एक्स्प्लोर

अन्नदात्यासाठी अन्नत्याग... किसानपुत्रांचे आज एकदिवसीय उपोषण

राजधुळ साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आणि ख्यातनाम साहित्यिक किशोर सानप यांनी संमेलनात भाषणाच्या सुरुवातीला साहेबराव करपे यांना श्रद्धांजली अर्पण करुन, किसानपुत्र आंदोलनाला पाठिंबा दिला. 19 मार्च रोजी सर्वांनी उपोषण करावे असे आवाहनही केले.

मुंबई : शेतकऱ्यांप्रती सहवेदना व्यक्त करण्यासाठी राज्यभरातील किसानपुत्र आणि पुत्री एकदिवसीय ‘अन्नदात्यासाठी अन्नत्याग’ आंदोलनात सहभागी झाले आहेत. पहिल्या शेतकरी आत्महत्येच्या 32 व्या स्मृतिदिनानिमित्त हे आंदोलन करण्यात येत असून, किसानपुत्र आंदोलनाचे प्रणेते अमर हबीब यांनी या आंदोलनाची घोषणा केली आहे. उपोषणाची तारीख 19 मार्च का? साहेबराव शेषराव करपे हे यवतमाळ जिल्ह्यातील चील-गव्हाण या गावचे शेतकरी. त्यांचे वडील संगीताचे जाणकार होते. साहेबरावांनीही वडिलांकडून संगीताचे धडे घेतले होते. उदरनिर्वाहाचे साधन शेती. शेती परवडत नाही. दरवर्षी तोटाच होतो. घेतलेली कर्जे फेडता येत नाही, लाईटचे बिल भरता येत नाही, हात उसने घेतलेल्या पैशांची परतफेड करता येत नाही.  म्हणून अस्वस्थ होते. एके दिवशी पत्नी मालती व चार अपत्यांना घेऊन ते पवनार आश्रमात गेले. सविस्तर पत्र लिहिले. रात्री जेवणात विषारी औषध कालवून संपूर्ण कुटुंबाने आत्महत्या केली. सकाळी त्या एका खोलीतून सहा शव काढावे लागले. साहेबरावांनी लिहून ठेवलेल्या पत्रात त्यांनी शेतकरी म्हणून जगणे कठीण झाले आहे असे नमूद केले होते. ते पत्र समस्त शेतकरी समाजाची दु:खद कैफियत सांगणारे होते. साहेबराव यांच्या आत्महत्येने सारा महाराष्ट्र हादरून गेला होता. शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांनी या आत्महत्येची गंभीर दखल घ्या व धोरणे बदला अन्यथा अशा आत्महत्त्या रोज होतील असा इशारा दिला होता. ही पहिली जाहीर झालेली शेतकऱ्याची आत्महत्या. ती साहेबराव करपे यांनी 19 मार्च 1986 रोजी केली होती. या 19 मार्चला त्यास 32 वर्ष होतात. म्हणून उपवासासाठी 19 मार्च ही तारीख निवडण्यात आली असल्याची माहिती अमर हबीब यांनी दिली. अमर हबीब यवतमाळमध्ये उपोषणाला बसणार किसानपुत्र आंदोलनाचे प्रणेते अमर हबीब यांनी उपोषणाची हाक दिली असून, ते स्वत:ही या उपोषणात सक्रिय सहभाग घेणार आहेत. अमर हबीब हे यवतमाळ जिल्ह्यातील महागावमध्ये उपोषणाला बसणार आहेत. ज्यांना महागावला जाणं शक्य आहे, त्यांनी तिथेही सहभागी होऊन पाठिंबा दर्शवण्याचं आवाहन अमर हबीब यांनी केलं आहे. साहित्यिक किशोर सानप यांचाही पाठिंबा राजधुळ साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आणि ख्यातनाम साहित्यिक किशोर सानप यांनी संमेलनात भाषणाच्या सुरुवातीला साहेबराव करपे यांना श्रद्धांजली अर्पण करुन, किसानपुत्र आंदोलनाला पाठिंबा दिला. 19 मार्च रोजी सर्वांनी उपोषण करावे असे आवाहनही केले. विशेष म्हणजे, राज्यासह देशभरातून या अन्नत्याग आंदोलनात अनेकजण सहभागी होणार आहेत. किंबहुना, परदेशातूनही अनेकजणांनी आपण सहभागी होणार असल्याचे अमर हबीब यांना कळवले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Abhijeet Dipke deatin Delhi Police: अभिजीत दिपकेंचं विमान दिल्लीत लँड होताच हायव्होल्टेज ड्रामा! महिला पोलीस अधिकाऱ्यांना पुढे केलं, विमानात गेल्या अन् अभिजीत दिपकेंना म्हणाल्या...
अभिजीत दिपकेंचं विमान दिल्लीत लँड होताच हायव्होल्टेज ड्रामा! महिला पोलीस अधिकाऱ्यांना पुढे केलं, विमानात गेल्या अन् अभिजीत दिपकेंना म्हणाल्या...
Akola News: अकोल्यात अवैध सावकारीविरोधात मोठी कारवाई, एपीएमसीसह 28 ठिकाणी छापे; संचालकही चाैकशीच्या फेऱ्यात, 11 जणांच्या तक्रारीनंतर सहकार विभागाच्या नेतृत्वात धाडसत्र
अकोल्यात अवैध सावकारीविरोधात मोठी कारवाई, एपीएमसीसह 28 ठिकाणी छापे; संचालकही चाैकशीच्या फेऱ्यात, 11 जणांच्या तक्रारीनंतर सहकार विभागाच्या नेतृत्वात धाडसत्र
Nashik Crime News: दारूच्या नशेत मित्रच बनले वैरी! दगडी जात्याने डोक्यात वार करून वाहन चालकाला संपवलं, नाशिकमध्ये खळबळ
दारूच्या नशेत मित्रच बनले वैरी! दगडी जात्याने डोक्यात वार करून वाहन चालकाला संपवलं, नाशिकमध्ये खळबळ
Desaiganj Accident: सौर ऊर्जा झटका मशीन यंत्राच्या विजेच्या जबर धक्का; दोन सख्या भावांचा जागीच दुर्दैवी अंत; गडचिरोलीच्या देसाईगंजमध्ये खळबळ
सौर ऊर्जा झटका मशीन यंत्राच्या विजेचा जबर धक्का, संख्या भावाला वाचवण्यासाठी गेलेल्या दुसऱ्या भावाचाही जागीच दुर्दैवी अंत, गडचिरोलीच्या देसाईगंजमध्ये शोककळा

व्हिडीओ

Datta Bharne Vijay Shivtare : वाहिनी गप्पा मारणारी आणि जास्त कानाला लागणारी माणसं आता ओळखा
Abhijeet Dipke On Delhi Protest : CJP आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी परवानगी का नाकारली?
Nana Patekar Funeral Full VIDEO : 'नटसम्राट' अनंतात विलीन.. डोणजे गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Abhijeet Dipke on PM Modi : 'मोदींनी 'आणीबाणी'अधिकृत ठरवली', अभिजीत दिपकेंची टीका : ABP Majha
Eknath Shinde On Nana Patekar : एकनाथ आपल्याला मदत केली पाहिजे, नाना पाटेकरांशी ते बोलणं शेवटचं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Delhi CJP Protest: संपूर्ण दिल्लीच आता जंतर मंतर, प्रत्येक पोलिस स्टेशन लोकांनी भरलं, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या मोर्चावर अमानुष लाठीचार्ज, अजित नवलेंनी ग्राऊंड रिपोर्ट सांगितला
संपूर्ण दिल्लीच आता जंतर मंतर, प्रत्येक पोलिस स्टेशन लोकांनी भरलं, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या मोर्चावर अमानुष लाठीचार्ज, अजित नवलेंनी ग्राऊंड रिपोर्ट सांगितला
ध्रुव राठीला घरातून उचलल्यानंतर अभिजित दिपके, आशुतोष रांका आणि सौरभ दासना महिला पोलिसांनी थेट विमानात घुसून ताब्यात घेतलं, विमानतळावर शेकडो गाड्यांचा फौजफाटा, सीजेपीच्या लीगल टीम हेडला सुद्धा उचललं
ध्रुव राठीला घरातून उचलल्यानंतर अभिजित दिपके, आशुतोष रांका आणि सौरभ दासना महिला पोलिसांनी थेट विमानात घुसून ताब्यात घेतलं, विमानतळावर शेकडो गाड्यांचा फौजफाटा, सीजेपीच्या लीगल टीम हेडला सुद्धा उचललं
CJP Protest Delhi: आंदोलन पेटण्याआधीच दिल्ली पोलिसांनी ध्रुव राठीला उचललं, आता अभिजीत दिपकेंनाही ताब्यात घेणार? दिल्ली विमानतळावर सुरक्षेत प्रचंड वाढ
आंदोलन पेटण्याआधीच दिल्ली पोलिसांनी ध्रुव राठीला उचललं, आता अभिजीत दिपकेंनाही ताब्यात घेणार? दिल्ली विमानतळावर सुरक्षेत प्रचंड वाढ
Pune Crime News: नवी कोरी गाडी गोल-गोल फिरवून स्टंट; शूट अन् ड्रोन, आळंदीत रिलस्टारसह चौघांवर गुन्हा दाखल, इनोव्हाही पोलिसांनी केली जप्त, नेमकं काय घडलं?
नवी कोरी गाडी गोल-गोल फिरवून स्टंट; शूट अन् ड्रोन, आळंदीत रिलस्टारसह चौघांवर गुन्हा दाखल, इनोव्हाही पोलिसांनी केली जप्त, नेमकं काय घडलं?
Sanjay Raut on Delhi Protest: एक कॉकरोच सरकार को.... संजय राऊतांनी नाना पाटेकरांचा डायलॉग मारत सरकारला डिवचलं, म्हणाले...
एक कॉकरोच सरकार को.... संजय राऊतांनी नाना पाटेकरांचा डायलॉग मारत सरकारला डिवचलं, म्हणाले...
Donald Trump : सलग दुसऱ्या वर्षी शांततेच्या नोबेल पुरस्काराची हुलकावणी, डोनाल्ड ट्रम्प नॉर्वेवर भडकले... तुमचा निर्णय कधीच विसरणार नाही म्हणत थेट इशारा दिला
सलग दुसऱ्या वर्षी शांततेच्या नोबेल पुरस्काराची हुलकावणी, डोनाल्ड ट्रम्प नॉर्वेवर भडकले...
Video: शेतकरी आंदोलनाप्रमाणेच सीजेपी आंदोलनातही रस्त्यात खिळे पसरले, दिल्लीच्या सीमांवरही थेट सिमेंट बॅरिकेड, तिकडं जंतर मंतर 2.0 साठी अवघी जेनझी दिल्लीच्या रस्त्यांवर, अनेकांची धरपकड
Video: शेतकरी आंदोलनाप्रमाणेच सीजेपी आंदोलनातही रस्त्यात खिळे पसरले, दिल्लीच्या सीमांवरही थेट सिमेंट बॅरिकेड, तिकडं जंतर मंतर 2.0 साठी अवघी जेनझी दिल्लीच्या रस्त्यांवर, अनेकांची धरपकड
Delhi CJP Protest: राजधानी दिल्लीत अघोषित लॉकडाऊन! पोलिसांच्या अभेद्य चिरेबंदीला अन् छावण्यांना सुद्धा न घाबरता जेन झी बॅनरसह जंतर मंतरवर सकाळपासूनच धडकली
राजधानी दिल्लीत अघोषित लॉकडाऊन! पोलिसांच्या अभेद्य चिरेबंदीला अन् छावण्यांना सुद्धा न घाबरता जेन झी बॅनरसह जंतर मंतरवर सकाळपासूनच धडकली
Embed widget