडून अधिसूचना 18 नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. उद्या सोमवारपासून उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेने प्रत्यक्ष रणधुमाळीला सुरुवात होईल. सरपंच पदासह प्रभागनिहाय आरक्षण निश्‍चित असल्याने त्या त्या प्रवर्गातील उमेदवारांकडून यापूर्वीच तयारी सुरु केली आहे. कोल्हापूर शहरालगतच्या गावांमध्येही निवडणूक होत असल्याने मोठी चुरस आहे. अनेक मोठ्या गावांमध्येही रणधुमाळी असल्याने विधानसभेची तयारी व्हावी, यासाठी आमदार, माजी आमदारही तयारीला लागले आहेत. 

निवडणूक सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासकीय पातळीवरही जय्यत तयारी सुरू आहे. जवळपास 12 हजार कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी लागणार आहे. प्रत्येक केंद्रावर सहा अधिकारी व कर्मचारी नियुक्त केले जातील. 475 गावांतील 1977 मतदान केंद्रावर 18 डिसेंबरला मतदान, तर २० डिसेंबर रोजी मतमोजणी होईल. या निवडणुकीसाठी 1977 मतदान केंद्रावर तेवढीच मतदान यंत्रांची आवश्यकता असेल. ईव्हीएम चाचणी व सुस्थितीत ठेवण्याचे काम सुरू आहे. 

तालुकानिहाय मतदान केंद्रे

  • करवीर 289
  • राधानगरी 237
  • पन्हाळा 186
  • शाहूवाडी 165
  • गगनबावडा 68
  • कागल 105
  •  शिरोळ 104
  • गडहिंग्लज 132
  • चंदगड 126
  • आजरा 118
  • भुदरगड 136

निवडणुका होणाऱ्या गावांची संख्या

  • करवीर 53
  • कागल 26
  • पन्हाळा 50
  • शाहूवाडी 49
  • हातकणंगले 39
  • शिरोळ 17
  • राधानगरी 66
  • गगनबावडा 21
  • गडहिंग्लज 34
  • आजरा 36
  • भुदरगड 44
  • चंदगड 40

निवडणूक कार्यक्रम

  • 28 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर - उमेदवारी अर्ज दाखल करणे
  • 5 डिसेंबर - अर्जांची छाननी
  • 7 डिसेंबर- चिन्ह वाटप
  • 18 डिसेंबर - मतदान
  • 20 डिसेबर - मतमोजणी

इतर महत्वाच्या बातम्या

जून 2022 पासून एबीपी माझा डिजिटल टीममध्ये असून गेल्या चार वर्षांपासून डिजिटल मीडियामध्ये कार्यरत. यापूर्वी दैनिक पुढारी, सकाळ, ईटीव्ही मराठी अशा संस्थामध्ये कामाचा अनुभव. समाजकारण, राजकारण तसेच मध्य पूर्वेतील विविध विषयांवर गेल्या आठ वर्षांपासून सातत्याने लिखाण.  
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live blog updates: आरक्षणाचे उपवर्गीकरण करण्याच्या मागणीसाठी मातंग समाज आक्रमक; धाराशिवमध्ये 20 ऑगस्ट रोजी निघणार महामोर्चा 
Maharashtra Live blog updates: आरक्षणाचे उपवर्गीकरण करण्याच्या मागणीसाठी मातंग समाज आक्रमक; धाराशिवमध्ये 20 ऑगस्ट रोजी निघणार महामोर्चा 
BMC Ritu Tawde : मुंबईच्या महापौर रितू तावडेंच्या प्रसिद्धीसाठी BMCच्या तिजोरीतून 25 लाख खर्च होणार? स्थायी समितीतील 'तो' प्रस्ताव वादाच्या भोवऱ्यात
मुंबईच्या महापौर रितू तावडेंच्या प्रसिद्धीसाठी BMCच्या तिजोरीतून 25 लाख खर्च होणार? स्थायी समितीतील 'तो' प्रस्ताव वादाच्या भोवऱ्यात
Nagpur Crime: नागपूरच्या हॉटेलमध्ये भयंकर घटना, रुममधून मुलीच्या किंचाळण्याचा आवाज, स्टाफने धावत जाऊन दार उघडताच दिसलं हादरवणारं दृश्य
नागपूरच्या हॉटेलमध्ये भयंकर घटना, रुममधून मुलीच्या किंचाळण्याचा आवाज, स्टाफने धावत जाऊन दार उघडताच दिसलं हादरवणारं दृश्य
Thane News: 'मुख्यमंत्री काका, आमच्या रस्त्याकडे लक्ष द्या!', 'चंद्रावरही नसतील एवढे खड्डे आमच्या रस्त्यावर' भिवंडीतील रस्त्याची दुरवस्था, चिमुकल्यांची थेट मुख्यमंत्र्यांकडे साद
'मुख्यमंत्री काका, आमच्या रस्त्याकडे लक्ष द्या!', 'चंद्रावरही नसतील एवढे खड्डे आमच्या रस्त्यावर' भिवंडीतील रस्त्याची दुरवस्था, चिमुकल्यांची थेट मुख्यमंत्र्यांकडे साद

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Marathwada Rain Update: मराठवाड्यात शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी अपडेट, फक्त आज-उद्या पाऊस पडणार नंतर गायब होणार, हवामान खात्याकडून बळीराजाला महत्त्वाचा सल्ला
मराठवाड्यात शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी अपडेट, फक्त आज-उद्या पाऊस पडणार नंतर गायब होणार, हवामान खात्याकडून बळीराजाला महत्त्वाचा सल्ला
Nagpur Crime: नागपूरच्या हॉटेलमध्ये भयंकर घटना, रुममधून मुलीच्या किंचाळण्याचा आवाज, स्टाफने धावत जाऊन दार उघडताच दिसलं हादरवणारं दृश्य
नागपूरच्या हॉटेलमध्ये भयंकर घटना, रुममधून मुलीच्या किंचाळण्याचा आवाज, स्टाफने धावत जाऊन दार उघडताच दिसलं हादरवणारं दृश्य
BMC Ritu Tawde : मुंबईच्या महापौर रितू तावडेंच्या प्रसिद्धीसाठी BMCच्या तिजोरीतून 25 लाख खर्च होणार? स्थायी समितीतील 'तो' प्रस्ताव वादाच्या भोवऱ्यात
मुंबईच्या महापौर रितू तावडेंच्या प्रसिद्धीसाठी BMCच्या तिजोरीतून 25 लाख खर्च होणार? स्थायी समितीतील 'तो' प्रस्ताव वादाच्या भोवऱ्यात
Thane News: 'मुख्यमंत्री काका, आमच्या रस्त्याकडे लक्ष द्या!', 'चंद्रावरही नसतील एवढे खड्डे आमच्या रस्त्यावर' भिवंडीतील रस्त्याची दुरवस्था, चिमुकल्यांची थेट मुख्यमंत्र्यांकडे साद
'मुख्यमंत्री काका, आमच्या रस्त्याकडे लक्ष द्या!', 'चंद्रावरही नसतील एवढे खड्डे आमच्या रस्त्यावर' भिवंडीतील रस्त्याची दुरवस्था, चिमुकल्यांची थेट मुख्यमंत्र्यांकडे साद
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Maharashtra Live blog updates: आरक्षणाचे उपवर्गीकरण करण्याच्या मागणीसाठी मातंग समाज आक्रमक; धाराशिवमध्ये 20 ऑगस्ट रोजी निघणार महामोर्चा 
Maharashtra Live blog updates: आरक्षणाचे उपवर्गीकरण करण्याच्या मागणीसाठी मातंग समाज आक्रमक; धाराशिवमध्ये 20 ऑगस्ट रोजी निघणार महामोर्चा 
Rapido Uber OLA new Rules: ओला, उबेर, रॅपिडो वाहनचालकांसाठी 1 सप्टेंबरपासून नवे नियम लागू, परिवहन विभागाच्या आठ निर्णयांनी सर्वच बदलणार
ओला, उबेर, रॅपिडो वाहनचालकांसाठी 1 सप्टेंबरपासून नवे नियम लागू, परिवहन विभागाच्या आठ निर्णयांनी सर्वच बदलणार
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Embed widget