एक्स्प्लोर

पान टपरी चालक ते राज्याचे मंत्री, गुलाबराव पाटलांचा संघर्षमय प्रवास

गुलाबराव पाटील..... एक साधा, निष्ठावंत शिवसेना कार्यकर्ता... बाळासाहेबांच्या आवाहनाने झपाटून भगवं उपरणे गळ्यात घालून जग बदलायला निघालेल्या तेव्हाच्या सैनिकांच्या फौजेतला हा एक शिवसैनिक... साधा टपरी चालक! पान टपरी चालक ते राज्याचे मंत्री, गुलाबराव पाटलांचा संघर्षमय प्रवास जळगावनजीकच्या पाळधी या छोट्याशा खेड्यात नशीब पान सेंटर चालवणारा हा माणूस कधी आमदार झाला ते त्याचं त्याला सुद्धा कळलं नाही. खरेतर गुलाबराव हा शिवसेनेचा सभागृहातील व बाहेरही अत्यंत आक्रमक चेहरा; ते यापूर्वीच आमदार व्हायला हवे होते. कदाचित तेव्हा नशीब रुसलेले असेल त्यांच्यावर...   गुलाबराव पाटील हा कधी काळी गावोगावी होणाऱ्या तमाशामध्ये काम करणारा आणि वेळ मिळेल तेव्हा नशीब पान सेंटर चालवणारा माणूस... आयुष्यात तसं नशीब आजवर त्याच्यावर रुसलेलं होतं जणू!! पान टपरी चालक ते राज्याचे मंत्री, गुलाबराव पाटलांचा संघर्षमय प्रवास गुलाबराव यांची कारकीर्द अत्यंत वादग्रस्त, सनसनाटी अन संघर्षाची!! चेहऱ्यावर सदैव दाढी आणि मोठे-मोठे डोळे असलेला हा माणूस प्रथमदर्शनी रागीट वाटत असला तरी मनातून अगदी मृदू आणि शांत असल्याचा अनुभव त्यांना ओळखणाऱ्या लोकांना नक्की आहे.   अस्सल गावरान मातीतील, काळ्या आईप्रति न शेतकऱ्याविषयी खरी कळकळ, तळमळ, आस्था व जिव्हाळा असणारा माणूस म्हणून देखील त्यांची ओळख आहे.. मतदारसंघात कोणाकडेही लग्न किंवा निधन झाले असेल तर हा माणूस तिथे हजर असतो. पण फक्त लग्न नं मरण-धरण नव्हे तर कार्यकर्ते, मतदार, शेतकरी यांच्यासाठी हा माणूस रात्री-पहाटे धावून जातो. त्यांच्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी सरकारी यंत्रणा, गुन्हे अंगावर घेतो... पान टपरी चालक ते राज्याचे मंत्री, गुलाबराव पाटलांचा संघर्षमय प्रवास गेल्या निवडणुकीत गुलाबराव पाटील अगदी काही मतांनी पराभूत झाले तरीही त्यांनी आपली कार्यपद्धत सोडली नाही किंवा जनतेला वाऱ्यावर सोडले नाही. तेव्हा आमदार अनेक ठिकाणी सुख-दुःखात अनुपस्थित असायचा मात्र माजी आमदार नेहमी हजर असायचा...!!   आता आमदार असूनही रस्त्यात कुठेही थांबणारा आणि गरजू प्रत्येकाला मदत करणारा हा माणूस... आजही पाळधीत गेलात की मुंबईतल्या शिवसेना शाखेसारखी सकाळपासून गर्दी असते. लेक-सून नांदवत नाही, नवरा त्रास देतो अशी घरातली भांडणं ते बांधावरच्या न गावातल्या कुरबुरी, सरकारी कामे, आरोग्य सेवा ... अशी जणू कोणतीही कामे लोकं घेऊन येतात. गुलाबभाऊ आपलं काम करेल, न्याय देईल हा विश्वास असतो. सरकारी कार्यालयातले लालफिती, निगरगठठ भाई या भाऊसमोर चळाचळा कापतात. पान टपरी चालक ते राज्याचे मंत्री, गुलाबराव पाटलांचा संघर्षमय प्रवास राज्यमंत्र्याला अधिकाराच्या मर्यादा असल्या तरी गुलाबभाऊंना जे अधिकार मिळतील ते फक्त सामान्य लोकांसाठी वापरले जातील आणि हा लाल दिवा हा सामान्य माणसासाठी असेल, असा विश्वास जिल्ह्यातील जनतेला, शेतकऱ्याला आहे.   3 वेळा आमदार असून या माणसाने कधी स्वतःच्या कुटुंबासाठी लाभ घेतले नाहीत की घरात पदे नं सत्तेचं मेतकूट वाटून खाल्लं नाही. या आमदाराचा पोरगा आजही रोजी-रोटीसाठी नोकरी करतो, त्याची पत्नी व घरची शेतात राबतात... केवळ नावात भाऊ असून कुणी भाऊ होत नाही. ते अधिष्ठान आपल्या कर्मातून मिळतं... तळमळ, त्याग व निष्ठेतून मिळतं.. पान टपरी चालक ते राज्याचे मंत्री, गुलाबराव पाटलांचा संघर्षमय प्रवास स्वर्गीय शिवसेनाप्रमुख आणि काळी आई व तिची सेवा करणाऱ्या शेतकऱ्याला स्मरून गुलाबराव पाटील यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. जळगाव जिल्ह्याला कुठलाही अहंकार, माज व मस्ती नसलेला आणखी एक नवा मंत्री लाभलाय... सभागृहात आता शिवसेनेला खणखणीत, दणदणीत आणि बुलंद आवाज लाभलाय....
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar :
Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar : "निलेश लंके यांच्याशी चर्चा करण्याची माझी तयारी"
Neetu Kapoor Birthday : वेश्या व्यवसायातून पळून मुलीला सुपरस्टार बनवलं, कोठा ते फिल्म इंडस्ट्री अभिनेत्री नीतू कपूरच्या आईची संघर्षमय कहाणी
वेश्या व्यवसायातून पळून मुलीला सुपरस्टार बनवलं, कोठा ते फिल्म इंडस्ट्री अभिनेत्री नीतू कपूरच्या आईची संघर्षमय कहाणी
Lightning : काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar : ABP Majha Marathi News Headlines 11PM TOP Headlines 11PM 07 July 2024Navi Mumbai Rain Special Report : मुसळधार पावसानं नवी मुंबईला अक्षरश: धुतलंDada Bhuse On Ladki Bahin : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे महाराष्ट्राने स्वागत केले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar :
Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar : "निलेश लंके यांच्याशी चर्चा करण्याची माझी तयारी"
Neetu Kapoor Birthday : वेश्या व्यवसायातून पळून मुलीला सुपरस्टार बनवलं, कोठा ते फिल्म इंडस्ट्री अभिनेत्री नीतू कपूरच्या आईची संघर्षमय कहाणी
वेश्या व्यवसायातून पळून मुलीला सुपरस्टार बनवलं, कोठा ते फिल्म इंडस्ट्री अभिनेत्री नीतू कपूरच्या आईची संघर्षमय कहाणी
Lightning : काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
Accident : काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
Embed widget