Bhandara Gondia Nagarpanchayat Election : राज्यातील नगरपंचायतींच्या निवडणुकांचे चित्र हळूहळू स्पष्ट होत आहे. आत्तापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपचे सर्वात जास्त उमेदवार निवडून आल्याचे चित्र सध्या तरी दिसत आहे. भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यातील सहा नगपंचायतीचे चित्र स्पष्ट आहे. यामध्ये दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर नगरपंचायत, लाखनी नगरपंचायत आणि मोहाडी नगर पंचायत तर गोंदिया जिल्ह्यातील देवरी नगरपंचायत, मोरगाव अर्जुनी नगरपंचायत आणि सडक अर्जुनी नगरपंचायत या सहा नगरपंचायीसाठी निवडणूक झाली होती. यामध्ये भाजपला चांगले यश मिळाल्याचे चित्र दिसत आहे. पाहुयात कोणत्या पक्षाला किती मिळाल्या जागा...
भंडारा जिल्ह्यातील नगरपंचायती
लाखांदूर नगरपंचायतीत भाजपचे वर्चस्व
भाजप –9
काँग्रेस –6
इतर – 2
शिवसेना –
राष्ट्रवादी –
लाखनी नगरपंचायतीत राष्ट्रवादीला यश
राष्ट्रवादी –8
भाजप – 6
काँग्रेस –2
इतर –1
शिवसेना –
मोहाडी नगरपंचायतीत भाजपला 9 जागा
भाजप – 9
राष्ट्रवादी –6
काँग्रेस –2
शिवसेना –
गोंदिया जिल्ह्यातील नगरपंचायती
देवरी नगरपंचायतीत भाजपला 9 जागा
भाजप – 9
काँग्रेस – 2
राष्ट्रवादी – 1
शिवसेना –
मोरगाव अर्जुनी नगर पंचायतीत भाजप 5 तर काँग्रेस 4 जागा
भाजप – 5
काँग्रेस – 4
राष्ट्रवादी –1
इतर – 1
शिवसेना –
सडक अर्जुनी नगर पंचायतीत राष्ट्रवादीचे वर्चस्व
राष्ट्रवादी –7
बाहुबली पॅनल- 3
काँग्रेस –2
इतर – 3
भाजप – 1
शिवसेना –1
एकूणच सगळी परिस्थिती बघितली तर भंडारा जिल्ह्यात भाजपला चांगले यश मिळाल्याचे दिसत आहे. भंडारा जिल्ह्यातील नगरपंचायतीत भाजपचे सर्वात जास्त उमेदवार निवडून आले आहेत. तर त्याखालोखाल राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या जागा आल्या आहेत. गोंदिया जिल्ह्यातील नगपंचायतीचा विचार केल तर तिथेही भाजपचे सर्वात जास्त उमेदवार निवडून आले आहेत. त्याखालोखाल राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या जागा आल्या आहेत.
राज्य निवडणूक आयोगाने एकूण 106 नगरपंचातींच्या निवडणुका जाहीर केल्या होत्या. त्यातील तलासरी, विक्रमगड, मोखाडा, पेठ, सुरगाणा, धडगाव- वडफळ्या- रोषणमाळ, झरी- जामणी, मुलचेरा, एटापल्ली, कोरची, भामरागड या 11 नगरपंचायतींमध्ये एकही जागा नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गासाठी राखीव नव्हती. त्यामुळे तेथे सर्व जागांसाठी 21 डिसेंबर 2021 रोजी मतदान पार पडले. उरलेल्या 95 नगरपंचायतीतील अनारक्षित झालेल्या 344 जागांसाठी 18 जानेवारी 2022 रोजी मतदान झाले होते. त्यापैकी शिर्डीतील 4 आणि आणि कळवणमधील 2 जागा बिनविरोध झाल्याने तेथे मतदानाची आवश्यकता राहिली नाही. त्याचबरोबर माळशिरस आणि देवळा येथेही प्रत्येकी एक जागा बिनविरोध झाली. त्यामुळे 93 नगरपंचायतीतील 336 जागांसाठी काल मतदान झाले होते.
त्याचे निकाल आज हाती येत आहेत.