एक्स्प्लोर

कार्तिकी एकादशीला महापूजेसाठी यंदा उपमुख्यमंत्र्यांसोबत केवळ 25 जणांना परवानगी

यंदा कार्तिकी एकादशीला (Kartiki Ekadashi) उपमुख्यमंत्र्यांच्या सोबत पूजेला केवळ 25 जण उपस्थित राहणार तर गाभाऱ्यात केवळ 8 लोकांना प्रवेश दिला जाणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर विठ्ठल (Pandharpur Viththal Mandir)मंदिर समितीचा मोठा निर्णय घेतला आहे.

पंढरपूर : उद्या पहाटे होणाऱ्या कार्तिकी एकादशीच्या शासकीय महापूजेसाठी अतिशय मोजक्या लोकांना प्रवेश दिला जाणार असून पूजेला उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कुटुंबीय यांच्यासह मानाचे वारकरी दाम्पत्य आणि केवळ मोजके अधिकारी व पालकमंत्री कुटुंब अशा 25 व्हीआयपींना मंदिरात प्रवेश दिला जाणार आहे. उद्या पहाटे दोन वाजता अजित पवार सपत्नीक विठ्ठल मंदिरात शासकीय महापूजेसाठी येतील. यावेळी मंदिरात पहाटे दोन ते अडीच वाजेपर्यंत विठुरायाची महापूजा होणार असून यानंतर दोन वाजून 55 मिनिटापर्यंत रुक्मिणी मातेची महापूजा होईल. यानंतर 3 वाजून 15 मिनिटापर्यंत उपमुख्यमंत्री व मानाचा वारकरी यांचा सत्कार मंदिर समितीच्या वतीने केला जाणार आहे.

अजित पवार जिथे पूजेचा संकल्प सोडतील त्या चौखांबीमध्ये अजित पवार कुटुंबासह केवळ पुजारी व मानाचे वारकरी अशा आठच लोकांना प्रवेश असेल तर पालकमंत्री, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, मंदिर समिती सहअध्यक्ष व इतर असे एकूण 25 जणांना मंदिरात प्रवेश दिला जाणार असल्याचे मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी सांगितले.

कार्तिकी सोहळ्यात कोरोनाच्या धोक्यामुळे मंदिर समिती अध्यक्ष, अधिकारी, पुजारी व कर्मचाऱ्यांची कोरोना तपासणी करण्यात आली असून मंदिरातही सारखे सॅनिटायझेशनचे काम केले जात आहे . कार्तिकी सोहळ्यानिमित्त पुणे येथील भाविक राम जांभुळकर यांनी विठ्ठल मंदिराला फुलांची आरास केली असून या फुलांनाही सॅनिटाईझ करून घेण्यात आले आहे.

दरवेळी कार्तिकी महापूजेच्या वेळी दोनशे पेक्षा जास्त VIP गर्दी करीत असतात. मात्र यंदा उपमुख्यमंत्र्यांच्या पूजेत प्रशासनाच्या प्रोटोकॉल, पालकमंत्री आणि मानाचा वारकरी ठरलेले कवडूजी भोईर व त्यांच्या पत्नी कुसुमाबाई यांच्याशिवाय कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही.

उपमुख्यमंत्र्यांसोबत शासकीय महापूजेचा मान वर्धा जिल्ह्यातील कवडूजी भोईर यांना यंदा कार्तिकी एकादशीला उपमुख्यमंत्र्यांच्या सोबत कार्तिकी एकादशीची महापूजा करण्याचे मान गेली 10 वर्षे विठ्ठल मंदिरात विना वाजवण्याची सेवा देणारे कवडूजी  भोईर यांना मिळाला आहे. सध्या कोरोनामुळे काळापासून द्वादशी पर्यंत विठ्ठल मंदिर भाविकांना बंद असल्याने मंदिरातच सेवा देणाऱ्यातून चिट्ठी टाकून या मानाच्या वारकऱ्यांची निवड करण्यात आली आहे. विठुरायाच्या सेवेमुळेच देवाने आपल्याला हा बहुमान दिल्याची प्रतिक्रिया कवडूजी भोईर यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली आहे.  कवडूजी भोईर व त्यांच्या पत्नी कुसुमाबाई या वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्याच्या दौलापूर गावाचे रहिवासी आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारीत, पोलिसांनी उचलला
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारीत, पोलिसांनी उचलला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
धक्कादायक! शिवसेना शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाकडून विमानतळावरच गोळीबार, दोन जण जखमी, नेमकं प्रकरण काय?
धक्कादायक! शिवसेना शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाकडून विमानतळावरच गोळीबार, दोन जण जखमी, नेमकं प्रकरण काय?
Manoj Jarange Patil: 'मराठ्यांपुढे सत्तेचं शहाणपण जमत नाहीत, आता आमच्या बाया चपला काढतील'; मनोज जरांगेंचा इशारा
'मराठ्यांपुढे सत्तेचं शहाणपण जमत नाहीत, आता आमच्या बाया चपला काढतील'; मनोज जरांगेंचा इशारा

व्हिडीओ

Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारी, पोलिसांनी उचलला
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारी, पोलिसांनी उचलला
Prithviraj Chavan : गोपीनाथ मुंडेंबाबत माझ्या मनात आदर, ते काँग्रेसमध्ये आले असते तर 2014 ची निवडणूक जिंकलो असतो : पृथ्वीराज चव्हाण
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये आले असते तर 2014 ला हारलो नसतो, मुख्यमंत्रिपदासाठी त्यांचं नाव सुचवलं असतं: पृथ्वीराज चव्हाण
Revanth Reddy: काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप
काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप
Share Market : शेअर बाजारातील मंदीचा फटका, सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 5 कंपन्यांचे 1 लाख कोटी बुडाले, टीसीएसला सर्वाधिक फटका
सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 5 कंपन्यांचे 1 लाख कोटी बुडाले,टीसीएसला सर्वाधिक फटका
Manoj Jarange Patil: '29 ऑगस्टला जीव गेला तरी चालेल पण आंदोलनावर ठाम'; अभ्यासकांसोबतच्या अंतरवाली सराटीतील बैठकीत मनोज जरांगेंचा निर्धार
'29 ऑगस्टला जीव गेला तरी चालेल पण आंदोलनावर ठाम'; अभ्यासकांसोबतच्या अंतरवाली सराटीतील बैठकीत मनोज जरांगेंचा निर्धार
Embed widget