एक्स्प्लोर
नागपूरमध्ये पत्रकाराच्या आई आणि मुलीची हत्या
नागपूरमध्ये एका न्यूज पोर्टल चालवणाऱ्या पत्रकाराच्या आई आणि मुलीची हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

नागपूर : नागपूरला उपराजधानी म्हणायचं की क्राईम सिटी असा प्रश्न आता निर्माण होऊ लागला आहे. कारण की, नागपूरमध्ये एका न्यूज पोर्टल चालवणाऱ्या पत्रकाराच्या आई आणि मुलीची हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आज (रविवार) नागपूर-उमरेड रस्त्यावर आजी उषा कांबळे आणि त्यांची नात राशी कांबळे यांचं प्रेत सापडलं. या दोघी काल संध्याकाळापासून बेपत्ता होत्या. या घटनेमागं घातपाताची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नागपूर-उमरेड रस्त्यावरील संजूबा हायस्कूलच्या मागील नाल्यात उषा कांबळे आणि त्यांची नात राशी कांबळे यांचे मृतदेह गोणीत भरुन फेकण्यात आले होते. यावेळी उषा कांबळे यांचा गळा आवळून हत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. त्यामुळे पोलीस आता याप्रकरणी कसून तपास करत आहेत. दरम्यान, एका पत्रकाराच्या कुटुंबाला असं संपवलं जात असताना पोलीस मात्र फक्त बघ्याच्याच भूमिकेत दिसत आहेत. त्यामुळं आता मुख्यमंत्र्यांनी त्यांच्याच शहरातल्या कायदा-सुव्यवस्थेकडं लक्ष देणं गरजेचं आहे.
Before You Go
Ravindra Dhangekar Pune: शिक्षक सरकारवर नाराज का? रवींद्र धंगेकरांनी सांगितलं पराभवाचं कारण
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र





















