Job Majha: अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या संधीच्या शोधात आहेत. मात्र कधी-कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते. त्यामुळेच 'एबीपी माझा'ने पुढाकार घेत, नोकरीची संधी कुठे आहे याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुण नोकरीसाठी या ठिकाणी अर्ज करु शकतील.
सध्या बँक ऑफ महाराष्ट्र, स्टेट बँक ऑफ इंडिया, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स आणि पंजाब नॅशनल बँक या ठिकाणी भरती सुरू आहे. त्या संबंधी सविस्तर वृत्त खालीलप्रमाणे,
बँक ऑफ महाराष्ट्र
पोस्ट – सामान्य अधिकारी
एकूण जागा – 500 शैक्षणिक पात्रता - कोणत्याही शाखेतील बॅचलर पदवी
वयोमर्यादा – 25 ते 35 वर्ष
ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 22 फेब्रुवारी 2022
अधिकृत वेबसाईट - www.bankofmaharashtra.in
स्टेट बँक ऑफ इंडिया
पोस्ट – सहाय्यक व्यवस्थापक
एकूण जागा – 48
शैक्षणिक पात्रता – पदवीधर
ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.
नोकरीचं ठिकाण – मुंबई
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25 फेब्रुवारी 2022
अधिकृत वेबसाईट - www.sbi.co.in
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स
पोस्ट – तांत्रिक सहाय्यक
एकूण जागा – 100
शैक्षणिक पात्रता - B.Tech/ BE/ B Arch/ B.Sc./ BCA/ BVSc पदवी
ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 फेब्रुवारी 2022
वयोमर्यादा – 26 वर्ष
अधिकृत वेबसाईट - iisc.ac.in
पंजाब नॅशनल बँक
पोस्ट – शिपाई, सफाई कामगार
एकूण जागा – 46
शैक्षणिक पात्रता – शिपाई पदासाठी १२वी पास, संबंधित जिल्ह्याचा रहिवासी, किमान अनुभव आणि किमान इंग्लिश वाचता येणं आवश्यक. तर सफाई कामगार पदासाठी १०वी पास, संबंधित जिल्ह्याचा रहिवासी, किमान अनुभव आणि किमान इंग्लिश वाचता येणं आवश्यक.
वयोमर्यादा – 18 ते 24 वर्ष
कोल्हापूर, सांगली, सोलापूर, लातूर, सातारा, सिंधुदुर्ग, उत्तर गोवा आणि दक्षिण गोवा या जिल्ह्यांमध्ये आणि गोवा राज्यातही यासाठी पोस्टिंग दिल्या जाणार आहेत.
अर्ज पाठविण्याचा पत्ता आहे. शिपाई पदासाठी - सर्कल हेड, पंजाब नशनल बँक, सर्कल ऑफिस, कोल्हापूर,1182/17, तळ मजला, चौथी गल्ली, राजारामपुरी, टाकाळा, कोल्हापूर-416008
आणि सफाई कामगार पदासाठी - मुख्य व्यवस्थापक (HRD), पंजाब नशनल बँक, सर्कल ऑफिस: कोल्हापूर,1182/17, तळ मजला, चौथी गल्ली, राजारामपुरी, टाकाळा, कोल्हापूर-416008
अर्ज पोहोचवण्याची शेवटची तारीख – 18 फेब्रुवारी 2022
अधिकृत वेबसाईट - www.pnbindia.in