एक्स्प्लोर

कोकण विधानपरिषद : राणेंचा अनिकेत तटकरेंना पाठिंबा

कोकणात महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाने विधानपरिषदेसाठी उमेदवार उभा करावा, असा प्रस्ताव भाजपने दिला होता. मात्र, नारायण राणेंनी स्वत:च्या पक्षाचा उमेदवार उभा न करता, अनिकेत तटकरे यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबई : कोकण विधानपरिषदेसाठी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष खासदार नारायण राणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अनिकेत तटकरे यांना पाठिंबा दिला आहे. थोड्याच वेळात नारायण राणे यासंदर्भात अधिकृत घोषणा करणार आहेत. नारायण राणे यांनी कोकणात महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या कार्यकर्त्यांची तातडीने बैठक बोलावली आहे. कोकणात महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाने विधानपरिषदेसाठी उमेदवार उभा करावा, असा प्रस्ताव भाजपने दिला होता. मात्र, नारायण राणेंनी स्वत:च्या पक्षाचा उमेदवार उभा न करता, अनिकेत तटकरे यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शिवसेनेसमोरच्या अडचणी आता आणखी वाढणार आहेत. कोकणात यापूर्वीच शिवसेनेकडून राजीव साबळे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. आता कोकण विधानपरिषद निवडणूक शिवसेना विरुद्ध राणे आणि तटकरे अशी होईल. कोकणातले दोन दिग्गज नेते एकत्र आल्याने शिवसेनेसमोरील आव्हान वाढणार आहे. अनिकेत तटकरे कोण आहेत? अनिकेत तटकरे हे राष्ट्रवादीचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि विद्यमान राष्ट्रीय सरचिटणीस सुनील तटकरे यांचे सुपुत्र आहेत. अनिकेत तटकरे यांची बहीण आदिती तटकरे या रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आहेत. अनिकेत तटकरे ज्या जागेवरुन विधानपरिषदेसाठी लढत आहेत, त्या जागेवरुन यापूर्वी त्यांचेच काका अनिल तटकरे हे आमदार होते. अनिल तटकरे यांची कार्यकाळ संपल्यानंतर आता सुनील तटकरे यांचे पुत्र अनिकेत तटकरे यांना या जागेवरुन उमेदवारी मिळाली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

पुण्यातील चाकण MIDC मध्ये रस्त्यांचा आणखी एक बळी, चिखलात दुचाकी फसली; अपघातात महिला जागीच ठार
पुण्यातील चाकण MIDC मध्ये रस्त्यांचा आणखी एक बळी, चिखलात दुचाकी फसली; अपघातात महिला जागीच ठार
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
दोन वर्षांपूर्वी लग्न, 2 जुळ्या मुली; ठाण्यातील मृत TDRF जवानाच्या कुटुंबीयांचा आक्रोश, ठाणे महापौरांकडून आश्वासन
दोन वर्षांपूर्वी लग्न, 2 जुळ्या मुली; ठाण्यातील मृत TDRF जवानाच्या कुटुंबीयांचा आक्रोश, ठाणे महापौरांकडून आश्वासन
मुंबईच्या SRA कार्यालयातील भेटीनंतर रोहित पवार ब्रीच कँडी रुग्णालयात; त्रास जाणवू लागल्याने उपचारासाठी दाखल
मुंबईच्या SRA कार्यालयातील भेटीनंतर रोहित पवार ब्रीच कँडी रुग्णालयात; त्रास जाणवू लागल्याने उपचारासाठी दाखल

व्हिडीओ

Abhijeet Dipke On Narendra Modi : मोदींची डिग्री खरी असावी.. अभिजीत दिपके थेटच बोलले..
Sanjay Raut PC : संघामध्ये मोदी-शाहांनी आपले चमचे पेरले आहेत,संजय राऊतांचा हल्लाबोल
Balasaheb Fadnavis On Devendra Fadnavis: माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha
Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : जॉब नहीं मिलेगा, तो सिंहासन हिलेगा। प्रशांत किशोरांचा भाजपवर विजय, राहुल गांधींचे ट्विट चर्चेत
जॉब नहीं मिलेगा, तो सिंहासन हिलेगा। प्रशांत किशोरांचा भाजपवर विजय, राहुल गांधींचे ट्विट चर्चेत
पुण्यातील चाकण MIDC मध्ये रस्त्यांचा आणखी एक बळ, चिखलात दुचाकी फसली; अपघातात महिला जागीच ठार
पुण्यातील चाकण MIDC मध्ये रस्त्यांचा आणखी एक बळ, चिखलात दुचाकी फसली; अपघातात महिला जागीच ठार
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
Prashant Kishor : बांकीपूरमध्ये प्रशांत किशोर जिंकत आहेत म्हणजेच भाजप जिंकतंय, लालू प्रसाद यादव यांची लेक मीसा भारती यांचा दावा
जनतेला सत्य माहिती नाही, प्रशांत किशोर हेच भाजपचे उमेदवार, लालू प्रसाद यादव यांची कन्या मीसा भारतींचा दावा
'फक्त आमदारकीची नाही, तर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला संदेश देणारी निवडणूक..' थेट भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्याला भगदाड पाडताच बांकीपूरचे बाॅस प्रशांत किशोर काय काय म्हणाले?
'फक्त आमदारकीची नाही, तर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला संदेश देणारी निवडणूक..' थेट भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्याला भगदाड पाडताच बांकीपूरचे बाॅस प्रशांत किशोर काय काय म्हणाले?
दोन वर्षांपूर्वी लग्न, 2 जुळ्या मुली; ठाण्यातील मृत TDRF जवानाच्या कुटुंबीयांचा आक्रोश, ठाणे महापौरांकडून आश्वासन
दोन वर्षांपूर्वी लग्न, 2 जुळ्या मुली; ठाण्यातील मृत TDRF जवानाच्या कुटुंबीयांचा आक्रोश, ठाणे महापौरांकडून आश्वासन
मुंबईच्या SRA कार्यालयातील भेटीनंतर रोहित पवार ब्रीच कँडी रुग्णालयात; त्रास जाणवू लागल्याने उपचारासाठी दाखल
मुंबईच्या SRA कार्यालयातील भेटीनंतर रोहित पवार ब्रीच कँडी रुग्णालयात; त्रास जाणवू लागल्याने उपचारासाठी दाखल
Bankipur byelection Result : भाजपच्या प्रतिष्ठेला 'दे धक्का'; बिहार पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा मोठा विजय, 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग
भाजपच्या प्रतिष्ठेला 'दे धक्का'; बिहार पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा मोठा विजय, 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग
Embed widget