Devendra Fadnavis : रायगड जिल्ह्यातील खालापूरनजिक इर्शाळगड येथे दरड  कोसळण्याची (Khalapur Irshalwadi Landslide) घटना मध्यरात्री घडली. या घटनेत काही लोकांचा मृत्यू झाला, त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी असल्याचे उपमुख्मंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy Chief Minister Devendra Fadnavis) म्हणाले. यावेळी फडणवीस यांनी मृत झालेल्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. मृतांच्या वारसांना राज्य सरकार सर्वतोपरी मदत करणार असून, जखमींच्या उपचाराचा संपूर्ण खर्च राज्य सरकार करणार  असल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले. 


परिस्थितीवर आणि मदत-बचावकार्यावर सातत्याने लक्ष ठेऊन


ही घटना झाल्याचे कळताच काल मध्यरात्रीपासूनच मी स्थानिक प्रशासनाच्या संपर्कात आहे. एनडीआरएफच्या 2 चमू घटनास्थळी तातडीने दाखल झाल्या असून, आणखी दोन चमू थोड्याच वेळात पोहोचत आहेत. प्रचंड पाऊस आणि अंधार यामुळे मदतकार्यात प्रारंभी अडचणी आल्या, मात्र आता ते गतीने होत आहे. प्राथमिक माहितीनुसार एकूण 48 कुटुंब येथे आहेत. यामध्ये पाच जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. यातून 75 जणांना बाहेर काढण्यात यश आलं आहे. जखमींवर तातडीने उपचाराची व्यवस्था करण्यात आली आहे. मृतांच्या वारसांना सर्वतोपरी मदत राज्य सरकारतर्फे केली जाईल तसेच जखमींचा उपचाराचा संपूर्ण खर्च राज्य सरकार करेल. आम्ही सारे परिस्थितीवर आणि मदत-बचावकार्यावर सातत्याने लक्ष ठेवून आहोत असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.


नेमकं काय घडलं


राज्याच्या विविध भागात मुसळधार पाऊस सुरु आहे. या पावसामुळं बुधवारी रात्री रायगड (Raigad) जिल्ह्यातील खालापूरजवळील इर्शाळवाडीवर (Irshalwadi) (इर्शाळगड ) इथं दरड (Landslide) कोसळल्याची घटना घडली. यामध्ये 100 हून अधिक लोक अडकल्याची शक्यता वर्तवली जात आहे. आतापर्यंत 25 लोकांना रेस्क्यू करण्यामध्ये यश आलं आहे. तर यामध्ये पाच जणांचा मृत्यू झाला आहे.   


या गावात 50 ते 60 घरांची वस्ती असून जवळपास 200 ते 300  मतदार असल्याची माहिती मिळाली आहे. मातीच्या ढिगाऱ्याखाली अंदाजे 30 ते 40 घरातील लोक अडकल्याची माहिती मिळाली आहे. रात्री साडेदहा ते अकरा वाजण्याच्या सुमारास ही लँड्स लाईडची घटना घडली आहे. रायगड जिल्ह्यामधील इर्शाळवाडी इथं ही घटना घडली आहे. NDRF चे बचावकार्य सुरु आहे. डोंगरावर सतत सुरू असलेला लँड्स लाईड आणि जोरदार पावसामुळे रेस्क्यूमध्ये अडचण निर्माण होत आहे. आता पर्यंत 25 लोकांना रेस्क्यू करण्यामध्ये यश आलं आहे.यात पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाली आहे. आतापर्यंत 25 लोकांना रेस्क्यू करण्यामध्ये यश आलं आहे. तर यामध्ये चार जणांचा मृत्यू झाला आहे. 


महत्त्वाच्या बातम्या:


Khalapur Irshalgad Landslide : रायगडमधील इर्शाळवाडीवर दरड कोसळली, चार जणांचा मृत्यू; 100 हून अधिक लोक अडकल्याची शक्यता