एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
कल्याण-डोंबिवली मनपा कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस जाहीर
कल्याण : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेकडून आपल्या कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट जाहीर करण्यात आली आहे. महापालिकेतील कायम कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना 15 हजार रुपये बोनस देण्याची घोषणा प्रशासनाने केली आहे.
गेल्या वर्षी निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे महापालिकेतील कर्मचाऱ्यांना गणेशोत्सवातच दिवाळी बोनस देण्यात आला होता. गेल्या वर्षी कल्याण-डोंबिवली पालिकेच्या कर्मचाऱ्यांना 13 हजार रुपयांचा बोनस देण्यात आला होता. यावेळी त्यात दोन हजार रुपयांची वाढ करण्यात आली आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेने कर्मचाऱ्यांना 16 हजार रुपये बोनस, तर कंत्राटी कामगारांना 8 हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय जाहीर केला होता. नवी मुंबई महापालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना गेल्या वर्षीच्या तुलनेत एक हजार रुपयांची वाढ करण्यात आली आहे.
महापालिकेच्या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. गेल्या वर्षी कंत्राटी कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान मिळवण्यासाठी आंदोलन करावं लागलं होतं. नवी मुंबई महानगरपालिकेत 13 हजाराहून अधिक कर्मचारी कार्यरत आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement