Railway Traffic block: रेल्वेचा मेगाब्लॉक आणि त्यामुळे रद्द होणाऱ्या गाड्या यामुळे गेल्या काही महिन्यांमध्ये प्रवाशांची प्रचंड गैरसोय होत आहे . नुकताच मुंबई मार्गावर ७२ तासांचा मेगाब्लॉकमुळे १७ प्रवासी गाड्या तीन दिवस रद्द करण्यात आल्या होत्या . त्या पूर्ववत सुरू होत नाही तोच मनमाड रेल्वे स्टेशन नजिक मनमाड -पुणे व मनमाड-औरंगाबाद लोहमार्गावर अंकाई व अंकाई किल्ला या रेल्वे स्टेशनवर ११ ते १४ फेब्रुवारी दरम्यान ट्रैफिक ब्लॉक घेण्यात आला आहे . त्यामुळे काही रेल्वे प्रवासी गाड्या अन्य स्टेशनवर थांबविण्यात येणार आहेत .तर काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत .


 


या ट्रॅफिक मेगाब्लॉकमुळे काही रेल्वेगाड्या 3 दिवस रद्द करण्यात आल्या आहेत.  पुणे-निझामाबाद, निझामाबाद-पुणे, मुंबई सी.एस.टी - जालना, तसेच जालना-मुंबई सी.एस.टी या एक्सप्रेस गाड्या या ब्लॉकमुळे रद्द करण्यात आल्या आहेत. त्याशिवाय, सिकंदराबाद-मनमाड , मनमाड-सिकंदराबाद , हुजूर साहिब नांदेड-मनमाड, मनमाड-हुजूर साहिब नांदेड एक्सप्रेस गाड्या काही अंशी रद्द करण्यात आल्या आहेत. अंकाई व अंकाई किल्ला ही रेल्वे स्थानके पुणे, मनमाड व औरंगबाद लोहमार्गावर मनमाडपासून ६ किलोमीटर अंतरावर आहे .


 


शुक्रवारी 11-02-2022 ५.३० ते ८.३० या वेळेत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे . त्यामुळे गाडी क्र . ०७७७७/०७७७८ नांदेड - मनमाड - नांदेड डेमो एक्सप्रेस रद्द करण्यात आली आहे. तर गाडी क्र . १७०६४ सिकंदराबाद मनमाड ही गाडी १ तास ०५ मिनिटे , गाडी क्र . १८५०३ विशाखापट्टनम शिर्डी २५ मिनिटे तर गाडी क्र . १२७१६ अमृतसर - नांदेड सचखंड एक्सप्रेस १ तास १५ मिनिटे मनमाड रेल्वे जंक्शन स्थानकांत थांबतील.


 


शनिवार 12-02-2022 रोजी ५.३० ते ९ .३० गाडी क्र .७७७७ / ७७७८ नांदेड - मनमाड - नांदेड डेमो , गाडी क्र .११४० ९ / ११४१० पुणे निजामाबाद - पुणे डेमो आणि गाडी क्र .२२१४७ / २२१४८ दादर - शिर्डी दादर या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत . तर गाडी क्र . १७०६४ सिकंदराबाद - मनमाड २ तास १५ मिनिटे , गाडी क्र .१७००२ सिकंदराबाद - शिर्डी २ तास ३५ मिनिटे तर गाडी क्र . १२७१६ अमृतसर नांदेड २ तास २५ मिनिटे मनमाड रेल्वे स्थानकावर थांबतील .


 


रविवार 13-02-2022 - रोजी ५.३० ते ११.३० पर्यंत मेगाब्लॉक घेण्यात आल्याने नांदेड - मनमाड - नांदेड डेमु , पुणे - निजामाबाद - पुणे डेमु , गाडी क्र . १२०७१/१२०७२ मुंबई - जालना- मुंबई जनशताब्दी एक्सप्रेस , गाडी क्र . १७०६४/१७०६३ सिकंदराबाद - मनमाड या गाड्यांची यात्रा एक स्टेशनआधी संपविण्यात येणार आहे . ही गाडी संध्याकाळी येथूनच सुटेल . तर गाडी क्र . ११०७८ जम्मूतावी - पुणे झेलम एक्सप्रेस २ तास मनमाड स्थानकावर थांबेल . गाडी क्र . १२७१६ अमृतसर - नांदेड सचखंड एक्सप्रेस ३ तास ३० मिनिटे मनमाड रेल्वे स्थानकांत थांबेल . गाडी क्र . १२७७ ९ वास्को - निजामुद्दीन गोवा एक्सप्रेस ही गाडी १ तास ४५ मिनिटे सोलापूर विभागात थांबेल . गाडी क्र . १२७८० निजामुद्दी वास्को गोवा एक्सप्रेस ही मनमाड रेल्वे स्थानकांत २५ मिनिटे थांबेल . गाडी क्र . १७६१७ मुंबई - नांदेड तपोवन एक्सप्रेस ४० मिनिटे समिट , मनमाड स्टेशनवर थांबेल . गाडी क्र . १७२०६ काकीनाडा -शिर्डी ही गाडी नांदेड विभागात ४ तास ३५ मिनिटे इतकी वेळ थांबेल .



सोमवार दि . १४ फेब्रुवारी रोजी ५.३० ते १२ वाजेपर्यंत राहिल . या कालावधीत नांदेड - मनमाड - नांदेड डेमु , पुणे - निजामाबाद - पुणे डेमु , मुंबई - जालना जनशताब्दी आणि सिकंदराबाद - मनमाड या गाड्यांची यात्रा एक स्टेशन आधी संपविण्यात येणार आहे . या गाड्या सायंकाळी येथूनच सुटतील . तर जम्मूतावी -पुणे झेलम एक्सप्रेस २ तास ३० मिनिटे , अमृतसर - नांदेड सचखंड एक्सप्रेस ४ तास ३० मिनिटे , निजामुद्दीन - वास्को गोवा एक्सप्रेस ५५ मिनिटे , मुंबई - नांदेड तपोवन एक्सप्रेस १ तास मनमाड रेल्वे स्थानकांत थांबेल , अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे .


 


रद्द करण्यात आलेल्या गाड्या
 
11409  पुणे-निझामाबाद   11-02-2022 to 13-02-2022
11410  निझामाबाद-पुणे 11-02-2022 to 13-02-2022
12071  मुंबई सी.एस.टी - जालना 12-02-2022 & 13-02-2022
12072  जालना-मुंबई सी.एस.टी 13-02-2022 & 14-02-2022


अंशत: रद्द करण्यात आलेल्या गाड्या


17064  सिकंदराबाद-मनमाड 12-02-2022 आणि 13-02-2022 नगरसोल- मनमाड
17063  मनमाड-सिकंदराबाद 13-02-2022 आणि 14-02-2022 मनमाड-नगरसोल
07777  हुजूर साहिब नांदेड-मनमाड 10-02-2022 ते 13-02-2022 औरंगाबाद-मनमाड
07778  मनमाड-हुजूर साहिब नांदेड 11-02-2022 ते 14-02-2022 मनमाड-औरंगाबाद


 


इतर महत्त्वाच्या बातम्या:



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha