एक्स्प्लोर

Jitendra Awhad : प्रभू श्रीराम मांसाहारी असल्याचे वक्तव्य; जितेंद्र आव्हाडांविरोधात अजित पवार गट, भाजप आक्रमक

Jitendra Awhad Controversy : जितेंद्र आव्हाड यांनी शिर्डीत पक्षाच्या शिबिरात प्रभू श्रीराम मांसाहारी असल्याचे वक्तव्य केले होते. त्या वक्तव्याचे पडसाद आता उमटू लागले आहेत.

Jitendra Awhad Statement On Prabhu Shri Ram :  राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी शिर्डीत पक्षाच्या शिबिरात प्रभू श्रीराम (Shri Ram) मांसाहारी असल्याचे वक्तव्य केले होते. त्या वक्तव्याचे पडसाद आता उमटू लागले आहेत. आव्हाड यांच्याविरोधात ठाण्यात अजित पवार गट (NCP Ajit Pawar) आक्रमक झाला आहे. आव्हाड यांच्या निवासस्थानाबाहेर महाआरती करणाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर, भाजप आमदार राम कदम (Ram Kadam) गुरुवारी आव्हाडांविरोधात पोलीस तक्रार करणार आहेत. 

जितेंद्र आव्हाड यांनी शिर्डी येथील शिबिरात प्रभू श्रीराम हे मांसाहारी असल्याचे वक्तव्य केल्यानंतर ठाण्यातील आव्हाडांच्या घराबाहेर अजित पवार गटाच्या काही कार्यकर्त्यांनी निषेध केला. त्यांनी आव्हाडांच्या घराबाहेर महाआरती करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी तात्काळ अटकाव करत त्यांना ताब्यात घेतले. 

अजित पवार गटाच्या आंदोलनाच्यावेळी अजित पवार गट आणि शरद पवार गटाचे दोन्ही कार्यकर्ते आमने-सामने आले होते अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी प्रभू श्रीराम यांचा हातात फोटो घेऊन आंदोलन केले आहे.दोन्ही पक्षांनी यावेळी जोरदार घोषणाबाजी दिल्या आहेत.काही काळ तनावाचे वातावरण निर्माण झाले होते मात्र यानंतर अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांना वर्तक नगर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.दरम्यान यावेळी प्रभू श्रीराम यांच्या फोटोची विटंबना झाली असल्याचं शरद पवार गटाचे कार्यकर्ते म्हणाले आहेत.

तर,  आव्हाड यांच्या विरोधात येत्या 24 तासात गुन्हा दाखल करण्याची मागणी अजित पवार गटाचे नेते आनंद परांजपे केली आहे. गुन्हा दाखल न झाल्यास वर्तक नगर पोलीस ठाण्यात महाआरती करण्याचा इशारा देखील त्यांनी दिला. 

दरम्यान, जितेंद्र आव्हाड यांनी घराबाहेर आंदोलन करणाऱ्या अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांवर टीका केली आहे. माझ्या घरावर आता अजित पवार यांच्या चार समर्थकांनी आरती करण्याचा प्रयत्न केला. मोजून चारच जण होते. श्री रामाचा इतिहास माहित नसलेल्यांना इतिहास समजावून सांगावे लागेल, असे आव्हाड यांनी म्हटले. 

भाजप आक्रमक

भाजपही आव्हाडांच्या वक्तव्यावर आक्रमक झाली आहे. घाटकोपरचे आमदार राम कदम हे गुरुवारी सकाळी आव्हाडांविरोधात घाटकोपर चिराग नगर पोलीस स्टेशनला तक्रार करण्यासाठी जाणार आहेत. आव्हाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली आहे. 

भाजपच्या अध्यात्म आघाडीचे प्रमुख आचार्य तुषार भोसले यांनीदेखील आव्हाडांवर टीका केली आहे. रामायणात शूपर्णखादेखील रावणाला सांगते की प्रभू श्रीराम आणि लक्ष्मण हे दोघेही कंदमुळे आणि फळ खातात. मात्र, आव्हाड प्रभू श्रीराम मांसाहार करत असल्याचे वक्तव्य करत असल्याची टीका त्यांनी केली. तर, नाशिकच्या काळाराम मंदिराचे पुजारी महंत सुधीरदास पुजारी हे देखील  नाशिकच्या पंचवटी पोलिस ठाण्यात सकाळी आव्हाडांविरोधात तक्रार दाखल करण्यासाठी जाणार आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार

व्हिडीओ

Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
Bar Council : बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी NALSAR प्रकरणी विद्यार्थ्यांची माफी मागितली, वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
बार काऊन्सिलच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली,वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न 
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल
Embed widget