Job Majha Recruitment News : देशासह राज्यातील महत्वाच्या ठिकाणी उपलब्ध असणाऱ्या नोकरीच्या संबंधीचे अपडेट आम्ही आपल्याला JOB Majha च्या माध्यमातून देणार आहोत. महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड नागपूर, राष्ट्रीय फलोत्पादन मंडळ आणि भारतीय नौदलात विविध पदांसाठी भरती होत आहे. बी.ई. बी.टेक झालेल्यांपासून ते अगदी 10वी उत्तीर्ण झालेल्यांसाठी नोकरीची संधी आहे. अर्ज कुठे करायचा, कसा करायचा? त्यासाठी पात्रता काय आहे? याबाबत आम्ही तुम्हाला माहिती देत आहोत. ही संधी सोडू नका. याविषयी सविस्तर माहिती जाणून घ्या. बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालयात विधी अधिकारी म्हणजेच लॉ ऑफिसर पदासाठी भरती होत आहे.
- लॉ ऑफिसर
एकूण जागा – 01
शैक्षणिक पात्रता – LLB आणि पाच वर्षांचा अनुभव महत्वाचा आहे.
नोकरीचं ठिकाण – मुंबई
अधिकृत वेबसाईट - www.mumbaipolice.gov.in (या वेबसाईटवर गेल्यावर ताज्या घडामोडींमध्ये तुम्हाला संबंधित पोस्टसंदर्भातल्या जाहीरातीची लिंक दिसेल.क्लिक करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)
अर्ज पाठवण्याचा पत्ता - पोलीस आयुक्त, मुंबई, D.N रोड, क्रॉफर्ड मार्केटसमोर, मुंबई- 400001
अर्ज पोहोचवण्याची शेवटची तारीख – 5 ऑगस्ट 2021
- सेंट्रल इंडिया कॉलेज ऑफ नर्सिंग, नागपूर
पोस्ट – प्राचार्य, कुलगुरु, लेक्चरर/ व्याख्याता (यात लेक्चररसाठी 10 जागा आहेत)
एकूण जागा – 12
शैक्षणिक पात्रता – प्राचार्य आणि कुलगुरु पदासाठी M.Sc नर्सिंग झालं असलं पाहिजे. प्राचार्य पदासाठी एकूण 15 वर्षांचा अनुभव महत्वाचा आहे. यात 10 वर्षाचा टिचिंगचा अनुभव महत्वाचा आहे. तसंच कुलगुरु पदासाठी 12 वर्षाचा अनुभव यात 10 वर्षाचा टिचिंगचा अनुभव महत्वाचा आहे. लेक्चररसाठी M.Sc किंवा B.Sc नर्सिंगमध्ये शिक्षण महत्वाचं आहे. फ्रेशर्ससही या पोस्टसाठी अप्लाय करु शकतात.
नोकरीचं ठिकाण आहे - नागपूर
तुम्हाला अर्ज ईमेल करायचा आहे.
ईमेल आयडी आहे - cincnagpur99@gmail.com
अर्ज ईमेल करण्याची शेवटची तारीख – 7 ऑगस्ट 2021
- आदर्श पब्लिक स्कूल, सांगली
पोस्ट - सहाय्यक शिक्षक, ग्रंथपाल, लिपिक, शिपाई
एकूण जागा – 11
शैक्षणिक पात्रता – सहाय्यक शिक्षक पदासाठी B.A/ M.A.B.Ed./B.Sc./ M.Sc., क्लार्क पदासाठी BA/ B.Com आणि शिपाई पदासाठी आठवी किंवा दहावी पास
थेट मुलाखत होणार आहे.
मुलाखतीचा पत्ता - आदर्श पब्लिक स्कूल, कुंडल रोड, भवानीनगर, विटा, तालुका – खानापूर, जिल्हा – सांगली
अधिकृत वेबसाईट - aps.agiv.edu.in
मुलाखतीची तारीख – 4 ऑगस्ट 2021