एक्स्प्लोर
Advertisement
कर्नाटकचं नंदिनी दूध आता महाराष्ट्रात
मुंबई : गुजरातच्या 'अमूल'ने महाराष्ट्रात बस्तान बसवल्यानंतर आता कर्नाटकच्या दुधाचा ब्रँडही राज्यात एन्ट्री घेत आहे. 'नंदिनी' या दुधाच्या ब्रँडचं मुंबईत लाँचिंग होणार आहे. धक्कादायक बाब म्हणजे या कार्यक्रमाला दुग्धविकासमंत्री महादेव जानकर या उद्घाटनाला हजेरी लावणार होते. मात्र वाद टाळण्यासाठी जानकरांनी ऐनवेळी कार्यक्रमाला दांडी मारली.
महाराष्ट्राच्या 'आरे'ची दयनीय व्यवस्था आहे. त्यातच खुद्द दुग्धविकासमंत्री महादेव जानकर या उद्घाटनाला हजेरी लावणार होते. त्यामुळे अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं होतं. राज्य सरकारच कर्नाटकच्या दुधाच्या ब्रँडला पायघड्या घालत असल्याचं चित्र यामुळे उपस्थित झालं होतं.
राज्यात आणि मुंबईत सध्या सहकारी दूध उत्पादक संस्थांची अवस्था बिकट आहे. खासगी दुग्ध उत्पादकांची मक्तेदारी मोडित काढण्यासाठी गोकूळ, वारणा, कात्रज या संस्थांच्या मदतीने महाराष्ट्राचा एकच ब्रँड आणण्याचा मनोदय नुकतंच जानकर यांनी बोलून दाखवलं होतं. मात्र तेच कर्नाटक सरकारच्या दुधाच्या ब्रँडच्या उद्घाटनाला उपस्थित राहणार होते.
भारतातील दुसरा क्रमांकावरील दूध ब्रँड म्हणून नंदिनी ओळखला जात असल्याची जाहिरात केली जाते. राज्यातील दैनंदिन दूध संकलन सुमारे 14 कोटी लिटर असलं, तरी त्यात खासगी दुधाचा वाटा 55 ते 60 टक्क्यांपर्यंत आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
निवडणूक
निवडणूक
जळगाव
Advertisement