एक्स्प्लोर

केडगाव शिवसैनिक हत्या प्रकरणी संग्राम जगतापांना जामीन

केडगावातील दोघा शिवसैनिकांच्या हत्येप्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप आणि बाळासाहेब कोतकर यांना अहमदनगर जिल्हा सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला.

अहमदनगर : केडगावमधील दोन शिवसैनिकांच्या हत्याकांड प्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांना जामीन मंजूर झाला आहे. जगताप आणि बाळासाहेब कोतकर यांना अहमदनगर जिल्हा सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला.

प्रत्येकी 15 हजार रुपयाच्या जातमुचलक्यावर आणि तपासात सहकार्य करणे आणि साक्षीदार-फिर्यादीवर दबाव न टाकण्याच्या अटीवर जामीन मंजूर करण्यात आला आहे. जगताप सध्या नाशिक कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहेत. जामीन मिळाल्यानंतर जगताप आज कारागृहातून सुटण्याची शक्यता आहे. या प्रकरणी शुक्रवारी सीआयडीने जिल्हा सत्र न्यायालयात दहा आरोपींपैकी आठ जणांवर आरोपपत्र सादर केलं होतं. या आरोपपत्रात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप आणि बाळासाहेब कोतकर यांना तात्पुरता दिलासा मिळाला. आरोपपत्रात दोघांचा समावेश नव्हता. तपासात निष्पन्न झाल्यास पुरवणी आरोपपत्रात दोघांची नावं समावेश होण्याची तरतूद करण्यात आली असल्याने संग्राम जगताप यांच्यावर टांगती तलवार कायम आहे. तर भानुदास कोतकर, संदीप गुंजाळ, विशाल कोतकर, रवींद्र खोल्लम, बाबासाहेब केदार, भानुदास महादेव कोतकर, संदीप गिऱ्हे आणि महावीर मोकळ यांच्या नावाचा आरोपपत्रात समावेश आहे. हत्या आणि हत्याचा कट, आर्म अॅक्टसह आरोपपत्र दाखल करण्यात आलं. काय आहे प्रकरण? केडगाव शिवसेनेचे शहर उपप्रमुख संजय कोतकर आणि वसंत ठुबे यांची सात एप्रिलला गोळ्या झाडून आणि गुप्तीने गळा चिरुन निर्घृणपणे हत्या करण्यात आली. महापालिकेच्या पोटनिवडणुकीच्या राजकीय वादातून ही हत्या झाली होती. संदीप गुंजाळसह चौघांनी हत्या केल्याचा आरोप आहे. हत्येनंतर दुसऱ्याच दिवशी गुंजाळला अटक करण्यात आली होती. तपासासाठी पोलिसांनी एसआयटीची स्थापना केली होती. मात्र मृतांच्या कुटुंबीयांनी पोलीस तपासावर आक्षेप घेतल्याने तपास सीआयडीकडे वर्ग करण्यात आला. हत्याकांड प्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप, वडील आमदार अरुण जगताप आणि सासरे भाजप आमदार शिवाजी कर्डिले, व्याही भानुदास कोतकर, संदीप कोतकर आणि विशाल कोतकरसह 36 जणांवर कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. हत्या, हत्येच्या कटासह इतर कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी आमदार संग्राम जगतापसह दहा जण न्यायालयीन कोठडीत आहेत. संदीप गुंजाळ, भानुदास कोतकर, बाळासाहेब कोतकर, बी एम कोतकर, रवी खोल्लम, संदिप गिर्‍हे, महावीर मोकळ, विशाल कोतकर आणि बाबासाहेब केदार न्यायालयीन कोठडीत आहेत. मात्र या प्रकरणी आमदार अरुण जगताप यांना अद्याप अटक झाली नसून ते फरार आहेत. महापालिकेच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसचा विशाल कोतकर निवडून आला होता. मात्र सायंकाळी दोघा शिवसैनिकांची निर्घृणपणे हत्या झाली. यानंतर शिवसैनिकांनी केडगावला रस्ता रोको आंदोलन करुन मारेकऱ्यांना अटक करण्याची मागणी केली. अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह घटनास्थळीच होते. यानंतर राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांची पोलीस अधीक्षक कार्यालयात चौकशी करण्यात आली. यावेळी जमावाने एसपी कार्यालयाची तोडफोड करुन संग्राम जगताप यांना घेऊन गेले होते. या प्रकरणी दुसरा गुन्हा दाखल करण्यात आला. भाजप आमदार शिवाजी कर्डिले यांच्यासह अनेकांना अटक करण्यात आली होती.

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Crime Navy Sailor: मुंबईत एकाच घरात सापडले 4 मृतदेह, नौदल कर्मचाऱ्याने पत्नी अन् दोन मुलांना संपवलं, मग स्वतःही आयुष्याचा केला शेवट, नेमकं काय घडलं?
मुंबईत एकाच घरात सापडले 4 मृतदेह, नौदल कर्मचाऱ्याने पत्नी अन् दोन मुलांना संपवलं, मग स्वतःही आयुष्याचा केला शेवट, नेमकं काय घडलं?
श्री शनि मंदिरातील चौथऱ्यावर भेसळयुक्त तेल; FDA नं नमुने तपासून कारवाई करावी; मंदिर प्रशासनाला निवेदन
श्री शनि मंदिरातील चौथऱ्यावर भेसळयुक्त तेल; FDA नं नमुने तपासून कारवाई करावी; मंदिर प्रशासनाला निवेदन
Girish Mahajan: नाशिकच्या पालकमंत्रीपदाचा तिढा कायम असतानाच मोठा ट्विस्ट, सिंहस्थ कुंभपर्व पुस्तिकेवर गिरीश महाजनांचा ‘पालकमंत्री’ म्हणून उल्लेख; चर्चांना उधाण
नाशिकच्या पालकमंत्रीपदाचा तिढा कायम असतानाच मोठा ट्विस्ट, सिंहस्थ कुंभपर्व पुस्तिकेवर गिरीश महाजनांचा ‘पालकमंत्री’ म्हणून उल्लेख; चर्चांना उधाण
Sayaji Shinde On Omraje Nimbalkar: ती झाडं आता कुठेयत? सयाजी शिंदेंनी खासदार ओमराजे निंबाळकरांना भरमंचावर विचारलं अन्..; धाराशिवच्या कार्यक्रमात नेमकं काय घडलं?
ती झाडं आता कुठेयत? सयाजी शिंदेंनी खासदार ओमराजे निंबाळकरांना भरमंचावर विचारलं अन्..; धाराशिवच्या कार्यक्रमात नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: 'म्हणून मी डान्स करायचा नाही का?' टीम इंडियाची क्रिकेटर श्रेयंका पाटीलचा 'बबली बदमाश है' वर भन्नाट डान्स व्हायरल, ट्रोल करणाऱ्यांनाही सडेतोड प्रत्युत्तर
Video: 'म्हणून मी डान्स करायचा नाही का?' टीम इंडियाची क्रिकेटर श्रेयंका पाटीलचा 'बबली बदमाश है' वर भन्नाट डान्स व्हायरल, ट्रोल करणाऱ्यांनाही सडेतोड प्रत्युत्तर
माजी उपसभापती, मंत्री अन् पाचवेळा आमदार; थेट पक्षाच्या कार्यालयातच लटकलेल्या अवस्थेत आढळल्याने खळबळ; लिहून ठेवलेली नोट सुद्धा सापडली, कार्यकर्त्यांचा विश्वास बसत नसल्याने प्रकरणाचे गूढ वाढलं
माजी उपसभापती, मंत्री अन् पाचवेळा आमदार; थेट पक्षाच्या कार्यालयातच लटकलेल्या अवस्थेत आढळल्याने खळबळ; लिहून ठेवलेली नोट सुद्धा सापडली, कार्यकर्त्यांचा विश्वास बसत नसल्याने प्रकरणाचे गूढ वाढलं
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये आले असते तर त्यांचे प्राण वाचले असते; संजय राऊतांचा खळबळजनक दावा, सांगितला इतिहास
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये आले असते तर त्यांचे प्राण वाचले असते; संजय राऊतांचा खळबळजनक दावा, सांगितला इतिहास
नगर- मनमाड रस्त्याचं काम अमेरिका-इराण युद्धामुळे रखडलंय, ट्रम्पसारखा वेडा माणूस मी कधीही पाहिला नाही; सुजय विखेंच्या नवीन वक्तव्याची चर्चा
नगर- मनमाड रस्त्याचं काम अमेरिका-इराण युद्धामुळे रखडलंय, ट्रम्पसारखा वेडा माणूस मी कधीही पाहिला नाही; सुजय विखेंच्या नवीन वक्तव्याची चर्चा
Mumbai Crime Navy Sailor: मुंबईत एकाच घरात सापडले 4 मृतदेह! नौदल कर्मचाऱ्याने पत्नी अन् दोन मुलांना संपवलं, मग स्वतःही आयुष्याचा केला शेवट, नेमकं काय घडलं?
मुंबईत एकाच घरात सापडले 4 मृतदेह! नौदल कर्मचाऱ्याने पत्नी अन् दोन मुलांना संपवलं, मग स्वतःही आयुष्याचा केला शेवट, नेमकं काय घडलं?
Ambernath MNS-BJP Clash : अंबरनाथमधील भाजप-मनसे राडा प्रकरणी भाजप नगरसेवकासह सहा जणांविरोधात अखेर गुन्हा दाखल; मनसेचा मोर्चा तूर्तास स्थगित
अंबरनाथमधील भाजप-मनसे राडा प्रकरणी भाजप नगरसेवकासह सहा जणांविरोधात अखेर गुन्हा दाखल; मनसेचा मोर्चा तूर्तास स्थगित
Nalasopara Crime Cake Shop: चामुंडा डेअरीतून वाढदिवसाचा केक घेतला, खाताना मेलेली पाल दिसली अन् ज्याची भीती होती तेच घडलं, नालासोपाऱ्यातील धक्कादायक घटना
चामुंडा डेअरीतून वाढदिवसाचा केक घेतला, खाताना मेलेली पाल दिसली अन् ज्याची भीती होती तेच घडलं, नालासोपाऱ्यातील धक्कादायक घटना
Bhavesh Kaware and Raj Thackeray: मुंबईत नॉनव्हेज खाणाऱ्यांना घर नाकारल्यामुळे अडचणीत सापडला, आता भावेश कावरे राज ठाकरेंना भेटणार
मुंबईत नॉनव्हेज खाणाऱ्यांना घर नाकारल्यामुळे अडचणीत सापडला, आता भावेश कावरे राज ठाकरेंना भेटणार
Embed widget