एक्स्प्लोर

'अन्नदात्यासाठी अन्नत्याग' आंदोलन, किसानपुत्र पुन्हा एकवटणार

किसानपुत्र आंदोलनाचे प्रणेते अमर हबीब यांनी याबाबत माहिती दिली.

बीड : महाराष्ट्रातील ठिकठिकाणचे किसानपुत्र येत्या 19 मार्च रोजी एक दिवस उपोषण करून 'अन्नदात्यासाठी अन्नत्याग' आंदोलन करणार आहेत. गेल्यावर्षी या दिवशी महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील संवेदनशील नागरिकांनी एक दिवस अन्नत्याग आंदोलन केलं होतं. या वर्षीही हजारो शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा 19 मार्च रोजी किसानपुत्र अन्नत्याग आंदोलन करणार आहेत. 19 मार्च 1986 रोजी चिल गव्हाण (यवतमाळ जिल्हा) येथील शेतकरी साहेबराव करपे आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबाने पवनारला जाऊन आत्महत्या केली होती. ही दारुण घटना शेतकऱ्यांची पहिली आत्महत्या मानली जाते. 32 वर्षांपूर्वी झालेल्या या आत्महत्येनंतर सातत्याने शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत. किसानपुत्र आंदोलनाचे प्रणेते अमर हबीब यांनी याबाबत माहिती दिली. ''हे कुठल्या एका संघटनेचं आंदोलन नाही. आपल्या अवतीभोवती रोज आत्महत्या होताना आपण काय करू शकतो? आपण किमान सहवेदना व्यक्त करायला पाहिजे. याला उपवास म्हणा, उपोषण म्हणा वा अन्नत्याग म्हणा. आपण व्यक्तिगत करू शकता. तुमच्या संघटनेच्या नावाने करू शकता. कामावर असताना करू शकता, हवं तर एके ठिकाणी बसून करू शकता. सुजाण नागरिकांनी विशेषतः शहरात गेलेल्या किसानपुत्र आणि पुत्रीनी यात हिरीरीने भाग घ्यावा,'' असं आवाहन अमर हबीब यांनी केलं. ''शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचं मूळ कारण शेतकरीविरोधी कायदे आहेत. त्याविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली जाणार आहे,'' अशी माहितीही अमर हबीब यांनी दिली. ''मी यंदा पवनार येथे प्रशांत हमदापूरकर, अभिजित फाळके, किशोर माथनकर, अॅड. दिनेश शर्मा या मित्रांसोबत उपोषण करणार आहे,'' असंही अमर हबीब यांनी सांगितलं.

महत्त्वाच्या बातम्या

Tukaram Mundhe : लोकांची दिवाळी 'गोड' होणार! FDA मधून बदली नाही, भेसळयुक्त अन्न, औषधांविरोधात लढाई सुरूच; MPSC मध्ये बदलीच्या चर्चेवर तुकाराम मुंढेंची पोस्ट
लोकांची दिवाळी 'गोड' होणार! FDA मधून बदली नाही, भेसळयुक्त अन्न, औषधांविरोधात लढाई सुरूच; MPSC मध्ये बदलीच्या चर्चेवर तुकाराम मुंढेंची पोस्ट
Tribal Students Protest : आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर सरकार ॲक्शन मोडवर, 'सेंट्रल किचन'च्या अन्नाच्या दर्जाची होणार चौकशी
आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर सरकार ॲक्शन मोडवर, 'सेंट्रल किचन'च्या अन्नाच्या दर्जाची होणार चौकशी
धक्कादायक! चिमुकल्या बाळाचे अपहरण करुन विक्री; महिलांची टोळी अटकेत, गुजरातला नेणार असल्याचं तपासातून समोर
धक्कादायक! चिमुकल्या बाळाचे अपहरण करुन विक्री; महिलांची टोळी अटकेत, गुजरातला नेणार असल्याचं तपासातून समोर
Ahilyadevi Holkar Karjmukti Yojana 3rd List : शेतकरी कर्जमुक्तीची तिसरी यादी जाहीर, साडेतीन लाख शेतकऱ्यांना थेट लाभ; लाभार्थ्यांची नावं कुठे पाहाल?
शेतकरी कर्जमुक्तीची तिसरी यादी जाहीर, साडेतीन लाख शेतकऱ्यांना थेट लाभ; लाभार्थ्यांची नावं कुठे पाहाल?

व्हिडीओ

India Alliance Supreme Court Morcha : विरोधकांची 'सुप्रीम' धाव; कुणाकुणावर घाव? | Special Report ABP Majha
Abhijeet Dipke vs Delhi Police : दिपके, पोलीस भिडले; कोण कुणाला नडले? | Special Report ABP Majha
Sunetra Pawar Speech : अजित पवारांचे नाव घेताना सुनेत्रा पवार भावुक, भावनिक भाषण
MPSC Protest Pune: पुण्यातील तिन्ही आंदोलनं कशी गुंडाळली?; Inside Story
Shetitil Navdurga | Swati Kushare |‘शेतकरी’ म्हणवून घेण्याचा संकोच होता… आज त्याच ओळखीचा अभिमान आहे!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Someshwar Sugar Factory Election Result : 'सोमेश्वर'वर राष्ट्रवादीचे एकछत्री वर्चस्व! सुनेत्रा पवारांच्या पॅनेलचा 21-0 ने विजय; विरोधकांचे मनसुबे धुळीस
'सोमेश्वर'वर राष्ट्रवादीचे एकछत्री वर्चस्व! सुनेत्रा पवारांच्या पॅनेलचा 21-0 ने विजय; विरोधकांचे मनसुबे धुळीस
Tribal Students Protest : आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर सरकार ॲक्शन मोडवर, 'सेंट्रल किचन'च्या अन्नाच्या दर्जाची होणार चौकशी
आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर सरकार ॲक्शन मोडवर, 'सेंट्रल किचन'च्या अन्नाच्या दर्जाची होणार चौकशी
Ahilyadevi Holkar Karjmukti Yojana 3rd List : शेतकरी कर्जमुक्तीची तिसरी यादी जाहीर, साडेतीन लाख शेतकऱ्यांना थेट लाभ; लाभार्थ्यांची नावं कुठे पाहाल?
शेतकरी कर्जमुक्तीची तिसरी यादी जाहीर, साडेतीन लाख शेतकऱ्यांना थेट लाभ; लाभार्थ्यांची नावं कुठे पाहाल?
सोमेश्वर कारखाना निवडणुकीत एकतर्फी विजय; सुनेत्रा पवार भावुक, जय स्मृतीस्थळावर, पार्थ पवारांनाही आनंद
सोमेश्वर कारखाना निवडणुकीत एकतर्फी विजय; सुनेत्रा पवार भावुक, जय स्मृतीस्थळावर, पार्थ पवारांनाही आनंद
मतदार यादीतील नाव नोंदणीस आणखी मुदतवाढ; SIR प्रक्रियेत नाव वगळलेल्यांना संधी, निवडणूक आयोगाचा निर्णय
मतदार यादीतील नाव नोंदणीस आणखी मुदतवाढ; SIR प्रक्रियेत नाव वगळलेल्यांना संधी, निवडणूक आयोगाचा निर्णय
धक्कादायक! चिमुकल्या बाळाचे अपहरण करुन विक्री; महिलांची टोळी अटकेत, गुजरातला नेणार असल्याचं तपासातून समोर
धक्कादायक! चिमुकल्या बाळाचे अपहरण करुन विक्री; महिलांची टोळी अटकेत, गुजरातला नेणार असल्याचं तपासातून समोर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑक्टोबर 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑक्टोबर 2026 | सोमवार
विरोधी पक्षांचा पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टावर विराट मोर्चा, अभूतपूर्व एकजुटीने दिल्ली दणाणली; राहुल, अखिलेश यादवांसह 11 विरोधी नेत्यांकडून SIR, ज्ञानेश कुमारांविरोधात रिट याचिका
विरोधी पक्षांचा पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टावर विराट मोर्चा, अभूतपूर्व एकजुटीने दिल्ली दणाणली; राहुल, अखिलेश यादवांसह 11 विरोधी नेत्यांकडून SIR, ज्ञानेश कुमारांविरोधात रिट याचिका
Embed widget