एक्स्प्लोर

मी देशद्रोही असेन, तर जेलमध्ये का टाकले नाही? : कन्हैया कुमार

भ्रष्टाचाराविरोधात लढणारा हा भाजप पक्ष आता भ्रष्टाचारी लोकांना आपल्या पार्टीमध्ये सामील करुन घेत आहे. जनतेला किती फसवणार आहे हे सरकार?, असा सवाल कन्हैयाने विचारला.

कोल्हापूर : मोदी सरकार मला देशद्रोही म्हणतं. मी जर देशद्रोही असेन, तर मला अद्याप जेलमध्ये का टाकले नाही?, असा सवाल विद्यार्थी नेता कन्हैया कुमारने मोदी सरकारला उद्देशून विचारला. शिवाय, माझ्यावर एकतर देशद्रोही आहे असे आरोपपत्र दाखल करा, अन्यथा आरोपमुक्त करा, असं आव्हानही कन्हैयाने सरकारला दिले. कोल्हापुरातील केशवराव भोसले नाट्यगृहातील सभेत कन्हैया कुमार बोलत होता. कोल्हापुरात आज ऑल इंडिया युथ फेडरेशनच्या वतीने कन्हैया कुमारची सभा आयोजित करण्यात आली होती. या वेळी बोलताना कन्हैया कुमारने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. तो म्हणाला, “या देशातील जनतेला मोदी फसवत आहेत. आणखी फसवायचे बंद करा, नाहीतर एक दिवस पळायला जागा मिळणार नाही.” कन्हैयाने मोदींवर निशाणा साधताना म्हणाला, “मोदींनी खूप मोठी मोठी स्वप्ने दाखविली आणि खूप वायदे केले होते. नोटबंदीवेळी कोणताच मोठा मंत्री आमदार, खासदार, मोठे उद्योजक, कुणीही बँकेच्या लाईनमध्ये उभे राहिलेले दिसले नाहीत. यामध्ये फक्त गोरगरीब भरडला गेला.” भ्रष्टाचाराविरोधात लढणारा हा भाजप पक्ष आता भ्रष्टाचारी लोकांना आपल्या पार्टीमध्ये सामील करुन घेत आहे. जनतेला किती फसवणार आहे हे सरकार?, असा सवाल कन्हैयाने विचारला. “गौरी लंकेश यांनी जे लिखाण केले होते त्यांना हिंदूविरोधी होत्या असे म्हणतात. पण त्या हिंदूविरोधी नाहीत तर देशातील हिंदू धर्माच्या नावाखाली जी लोकं राजकारण करत आहेत, त्याचा विरोध करत आहेत. या देशात सर्वच मुस्लिमांना गुन्हेगार ठरवत आहेत. सगळे क्रिमिनल आहेत असं दबाव आणत आहेत.”, असे मत कन्हैयाने मांडले. राम मंदिराच्या नावाखाली नथुरामचा मंदिराचा जो कट रचत आहेत तो बंद करा, असे सुनावत कन्हैया पुढे म्हणाला, “भाजपची धोरणे देशाच्या एकतेविरुद्ध आहेत. देशाची एकता भंग करण्याचे काम हे सरकार करत आहे. या देशात एक राष्ट्र, एक दल, एक नेता जे स्वप्न आहे ते आत्ताच मोडून काढायला हवं. त्यांना या 100 वर्षांच्या आत संविधान बदलायचं आहे. देशाचा झेंडा बदलायचा आहे. हे थांबवण्यासाठी आपण एकत्र यायला हवं. मी निवडणूक लढवणार नाही, पण निवडणूक प्रक्रिया आणि लोकशाही टिकून राहण्यासाठी आपण प्रयत्न करु.” दरम्यान, कन्हैया कुमारच्या सभेच्या पार्श्वभूमीवर केशवराव भोसले नाट्यगृहात बाहेर मोठा तणाव निर्माण झाला होतो. या वेळी कार्यक्रमाला विरोध करण्यासाठी हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी झाली. घोषणा बाजी करणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्यामुळे केशवराव भोसले नाट्यगृहाला पोलीस छावणीचे स्वरुप आले होते.

महत्त्वाच्या बातम्या

महायुतीत पुण्यातून भाजपच फायनल, शिक्षक मतदारसंघातून माघार; शिवसेनेच्या मंगेश चिवटेंची पहिली प्रतिक्रिया
महायुतीत पुण्यातून भाजपच फायनल, शिक्षक मतदारसंघातून माघार; शिवसेनेच्या मंगेश चिवटेंची पहिली प्रतिक्रिया
Pune MPSC Protest: एमपीएससी आंदोलनात उपोषण सोडताच पुणे पोलिसांकडून ऋषिकेश गांगुर्डे, सोमनाथ चव्हाण, गजानन शेळकेसह 15 जणांविरोधात गुन्हा दाखल; रोहित पवार अन् विवेकानंद पाटीलचं काय झालं?
एमपीएससी आंदोलनात उपोषण सोडताच पुणे पोलिसांकडून ऋषिकेश गांगुर्डे, सोमनाथ चव्हाण, गजानन शेळकेसह 15 जणांविरोधात गुन्हा दाखल; रोहित पवार अन् विवेकानंद पाटीलचं काय झालं?
Maharashtra Live News Updates: इंडिया आघाडीचा एल्गार; ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यापर्यंत आंदोलन करण्याची घोषणा
Maharashtra Live News Updates: इंडिया आघाडीचा एल्गार; ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यापर्यंत आंदोलन करण्याची घोषणा
Maharashtra Drought: राज्यात आणखी 36 तालुके दुष्काळाच्या यादीमध्ये समाविष्ट होणार, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती; ग्राउंड ट्रूथिंगबद्दलही मोठा निर्णय
राज्यात आणखी 36 तालुके दुष्काळाच्या यादीमध्ये समाविष्ट होणार, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती; ग्राउंड ट्रूथिंगबद्दलही मोठा निर्णय

व्हिडीओ

Abhijeet Dipke on PM Modi : 'मोदींनी 'आणीबाणी'अधिकृत ठरवली', अभिजीत दिपकेंची टीका : ABP Majha
Eknath Shinde On Nana Patekar : एकनाथ आपल्याला मदत केली पाहिजे, नाना पाटेकरांशी ते बोलणं शेवटचं
Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Nana Patekar Passes Away : अभिनेते नाना पाटेकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन
Rahul Gandhi Protest : राहुल गांधी, प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात UNCUT VIDEO

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Vidhan Parishad Election: पुण्यात बंडखोरांची मनधरणी; शिवसेनेचे मंगेश चिवटे अन् राष्ट्रवादीचे भैया माने यांची माघार, मविआतील बंड देखील थंड, राजकीय घडामोडींना वेग
पुण्यात बंडखोरांची मनधरणी; शिवसेनेचे मंगेश चिवटे अन् राष्ट्रवादीचे भैया माने यांची माघार, मविआतील बंड देखील थंड, राजकीय घडामोडींना वेग
महायुतीत पुण्यातून भाजपच फायनल, शिक्षक मतदारसंघातून माघार; शिवसेनेच्या मंगेश चिवटेंची पहिली प्रतिक्रिया
महायुतीत पुण्यातून भाजपच फायनल, शिक्षक मतदारसंघातून माघार; शिवसेनेच्या मंगेश चिवटेंची पहिली प्रतिक्रिया
Pune MPSC Protest: एमपीएससी आंदोलनात उपोषण सोडताच पुणे पोलिसांकडून ऋषिकेश गांगुर्डे, सोमनाथ चव्हाण, गजानन शेळकेसह 15 जणांविरोधात गुन्हा दाखल; रोहित पवार अन् विवेकानंद पाटीलचं काय झालं?
एमपीएससी आंदोलनात उपोषण सोडताच पुणे पोलिसांकडून ऋषिकेश गांगुर्डे, सोमनाथ चव्हाण, गजानन शेळकेसह 15 जणांविरोधात गुन्हा दाखल; रोहित पवार अन् विवेकानंद पाटीलचं काय झालं?
Abhijeet Dipke: 'रेल्वे, मेट्रो कशाला, देशच बंद करा..' दिल्ली मोदी-शाहांची घरची प्रॉपर्टी आहे का? आणीबाणीत सुद्धा रेल्वे बंद झाली नाही; अभिजित दिपकेंचा कडाडून हल्लाबोल
'रेल्वे, मेट्रो कशाला, देशच बंद करा..' दिल्ली मोदी-शाहांची घरची प्रॉपर्टी आहे का? आणीबाणीत सुद्धा रेल्वे बंद झाली नाही; अभिजित दिपकेंचा कडाडून हल्लाबोल
आदित्य ठाकरे म्हणाले, देशात आणीबाणी; म्हणाले, लोकांना ताब्यात घेतलं, नोटीस बजावल्या, रेल्वे रद्द, मेट्रो बंद
आदित्य ठाकरे म्हणाले, देशात आणीबाणी; म्हणाले, लोकांना ताब्यात घेतलं, नोटीस बजावल्या, रेल्वे रद्द, मेट्रो बंद
Tanushree Dutta : 'माझ्याविरोधात बोलण्यासाठी नाना पाटेकरांनी राखी सावंतला पैसे दिले होते'; तनुश्री दत्ताचा मोठा दावा, अडीच तासांचा व्हिडीओ शेअर केला, नेमकं काय-काय म्हणाली?
'माझ्याविरोधात बोलण्यासाठी नाना पाटेकरांनी राखी सावंतला पैसे दिले होते'; तनुश्री दत्ताचा मोठा दावा, अडीच तासांचा व्हिडीओ शेअर केला, नेमकं काय-काय म्हणाली?
Raju Shetti on Gokul Election: 'तुम्ही दोघं सांगताय म्हणून 24 मते देतो, पण एक मत कोणाला द्यायचं आमचं ठरलंय..' राजू शेट्टींनी गोकुळच्या लढाईत शिरोळच्या सभासदाची 'मन की बात' सांगितली
'तुम्ही दोघं सांगताय म्हणून 24 मते देतो, पण एक मत कोणाला द्यायचं आमचं ठरलंय..' राजू शेट्टींनी गोकुळच्या लढाईत शिरोळच्या सभासदाची 'मन की बात' सांगितली!
CJP आंदोलनापूर्वीच दिल्लीच्या चौफेर नाकेबंदीची तयारी? दिल्लीला येणाऱ्या अनेक गाड्या मुळ स्थानकातून रद्द, 57 मेट्रो स्थानके बंद, पोलिसांनी 10 छावण्या उभारल्या, CJP कार्यकर्त्यांची देशव्यापी धरपकड
CJP आंदोलनापूर्वीच दिल्लीच्या चौफेर नाकेबंदीची तयारी? दिल्लीला येणाऱ्या अनेक गाड्या मुळ स्थानकातून रद्द, 57 मेट्रो स्थानके बंद, पोलिसांनी 10 छावण्या उभारल्या, CJP कार्यकर्त्यांची देशव्यापी धरपकड
Embed widget