KBC Scam Case : राज्यभरात गाजलेल्या केबीसी आर्थिक घोटाळ्याचा (KBC Scam) मुख्य सूत्रधार भाऊसाहेब चव्हाणला अखेर सात वर्षांनी जामीन मिळाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) हा जामीन मंजूर केला आहे. कोट्यवधीचा केबीसी घोटाळ्याचा आरोप असलेला भाऊसाहेब चव्हाण मागील सात वर्षांपासून कारागृहात होता. दरम्यान, त्याने आपल्याला जामीन मिळावा म्हणून सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. यावर सुनावणी करताना न्यायालयाने त्याला एकूण 15 खटल्यांमध्ये जामीन दिला आहे. विशेष म्हणजे, त्याच्यावर नाशिकसह मराठवाड्यात 23 गुन्हे दाखल होते. 


2014 मध्ये नशिक जिल्ह्यातील केबीसी घोटाळा समोर आला होता. पुढे या घोटाळ्याची व्याप्ती 200 कोटींपेक्षा अधिक असल्याचे समोर आले. ज्यात नाशिकसह मराठवाड्यातील औरंगाबाद, बीड, जालना, नांदेड, हिंगोली, परभणी जिल्ह्यात देखील लोकांची फसवणूक झाल्याचे समोर आले. तर बुलढाणासह  राजस्थानामध्ये देखील काही लोकांची चव्हाण याने फसवणूक केल्याचा आरोप आहे. तर देशभरात या प्रकरणी एकूण 23 गुन्हे दाखल करण्यात आले. तर, गुन्हे दाखल होताच चव्हाण फरार झाला होता. शेवटी 2016 मध्ये त्याला नाशिक पोलिसांनी मुंबई विमानतळावरून ताब्यात घेऊन अटक केली होती. 


यामुळे मिळाला जामीन....



  • भाऊसाहेब चव्हाण यास जामीन मंजूर करताना सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले की, 

  • केबीसी घोटाळ्यात दाखल करण्यात आलेल्या सर्व गुन्ह्यांचा तपास पूर्ण झाला आहे.

  • पोलिसांकडून या प्रकरणी न्यायालयात दोषारोपपत्रही दाखल करण्यात आला आहे. 

  • भाऊसाहेब चव्हाण यानेसाडेसात वर्षे कारागृहात काढले आहेत. 

  • या प्रकरणात यापेक्षा अधिक काळ चव्हाणला कारागृहात ठेवणे उचित नसल्याचा दावा करण्यात आला. 


असा होता ‘केबीसी’चा मायाजाल 



  • 17 हजार 500 गुंतवणारे सात सदस्य केले की, महाराष्ट्रात एक मोफत टूर 

  • 17 हजार 500 गुंतवणारे 36 सदस्य केले की, गोव्याक एक मोफत टूर 

  • 17 हजार 500 गुंतवणारे 81 सदस्य केले की, दर महिन्याला पाच हजाराचा धनादेश 

  • 17 हजार 500 गुंतवणारे 252 सदस्य केले की, एक लाखाचा एक चेक किंवा दरमहा दहा हजार रुपयांचा चेक 

  • 17 हजार 500 गुंतवणारे 756 सदस्य केले की, एजंटला दर महिन्याला 51 हजार रुपये 

  • 17 हजार 500 गुंतवणारे 2268 सदस्य केले की, एजंटला प्रतिमहिना एक लाख किंवा सात लाखाचे दागिने

  • 17 हजार 500 गुंतवणारे 6804 सदस्य केले की, एक स्कोडा गाडी मोफत 

  • 17 हजार 500 गुंतवणारे 12600 सदस्य केले की, 51 लाखांचा बंगला मोफत 

  • 17 हजार 500 गुंतवणारे 25556 सदस्य केले की, एक कोटी रोख रक्कम मिळणार अशा क अनेक स्किम्समुळं चव्हाणच्या केबीसीचं जाळं काही दिवसातच दूरवर पसरलं. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


KBC Scam Case : केबीसीची सूत्रधार भाऊसाहेब चव्हाणची अटकेनंतर पहिलीच मुलाखत