Raj Thackeray Grandson : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांचे पुत्र अमित ठाकरे (Amit Thackeray) आणि सून मिताली बोरुडे (Mitali Borude) यांना नुकतंच पुत्ररत्नाचा लाभ झाला आहे. या चिमुकल्याचं नावं 'किआन' (Kiaan) असं ठेवण्यात आलं आहे. नुकताच या चिमुकल्याचा राज ठाकरे यांच्या घरी नामकरण सोहळा पार पडला आहे. या सोहळ्यासाठी केवळ घरातीलच लोकांना आमंत्रित करण्यात आलं. 5 एप्रिल रोजी राज ठाकरे यांच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचं आगमन झालं होत. नव्या पाहुण्याच्या आगमनाची माहिती मनसेचे सचिव सचिन मोरे यांनी फेसबुकवर पोस्ट करत माहिती दिली होती.


राज ठाकरे यांचा नातू आणि अमित ठाकरे यांच्या पुत्राचं नाव 'किआन' असं ठेवण्यात आलं आहे. 'किआन' हे हिंदू धर्मातील नाव आहे. या नावाचा अर्थ देवाची कृपा (Grace of God), प्राचीन (Ancient), राजेशाही (Royal) असा आहे. याची रास मिथून असून नक्षत्र मृग आहे. दरम्यान राज ठाकरे यांच्या नातवाचं नाव काय असणार यावरून अनेक चर्चा रंगल्या होत्या. सोशल मीडियावर यासंदर्भात अनेक चर्चा आणि पोस्टही व्हायरल झाल्या होत्या त्यानंतर आता अखेरीस अमित ठाकरेंच्या पुत्राचा नामकरण सोहळा पार पडला आहे. 


आता यापुढे राज ठाकरे आपल्या नातवासोबत वेळ घालवताना आणि किआन त्यांच्या अंगाखांद्यावर खेळताना दिसेल. चिमुकल्याचा आगमनापासूनच राज ठाकरे यांच्या घरी उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतं आहे. चिमुकल्याच्या आगमनानंतर बाळाचे आजोबा राज ठाकरे आणि त्याच्या पत्नी म्हणजे बाळाच्या आजी शर्मिला यांनी आनंद व्यक्त केला होता. त्यांनी प्रतिक्रिया देत सांगितलं होतं की, 'आजी-आजोबा होण्यासारखं दुसरं कोणतंही सुख नाही.'




अमित ठाकरे आणि मिताली बोरुडे यांचे 27 जानेवारी 2019 रोजी लग्न झाले होते. त्या दरम्यानच अमित ठाकरे राजकारणात सक्रिय झाले होते. या लग्नसोहळ्यात प्रतिष्ठित नेते, ज्येष्ठ राजकीय मंडळी आणि याशिवाय बॉलिवूड-मराठी सिनेसृष्टीतील कलाकारांनी उपस्थिती दर्शवली होती.आता अमित ठाकरे यांना एक वडील म्हणून तर राज ठाकरे यांना आजोबा म्हणून नवी जबाबदारी सांभाळावी लागणार आहे. आजोबा झाल्याची माहिती मिळताच मनसे अध्यक्ष राज ठाकरे स्वत: ब्रीच कँन्डी रुग्णालयात तत्काळ दाखल झाले होते. तसेच त्यांचे इतर कुटुंबियही रुग्णालयात दाखल झाले होते.नव्या पाहुण्याचं आगमन झाल्याने ठाकरे कुटुंबामध्ये सध्या आनंदाचं वातवरण पाहायला मिळत आहे. त्यामुळे राज ठाकरे आता आजोबाच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहेत.


दरम्यान, काही आठवड्यांपूर्वी राज यांच्या घरी नव्या पाहुण्याचे आगमन होणार असल्याची बातमी प्रसारमाध्यमांपर्यंत पोहचली होती. राज ठाकरेंच्या शिवतीर्थ या नवीन निवासस्थानी या नव्या पाहुण्याच्या आगमनाची तयारी काही आठवड्यांपासून सुरु होती.काही महिन्यांपूर्वीच राज हे त्यांच्या ‘कृष्णकुंज’ निवासस्थानावरुन सहकुटुंब ‘शिवतीर्थ’ या नव्या निवासस्थानी शिफ्ट झाले. याच नवीन घरामध्ये आता हा चिमुकला खेळताना, बागडताना दिसणार आहेत.


महत्त्वाच्या इतर बातम्या :