एक्स्प्लोर

शिवसैनिकांची हत्या : अटकेआधी शिवाजी कर्डिले काय म्हणाले?

“हत्याकांडात व्याही-जावयाचा काय संबंध, ते पोलिस आता तपास करतील. तपास झाल्यानंतरच आता सगळ्या गोष्टी निष्पन्न होतील.”

अहमदनगर : दोन शिवसैनिकांच्या निर्घृण हत्येप्रकरणी भाजप आमदार शिवाजी कर्डिले यांनाही अटक झाली आहे. शिवाजी कर्डिलेंनी मात्र त्यांच्यावरचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. अटकेआधी त्यांनी एबीपी माझाशी बातचित केली. शिवसैनिकांच्या हत्याकांडात व्याही (भाजप आमदार शिवाजी कर्डिले) आणि जावई (राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप) यांचा काय संबंध आहे का, या प्रश्नावर शिवाजी कर्डिले म्हणाले, “हत्याकांडात व्याही-जावयाचा काय संबंध, ते पोलिस आता तपास करतील. तपास झाल्यानंतरच आता सगळ्या गोष्टी निष्पन्न होतील.” “हत्याकांड का झालं, हे सागता येणार नाही. का झाला, कुणी केला, कशामुळे झाला, याचा तपास लावण्याचे काम पोलिस खाते करेल.” असे कर्डिलेंनी सांगितले. तसेच, माझा तर या हत्याकांडाशी कुठल्याही प्रकारचा संबंध नाही, असेही ते म्हणाले. एसपी ऑफिसवरील हल्ल्यासंदर्भात कर्डिले काय म्हणाले? “पोलिस स्टेशनची तोडफोड ही अतिशय दुर्दैवी बाब आहे. कुठल्याही कार्यकर्त्याने किंवा पुढाऱ्याने कायदा हातात घेऊ नये, अशीच माझीही भावना आहे. एसपी ऑफिसमध्ये जी घटना झाली, त्यावेळी नगर तालुक्यात पानी फाऊंडेशनचा कार्यक्रम होता. तो कार्यक्रम संपल्यानतंर ज्यावेळेला मी औरंगाबाद रोडने एसपी ऑफिसजवळ आलो, त्यावेळी तेथे गर्दी पाहून मी थांबलो, त्यावेळी मला कळलं की संग्राम जगतापला इथे तपासासाठी आणलं आहे. मी तेथील जमलेल्या लोकांना हात जोडले आणि विनंती केली की, पोलिसांना जो तपास करायचा तो करु द्या, कायदा हातात घेण्याचे प्रयत्न करु नका. पण लोक ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हते.”, असे एसपी ऑफिसच्या तोडफोडीसंदर्भात शिवाजी कर्डिले यांनी स्पष्टीकरण दिले. “गुंडगिरी कोण करतंय, हा पहिला मुद्दा महत्त्वाचा आहे. गुंडगिरी जर आमच्यासारख्या माणसाने केली असती, तर 1995 पासून 2014 पर्यंत विधानसभेचा आमदार लोकांनी मला केलं पण नसतं. माझ्यासारखा सामान्य माणूस राजकारणात आला, आमदार झाला, मंत्रिपदापर्यंत पोहोचला, जिल्हा बँकेचा सदस्या म्हणून नियुक्त झाला, हे जिल्ह्यातील काही मोठ्या पुढाऱ्यांना त्याची अॅलर्जीही झाली असावी.”, असेही शिवाजी कर्डिले म्हणाले. आतापर्यंत पाच जणांना अटक आतापर्यंत या प्रकरणात आमदार संग्राम जगताप यांच्यासह एकूण पाच जणांना अटक झाली आहे.  काल शिवसेनेचे उपशहर प्रमुख संजय कोतकर आणि वसंत ठुंबे यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि भाजपनं संगनमतानं हत्या केल्याचा आरोप शिवसेनेनं केलाय. याप्रकरणी शिवसेना नेते आज मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत. काय आहे प्रकरण? बिहारलाही लाजवेल असा प्रकार अहमदनगरमधल्या पोटनिवडणुकीदरम्यान घडला. राजकीय वैमनस्यातून दोन शिवसैनिकांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. शिवसेनेचे उपशहर प्रमुख संजय कोतकर आणि कार्यकर्ते वसंत ठुबे शनिवारी सुवर्णनगर परिसरात एकत्र होते. यावेळी त्यांच्यावर गोळीबार करुन गुप्तीनेही वार करण्यात आले. या प्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्यासह चौघांना अटक करण्यात आली आहे. शनिवारी 7 एप्रिलला हे हत्याकांड झालं. कोणत्या पक्षाचा कोण आमदार, कुणाचा कोण नातेवाईक? संग्राम जगताप हे राष्ट्रवादीचे आमदार आहेत, तर त्यांचे वडील अरुण जगताप राष्ट्रवादीकडून विधानपरिषदेवर आमदार आहेत. संग्राम यांचे सासरे शिवाजी कर्डिले भाजपचे आमदार आहेत. कर्डिले यांची कन्या आमदार संग्राम यांची पत्नी आहे, तर कर्डिलेंची दुसरी कन्या सुवर्णा या माजी उपमहापौर असून माजी महापौर संदीप कोतकर यांची पत्नी आहेत. कोतकर यांची कन्या आमदार अरुण जगताप यांची सून आहे. राजकारण अबाधित ठेवण्यासाठी हाडवैर असलेल्या तिघांनी सोयरीक केली, मात्र राजकारणमुळे अशोक लांडे हत्येनंतर पुन्हा हे संकटात सापडले आहेत. लांडे हत्या प्रकरणी कर्डिले यांनीही तुरुंगवास भोगला आहे. एसपी कार्यालयातील तोडफोड प्रकरणी गुन्हे भाजप आमदार शिवाजी कर्डिले, राष्ट्रवादीचे माजी आमदार दादाभाऊ कळमकर, राष्ट्रवादीचे माजी महापौर अभिजीत कळमकर, आमदार संग्राम जगताप यांचे भाऊ, झेडपी सदस्य सचिन जगताप, नगरसेवक कैलास गिरवले यांच्यासह चार नगरसेवक आणि अडीचशे ते तीनशे कार्यकर्त्यांवर एसपी कार्यालयात तोडफोड केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित बातम्या :

महत्त्वाच्या बातम्या

'बंडखोरी करून पक्षावर दावा सांगणे लोकशाहीवर आघात, एकनाथ शिंदेंची नियुक्ती सुद्धा उद्धव ठाकरेंनीच केली होती..' कपिल सिब्बलांकडून सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तीवाद
'बंडखोरी करून पक्षावर दावा सांगणे लोकशाहीवर आघात, एकनाथ शिंदेंची नियुक्ती सुद्धा उद्धव ठाकरेंनीच केली होती..' कपिल सिब्बलांकडून सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तीवाद
राष्ट्रकुलमध्ये लेकानं 'गोल्ड' जिंकलं, आई-वडिलांना माहितीही नाही; अखेर पालकांचा शाळेत सत्कार, मुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन
राष्ट्रकुलमध्ये लेकानं 'गोल्ड' जिंकलं, आई-वडिलांना माहितीही नाही; अखेर पालकांचा शाळेत सत्कार, मुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन
Gunratna Sadavarte : आम्ही मराठा नाही.. बीडमधील मयत घुलेच्या आईसह गुणरत्न सदावर्तेंचे गंभीर आरोप; तुकाराम मुंढे, जरांगे पाटलांवरही बोलले
आम्ही मराठा नाही.. बीडमधील मयत घुलेच्या आईसह गुणरत्न सदावर्तेंचे गंभीर आरोप; तुकाराम मुंढे, जरांगे पाटलांवरही बोलले
Maharashtra Live News Updates: परीक्षा सुधारणा विधेयक आज राज्यसभेत मांडणार, काल लोकसभेत मंजूर
Maharashtra Live News Updates: परीक्षा सुधारणा विधेयक आज राज्यसभेत मांडणार, काल लोकसभेत मंजूर

व्हिडीओ

Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
Rahul Gandhi Vs Amit Shah : विधेयकाची नौका पार, 'पॅलेट'वरुन 'गोळीबार' | Special Report ABP Majha
Pune University Scam | बाजार डीग्रीचा, शिक्षणाचा बट्ट्याबोळ | Special Report ABP Majha
Maratha Reservation | जरांगेंचा पुन्हा एल्गार, सरकारपुढे नवं आव्हान | Special Report ABP Majha
Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: बस ड्रायव्हर ते दगड व्यावसायिक! घरातून नोटा मापून मापून बँकेची 5 मशीन गार पडली! किती कोटींचा ढिगारा अन् सोन्याचा खजिना सापडला? लेकीच्या लग्नात तब्बल 100 कोटी उडवल्याची चर्चा, बॉलिवूड कलाकरांची हजेरी

'बंडखोरी करून पक्षावर दावा सांगणे लोकशाहीवर आघात, एकनाथ शिंदेंची नियुक्ती सुद्धा उद्धव ठाकरेंनीच केली होतीच..' कपिल सिब्बलांकडून सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तीवाद
'बंडखोरी करून पक्षावर दावा सांगणे लोकशाहीवर आघात, एकनाथ शिंदेंची नियुक्ती सुद्धा उद्धव ठाकरेंनीच केली होतीच..' कपिल सिब्बलांकडून सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तीवाद
Shivsena :शिवसेनेचा भाजपची सत्ता असणाऱ्या पुणे महापालिकेत आंदोलनाचा धडका, शिक्षण मंडळातून फाईल गायब झाल्यानं शिवसेना आक्रमक
शिवसेनेचा भाजपची सत्ता असणाऱ्या पुणे महापालिकेत आंदोलनाचा धडका, शिक्षण मंडळाबाहेर घोषणाबाजी 
राष्ट्रकुलमध्ये लेकानं 'गोल्ड' जिंकलं, आई-वडिलांना माहितीही नाही; अखेर पालकांचा शाळेत सत्कार, मुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन
राष्ट्रकुलमध्ये लेकानं 'गोल्ड' जिंकलं, आई-वडिलांना माहितीही नाही; अखेर पालकांचा शाळेत सत्कार, मुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन
Gunratna Sadavarte : आम्ही मराठा नाही.. बीडमधील मयत घुलेच्या आईसह गुणरत्न सदावर्तेंचे गंभीर आरोप; तुकाराम मुंढे, जरांगे पाटलांवरही बोलले
आम्ही मराठा नाही.. बीडमधील मयत घुलेच्या आईसह गुणरत्न सदावर्तेंचे गंभीर आरोप; तुकाराम मुंढे, जरांगे पाटलांवरही बोलले
दिल्लीतील आंदोलकांचे दगडावरील फुट प्रिंट आधारशी लिंक होतील; चंद्रकांत पाटलांनी सांगितला पोलिसांचा ॲडव्हान्स तपास
दिल्लीतील आंदोलकांचे दगडावरील फुट प्रिंट आधारशी लिंक होतील; चंद्रकांत पाटलांनी सांगितला पोलिसांचा ॲडव्हान्स तपास
अंगात टी शर्ट अन् डोक्यावर हेल्मेट, दिल्ली आंदोलनात विद्यार्थ्याला उचलून रस्त्यावर आपटलं, तरी तिरंगा हाती घेत पुन्हा उभं राहिला; न्यायाची मागणी करत राहुल गांधींनी शेअर केला भयावह व्हिडिओ
अंगात टी शर्ट अन् डोक्यावर हेल्मेट, दिल्ली आंदोलनात विद्यार्थ्याला उचलून रस्त्यावर आपटलं, तरी तिरंगा हाती घेत पुन्हा उभं राहिला; न्यायाची मागणी करत राहुल गांधींनी शेअर केला भयावह व्हिडिओ
Pune Crime News: बायकोसोबत मित्राचे संबंध; संशयाचं भूत मनात शिरलं, सोबत राहणाऱ्या मित्राला संपवलं, नंतर पत्नीच्या मदतीने मृतदेह पोत्यात भरून झुडपात फेकला, पोलिसांची चक्र फिरली अन्...
बायकोसोबत मित्राचे संबंध; संशयाचं भूत मनात शिरलं, सोबत राहणाऱ्या मित्राला संपवलं, नंतर पत्नीच्या मदतीने मृतदेह पोत्यात भरून झुडपात फेकला, पोलिसांची चक्र फिरली अन्...
Embed widget