मुंबई : भाजपा विद्यमान आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड यांना कल्याण पूर्व विधानसभेत भाजपाकडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर  बंडाचे धुमारे फुटत आहेत. यंदा भाजपनं कोणतंही धक्कातंत्र न वापरता बहुतांश तिकीटं विद्यमान उमेदवारांनाच दिली आहेत. मात्र पोलीस चौकीतल्या गोळीबारावरुन कल्याणमध्ये महायुतीत अजूनही आरोपांच्या फैरी झडत आहेत. भाजप आमदार गणपत गायकवाडांनी पोलीस चौकीत शिंदे गटाच्या महेश गायकवाडांवर गोळ्या झाडल्या होत्या. त्याच गणपत गायकवाडांच्या पत्नीला भाजपनं तिकीट दिल्यानं शिंदे गटानं विरोध केलाय.  एवढं सगळ असताना देखील त्यांच्या पत्नीला भाजपने उमेद्वारी दिल्याने महायुतीत नाराजी पाहायला मिळत आहे.


 कल्याण पूर्व मतदारसंघात भाजपकडून सुलभा गायकवाड यांना उमेदवारी दिल्यानंतर शिवसेना शिंदे गटात प्रचंड अस्वस्थता आहे.  विद्यमान भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी उल्हासनगरच्या हिल लाईन पोलीस स्टेशनमध्ये शिवसेना शिंदे गटाचे कल्याण शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केल्याच्या घटनेला जवळपास आठ महिने उलटून गेले  आहेत.  गणपत गायकवाड या गुन्ह्यामध्ये तळोजा जेलमध्ये असून भाजपा पक्षाकडून गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड यांना उमेदवारी दिली आहे.  त्यामुळे शिंदे गटांमध्ये नाराजी आहे.  शिंदे गटाकडून बंड पुकारण्याची शक्यता आहे.  


आम्ही सुलभा गायकवाडांचे काम करणार नाही, शिंदे समर्थकांची भूमिका 


याविषयी बोलताना शिंदे गटाचे महेश गायकवाड शहर प्रमुख म्हणाले, ज्या व्यक्तीने विकास केला नाही, भ्रष्टाचार केला ,स्वतःच घर भरलं अशा  व्यक्तीला उमेदवार देऊ नये अशी मागणी केली होती.  मात्र त्यानंतर ही अशा व्यक्तीला उमेदवारी दिली हे योग्य नाही.  19 नगरसेवक चार ग्रामपंचायत आहेत.  मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते पदाधिकरी आमच्यासोबत आहेत.  आम्ही सुलभा गायकवाड यांच काम करणार नाही 


शिवसेना शिंदे गट बंडाच्या तयारीत


  विधानसभा प्रमुख शिवसेना शिंदे गटाचे  निलेश शिंदे म्हणाले,  2019 ला उमेदवारी मागत होतो उमेदवारी दिली नाही.  कल्याण पूर्व भकास झालाय ..शिवसेनेची ताकद आहे ..आमचा पक्ष आम्हाला वाढवायचा आहे ,पक्ष प्रमुखांना अनेकदा सांगितलं मात्र ऐकलं नाही ,म्हणून बंडाच्या तयारीत आहे. 


हे ही वाचा :