मुंबई : अनेकजण सध्या चांगल्या संधीच्या शोधात आहेत. मात्र कधी कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते. त्यामुळेच एबीपी माझाने पुढाकार घेत, कुठे नोकरीची संधी आहे याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुण नोकरीसाठी या ठिकाणी अर्ज करु शकतील.
कर्मचारी राज्य विमा महामंडळ (ESIC) - एकूण 594 जागांसाठी भरती
पहिली पोस्ट – उच्च श्रेणी लिपिक (UDC)
- एकूण जागा – 318
- शैक्षणिक पात्रता – पदवीधर आणि संगणकाचं ज्ञान
- वयोमर्यादा – 18 ते 27 वर्ष
दुसरी पोस्ट – स्टेनोग्राफर
- एकूण जागा – 18
- शैक्षणिक पात्रता - बारावी उत्तीर्ण, डिक्टेशन- 10 मिनिटे @80 श.प्र.मि., ट्रान्सस्क्रिप्शन - संगणकावर 50 मिनिटे (इंग्रजी), 65 मिनिटे (हिंदी)
- वयोमर्यादा – 18 ते 27 वर्ष
तिसरी पोस्ट – MTS (मल्टी टास्किंग स्टाफ)
- एकूण जागा – 258
- शैक्षणिक पात्रता – दहावी उत्तीर्ण
- वयोमर्यादा – 18 ते 25 वर्ष
- ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 फेब्रुवारी 2022
- अधिकृत वेबसाईट - www.esic.nic.in
भारतीय कृषी संशोधन संस्था
पोस्ट – टेक्निशियन (T-1)
- एकूण जागा – 641
- शैक्षणिक पात्रता – दहावी उत्तीर्ण
- ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 जानेवारी 2022
- वयोमर्यादा – 18 ते 30 वर्ष
- अधिकृत वेबसाईट - www.iari.res.in (या वेबसाईटवर गेल्यावर सुरुवातीलाच तुम्हाला संबंधित पोस्टसंदर्भातल्या जाहिरातीची लिंक दिसेल क्लिक करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधीकरण
पोस्ट – मुख्य वाहतूक नियंत्रक, ऑपरेशन शेड्युलर, स्टेशन मॅनेजर, पर्यवेक्षक
- एकूण जागा - आठ
- शैक्षणिक पात्रता – पदवीधर
- अर्ज पाठवण्याचा ईमेल आयडी - मुख्य वाहतूक नियंत्रक पदासाठी recruitment.ctc@mmmocl.co.in, ऑपरेशन शेड्युलर पदासाठी recruitment.opsc@mmmocl.co.in, स्टेशन मॅनेजर पदासाठी recruitment.sm@mmmocl.co.in आणि पर्यवेक्षक पदासाठी recruitment.supcr@mmmocl.co.in या ईमेल आयडीवर अर्ज पाठवायचा आहे.
- नोकरीचं ठिकाण - मुंबई
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 29 जानेवारी 2022
- अधिकृत वेबसाईट - mmrda.maharashtra.gov.in (या वेबसाईटवर गेल्यावर tender notices & vacancies मध्ये recruitment वर क्लिक करा. त्यात पुन्हा एकदा recruitment वर क्लिक करा. तुम्हाला संबंधित पोस्टसंदर्भातल्या जाहीरातीची लिंक दिसेल. क्लिक करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)