एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
रंकाळ्याकाठी अश्लील चाळे, प्रेमी युगुलांवर पोलिसांची कारवाई
![रंकाळ्याकाठी अश्लील चाळे, प्रेमी युगुलांवर पोलिसांची कारवाई Kolhapur Couples At Rankala Talao Detained By Police रंकाळ्याकाठी अश्लील चाळे, प्रेमी युगुलांवर पोलिसांची कारवाई](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/08/31212059/Rankala-Talao-270x202.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
कोल्हापूर : रंकाळा तलाव परिसरातील बागेत अश्लील चाळे करणाऱ्या 10 महाविद्यालयीन जोडप्यांना आज पोलिसांनी ताब्यात घेतलं. या प्रकरणातील सर्व मुली अकरावीच्या वर्गात शिकणाऱ्या आहे.
कोल्हापुरातील रंकाळा तलावाशेजारी असणाऱ्या बागेत सकाळी काही नागरिक व्यायामासाठी तर काही फिरण्यासाठी येत असतात. याच परिसरातील काही महाविद्यालयीन प्रेमीयुगुलंही या परिसरात येतात. इतर वेळी कोणी हटवत नसलं तरी बुधवारची सकाळ मात्र 10 प्रेमी युगुलांसाठी अविस्मरणीय ठरणार आहे.
ही जोडपी अश्लिल चाळे करत असल्याचं स्थानिकांच्या लक्षात आलं. यावेळी नागरिकांनी याची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर निर्भया पथक आणि दामिनी पथकानं रंकाळा बागेत जाऊन या जोडप्यांना रंगेहाथ पकडलं.
विशेष म्हणजे या प्रकरणातील मुली या अकरावी इयत्तेत शिकणाऱ्या आहेत, तर सर्व मुलं ही टवाळखोर आणि निरुद्योगी आहेत. या प्रेमीयुगुलांच्या पालकांना पोलिस ठाण्यात बोलावून त्यांना समज देण्यात आली.
Khelo khul ke, sab bhool ke - only on Games Live
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ठाणे
मुंबई
राजकारण
करमणूक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![सिद्धेश ताकवले](https://cdn.abplive.com/imagebank/editor.png)
सिद्धेश ताकवलेप्रतिनिधी
Opinion